नवीन लेखन...

शुक्रवारची कहाणी (आजच्या काळातील)

आटपाट नगर होतं तिथं एक गरीब कुटुंबातील पाच जण कसे बसे दिवस काढत होते. पौरोहित्य आणि चार पाच ठिकाणी देवपूजा यातून जे मिळायचे ते समजून घेऊन आनंदात रहात होते. मोठय़ा मुलीला असेच खातेपिते घर बघून लग्न करून दिले. गावातील लोकांनी थोडा हातभार लावला होता. एक जबाबदारी आणि खायचे तोंड कमी झाले. नतंरचे दोन मुलगे सरकारी शाळेत शिकत होती. अचानक वडिलांना आजार झाला आणि त्यातच ते देवाघरी गेले. मोठा यंदा दहावीत होता. म्हणून कशी बशी परीक्षा दिली. पास झाला. मग पौरोहित्य करु लागला पण आता पहिल्या सारखे वातावरण राहिले नाही. त्यामुळे दुकानात हिशेब लिहिण्याची नोकरी करु लागला. अशीच एक गरीब घरातील मुलगी सांगून आली. सणवार. आणि सवाष्ण म्हणून काही बाही मिळायचे याची सोय होईल म्हणून लग्न करणे आवश्यक होते ते झाले. उमा नावाप्रमाणेच सगळे काही निमूटपणे समाधानाने करत होती. आणि आता आजुबाजुला असलेल्या ग्रामीण भागातील लोक सदाशिवला पौरोहित्य करण्यासाठी बोलावू लागले होते. आणि बायकोला घेऊन या शिधा घेऊन जायला सांगत. एकदा श्रावणात सूनबाईनी पाटलांच्या घरी पुरणवरणाचा स्वयंपाक करुन पाचपंचवीस लोकांना जेऊ घालून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. पाटील व पाटलोण बाई एकदम खुष. जातांना भरपूर शिधा. साडी चोळी ओटी भरली. सासूबाई म्हणाल्या तुझ्या या स्वयंपाकानेच एक दिवस तुझ्या घरी लक्ष्मी चालत येईल….
आणि त्याही देवाघरी गेल्या. लहान भावाचे शिक्षण करुन आपले दैन्य घालवता येईल असे वाटून दोघांनी खूप मेहनत घेऊन शिकवले. मोठ्या कंपनीत मोठी नोकरी मिळाली. लग्न झाल्यावर गावी पैसे पाठवणे कारणे देऊन बंद झाले. स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी शहरात गेले. पडेल ती कामे केली. एकदा एका घरी पोळ्या करायला गेली उमा आणि नशीब. तिथे एका बाईचा फोन आला होता आज शुक्रवार श्रावणातला घरी अडचण आली आहे कुणी मिळेल का स्वयंपाकाला. उमा तयार झाली. तिथे सगळे काही गावाकडे होते तसेच झाले. पुजा आरती नैवेद्य वगैरे. घरी निघतांना जेवून जा असा आग्रह केला पण तिने माझ्या घरी पुजा राहिली आहे पण फक्त फुटाणे व गुळ द्या प्रसाद म्हणून. तेवढे घरी गेल्यावर बाजारातून जिवतीचा कागद आणला. पुजा केली. फुटाणे गुळ समोर ठेवून प्रार्थना केली. रात्री अचानक घरात खूप मोठा तेजस्वी प्रकाश पडला आणि सुगंध येतो आहे असे वाटत होते. जागी झाली. भास झाला असावा असे समजून झोपली. या दिवशी कामाला गेली तेंव्हा कालच्या स्वयंपाकाचे पैसे किती झाले असे विचारले असता तिने सांगितले की माझ्या हातून जिवतीची सेवा घडली आहे म्हणून मी पैसे घेऊ शकत नाही. फक्त गरज असेल तेव्हा बोलवा असे सांगा म्हणाली. सदाशिव पेढीवर गेला. शेटजी आले पण खूप काळजीत होते. आणि आता जाऊन बसले. सदाशिव आत गेला व म्हणाला शेटजी काल तुम्ही घाईघाईत निघालात आहे फोन केला म्हणून बोलत बोलत निघून गेलात आणि तुमची ही बॅग इथेच राहिली. मी घरी जाताना पाहून कपाटात ठेवून कुलुप लावून गेलो. ही घ्या. शेठजींना जो आनंद झाला ते काही बोलले नाहीत. आणि सदाशिव बाहेर गेला तसे घाईघाईत बॅग उघडली आणि तळाशी ठेवलेले खूप किमतीचे हिरे मोजून पाहिले आणि देवाचे व सदाशिवचे आभार मानले……
शेटजीनी सदाशिवला आपल्या नव्या सोसायटीच्या ठिकाणी नेले व सांगितले माझ्या नवीन सोसायटीत येणाऱ्यांची वास्तूशांत तूच करशील. आणि एका नतंर एक कुटुंब आले की सदाशिवला भरपूर पैसे मिळत. पण इतरही बरेच काही. नोकरीत सूट मिळायची म्हणून पौरोहित्य जास्त प्रमाणात करता आले. उमालाही बरीच कामे मिळू लागली तिने हा व्यवसाय सुरू केला. तिच्या स्वयंपाकाची स्तुती होऊ लागली. आणि बघता बघता घर झाले मुलांना उच्च शिक्षण घेता आले. मोठा लवकरच नोकरीला लागेल. उमा आता एक नावाजलेली सुगरण झाली. आणि तिकडे दिरावर पैसे खाल्ले म्हणून आरोप झाला. पैसे भरण्यासाठी सगळे काही विकावे लागले. मुले व्यसनी निघाली. बायको श्रीमंत घरातील म्हणून सोडून माहेरी गेली. आता कुठे राहणार. दादावहिनींची आठवण झाली. आपण किती स्वार्थी होतो या विचाराने अस्वस्थ झाला होता पण कुठे शोधणार. गावी गेला. घर पडके झाले होते पण आधार होता.
त्याच वेळी सदाशिवने नवीन घरात प्रवेश केला. वास्तूशांत केली. उमाला भरपूर आहेर मिळाला. तर शेटजीनी सदाशिवला चारचाकी गाडी सप्रेम भेट दिली. आणि हे सगळे जिवतीच्या कृपेनेच. लक्ष्मी प्रसन्न होते ती पुजा अर्चा करून नाही तर प्रामाणिक प्रयत्न व नियत असेल तर. त्यामुळे जशी जिवतीमाय त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हाला आम्हाला होवो ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण…
— सौ कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..