नवीन लेखन...

आयपॉड

नव्या जमान्यातील नवीन इलेक्ट्रॉनिक साधनांपैकी ज्याने वॉकमनसारख्यांची सद्दी संपवली त्यात आयपॉड हे एक आहे. आयपॉड हा एक पोर्टेबल म्हणजे सहजगत्या कुठेही नेता येईल असा डिजिटल मीडिया प्लेयर आहे. पहिला आयपॉड हा अॅपल कंपनीने तयार केला. २३ ऑक्टोबर २००१ रोजी तो बाजारात आला.

त्यानंतरच्या काळात आयपॉडमध्ये अनेक बदल होत गेले. हार्ड ड्राईव्हवर आधारित आयपॉड क्लासिक, टचस्क्रीनवर आधारित आयपॉड टच, अतिशय सुटसुटीत असा आयपॉड नॅनो, त्याहून अधिक प्रगत असा आयपॉड शफल असे अनेक प्रकार नंतर बाजारात आले. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील ही प्रगती इतकी स्तिमित करणारी आहे की, या साधनांमध्ये रोज नवीन काहीतरी येत आहे. आयपॉड क्लासिकमध्ये हार्ड ड्राईव्ह असतो तर इतर सर्व प्रकारांमध्ये फ्लॅश मेमरी वापरलेली असते त्यामुळे त्यांचा आकार लहान असतो. आयपॉडसचा उपयोग हा माहिती साठवणे व तिच्या हस्तांतरासाठीही होतो. त्यांची माहिती साठवण्याची क्षमता ही २ जीबी ते १६० जीबी किंवा त्याहून अधिक असते.

अॅपलचे आयट्यून हे सॉफ्टवेअर वापरून गाणी संगणकावरून या आयपॉडवर घेता येतात व नंतर हे छोटेसे साधन वापरून आपण कुठेही गाणी ऐकू शकतो. ज्यांच्या संगणकावर आयट्यून हे सॉफ्टवेअर चालत नाही त्यांना इतर पर्याय उपलब्ध आहेत. यात छायाचित्रे, व्हिडिओ, गेम्स, संपर्काांची माहिती, ईमेल सेटिंग आयपॉडवर घेता येतात.

हा मीडिया प्लेयर तयार केल्यानंतर त्याला नाव काय द्यायचं असा प्रश्न सर्वांना पडला होता. कॉपीरायटर व्हिनी शियको यांनी त्याचे बारसे आयपॉड असे केले. २००१-अ स्पेस ओडिसी हा चित्रपट व ओपन द बॉड बे डोअर वाक्प्रचार यावरून त्यांनी हे नाव सुचविले. या आयपॉडमध्ये मायक्रोकंट्रोलर, ऑडियो चिप, स्टोरेज मीडियम, बॅटरीज, डिस्प्ले असे भाग असतात.

डिस्प्ले रंगीत व मोठेही असतात. यात आपण हव्या त्या सुविधा घेऊ शकतो. हायफाय, एफएम रेडिओ ट्युनर्स, टीव्ही कनेक्शन, कॅमेरा कनेक्टर, वायरलेस इयरफोन्स अशा असंख्य सुविधा घेता येतात. नेहमीप्रमाणे आयपॉडच्या पेटंटवरून बरेच वाद आहेत. अॅडव्हान्स्ड ऑडिओ डिव्हाइसेस या कंपनीने म्युझिक ज्युकबॉक्स तयार केल्याचा दावा केला होता. हाँगकाँगच्या आयपी पोर्टफोलिओ कंपनीने हो उंग त्से या संशोधकाने आयपॉड तयार केल्याचा दावा केला होता. एकूणच आयपॉडने मीडिया प्लेयरची संकल्पना बदलून टाकली एवढे मात्र खरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..