नवीन लेखन...

सोन्याची अर्थनीती

भारतीय नागरिकांना प्राचीन सोन्याचेकाळापासून विलक्षण आकर्षण आहे. केवळ स्त्रियांनाच सोन्याच्या दागिन्यांची आवड असते असे नाही तर अनेक पुरुषही सध्याच्या काळात सुवर्ण संचय करताना आढळू लागले आहेत. जानेवारी १९७१ मध्ये सोन्याचा भाव प्रती तोळा रु. ७१/- होता. जानेवारी २०१८ मध्ये सोन्याचा भाव प्रती तोळा रु. २४ हजारच्या वर गेला होता. तर आज तो रु. ५३ हजारच्या वर गेला आहे. २००८ साली अमेरिकेत ज्यावेळी सब प्राईम क्रायसेस निर्माण झाले त्यानंतर डॉलरच्या तुलनेत जगभरातून सोन्याकडे पर्यायी गुंतवणुकीचे साधन म्हणून बघितले जाऊ लागले.

सोन्याकडे आणि विशेषत: सोन्याच्या दागिन्यांकडे गुंतवणूक म्हणून पाहावे का? असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांच्या मनात असतो. या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी ‘गुंतवणूक’ या शब्दाचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. उत्पन्न वजा खर्च म्हणजे बचत. बचतीमधील काही रक्कम ज्यावेळी परतावा (उत्पन्न) मिळण्यासाठी एखाद्या गुंतवणूक योजनेत गुंतवली जाते त्या प्रक्रियेला गुंतवणूक म्हणतात. म्हणजे या प्रक्रियेत त्या व्यक्तीकडे गुंतवणूक योग्य काही पैसे असतात. त्या पैशातून तो काही मालमत्ता उदा. शेअर्स, रोखे, मुदत ठेवी विकत घेतो. त्यामधून त्याला काही परतावा उदा. व्याज, डिव्हिडंड, वृद्धी असे लाभ मिळतात. आणि मुदती अखेर किंवा शेअर्सच्या बाबतीत ते विकल्यावर त्याला पुन्हा काही रक्कम मिळते. या (गुंतवणूक) प्रक्रियेचा विचार करता सोन्याच्या दागिन्यांची खरेदी गुंतवणूक म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. कारण सोन्याचे दागिने घेऊन सोन्याचा भाव वाढल्यावर ते दागिने विकणारी व्यक्ती विरळाच.

एखादे आर्थिक संकट आले, पैशाची चणचण निर्माण झाली आणि इतर मार्ग उपलब्ध नसतील सोन्याचे दागिने तरच विकण्याची उदाहरणे पाहायला मिळतात आणि म्हणून सोन्याच्या गुंतवणूक दागिन्यांना म्हणणे योग्य ठरणार नाही. ती केवळ भावनिक गुंतवणूक म्हणता येईल.

पण सोन्याच्या दागिन्याच्या व्यतिरिक्त सोन्याची इतर मार्गांनी खरेदी करणे ही गुंतवणूक म्हणून पाहता येईल. याचे प्रमुख कारण म्हणजे चलनवाढीचा (Inflation) सोन्यावर कुठलाच परिणाम होत नाही. चलनवाढीमुळे पैश्याच्या मूल्याची ज्यावेळेला घसरण होते त्यावेळेला सोन्याचे महत्त्व अधोरेखित होते. पण सोन्याच्या गुंतवणुकीवर अतिरेकी भिस्त ठेवू नये. काही गुंतवणूकदार त्यांच्या एकूण गुंतवणुक पोर्टफोलिओमध्ये ५० ते ७० टक्के रक्कम सोन्यात गुंतवतात.
हे म्हणजे मृत्यू अटळ आहे म्हणून फक्त आयुर्विमाच घेण्यासारखे आहे. एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओ मध्ये ५ ते १० टक्के गुंतवणूक सोन्यामध्ये असावी. मग ही गुंतवणूक कुठे
करणे शक्य आहे त्याविषयीचे पर्याय पाहूया.

सोन्यातील गुंतवणुकीचे पर्याय
१) सोव्हरीन गोल्ड बॉण्ड्स:
सरकारने २०१५ मध्ये पहिल्यांदा हे विक्रीस काढले. यात गुंतवणूकदारांना ‘ग्रॅम’मध्ये गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदाराला गुंतवणुकीनंतर बॉण्डचे सर्टिफिकेट मिळू शकते किंवा ‘डिमॅट फॉर्म’ मध्येही गुंतवणूक करता येते.

भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे बॉण्ड विक्रीस काढते. बॉण्ड्सचा दर ठरविताना सरकार, ‘इंडिया बुलियन एण्ड ज्वेलर्स असोसिएशन’ या संस्थेने जाहीर केलेला दर ग्राह्य धरते. एका आर्थिक वर्षी किमान एक ग्रॅम व कमाल ५०० ग्रॅम गुंतवणूक करता येते. यावर सुरुवातीच्या गुंतवणुकीवर २.५ टक्के दराने व्याज देण्यात येते.

गुंतवणुकीचा कालावधी ८ वर्षे आहे. मात्र ५ वर्षानंतर गरज पडल्यास योजनेतून बाहेर पडता येते. यावेळी काढलेल्या बॉण्ड्समध्ये वैयक्तिक गुंतवणूकदारांना कॅपिटल गेन्स टॅक्समध्ये सवलत देण्यात आली होती, पण व्याज मात्र करपात्र ठेवण्यात आले होते. हे बॉण्ड्स विक्रीस काढल्यानंतर बँका, ठराविक पोस्ट ऑफिसेस किंवा शेअर बाजारात
मिळतात.

२) गोल्ड ईटीएफ:
सोव्हरिन गोल्ड बॉण्डचा पर्याय कार्यरत होण्यापूर्वी, गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (ईटीएफ) हीच योजना अस्तित्वात होती. सर्टिफिकेट स्वरूपातील ही गुंतवणूक २००७ मध्ये सुरू करण्यात आली. गुंतवणूकदारांना सोन्याच्या दरातील बदलानुसार यात परतावा मिळतो. या गुंतवणुकीतील प्रत्येक युनिट हे २२ कॅरेटचे ९९.५ टक्के शुद्धतेचे असते. यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला ‘डिमॅट’ खाते उघडावे लागते. ईटीएफचे प्रत्येक युनिट म्हणजे एक ग्रॅम सोने असते. यात गुंतवणुकीवर मर्यादा नाही.

३) गोल्ड म्युच्युअल फंड्स
ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या गोल्ड म्युच्युअल फंड्स ‘लाँच’ करतात. यातील गुंतवणूक ही ‘पेपर’ स्वरूपातली असली तरी यात गुंतवणूक करण्यास डिमॅट खाते हवेच असे नाही.

यात एसआयपीने (सिस्टिमॅटिक इहेस्टमेन्ट प्लॅन) किंवा एकदम पूर्ण रक्कम गुंतवणूक करता येते. पण या योजनेचा खर्चाचा ‘रेशो’ जास्त असतो, परिणामी तितका परतावा कमी मिळतो. काही ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या सोन्याच्या खाणींच्या कंपन्यांत गुंतवणूक करतात व या गुंतवणुकीवर आधारित योजनाही लाँच करतात.

४) सोन्याची नाणी, बार:
ही ज्वेलरी स्टोअर्स, बँका किंवा ऑनलाईन पोर्टलवर विकत मिळतात. बँकांकडून तुम्ही जर ही विकत घेतलीत, तर बँक ती परत विकत घेत नाहीत, हे लक्षात घ्या. ती तुम्हाला अन्यत्र विकावी लागतात. स्टेट बँकेकडे विक्रीसाठी २, ४, ५, ८, ९, १० ग्रॅमची नाणी व २० व ५० ग्रॅमचे बार विक्रीस उपलब्ध आहेत. यांच्या किमतीही रोजच्या सोन्याच्या किमतीनुसार असतात व या बँकांच्या वेबसाईटवर पाहायला मिळतात.

हे खरेदी करताना शुद्धतेकडे लक्ष पुरवावयास हवे. याची विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा नेहमी कमी असते. यावर व्हॅट व विक्रीकर भरावा लागतो. ३० जूनपासून हा बंद होऊन १ जुलै २०१७ पासून जीएसटी लागू झाला आहे. सोन्याच्या गुंतवणुकीचा विचार करता पहिले प्राधान्य ‘सोव्हरीन गोल्ड बॉण्ड’ला द्या. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ‘सोव्हरीन बॉण्ड’ चांगला पर्याय आहे. त्यानंतर ईटीएफचा विचार करा. जर तुम्हाला लवकर पैशाची गरज पडण्याची शक्यता असेल, तर ईटीएफ हा चांगला पर्याय आहे.

– दत्तात्रय काळे

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..