नवीन लेखन...

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ८

बिपीनच्या मनात पुढचे आराखडे पक्के होते, आपला प्रवास जितका गुप्त राहील तितके त्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे होते. यामुळेच त्याने विमान प्रवास टाळून ५० तासाचा गाडीचा कंटाळा येणारा प्रवास पत्करला होता.

न्यू जलपईगुरी स्टेशनवर तो थेट एका लॉज वर गेला आणि दुसऱ्या नावाने रूम घेतली. या गावातूनच दार्जीलिंग, गंगटोक, (सिक्कीम ), खाटमांडू ( नेपाळ ). जयगाव, फुटन्शोलींग, थिंपू (भूतान) अशा विविध ठिकाणी जाणारे मार्ग निघतात, टॅक्सीचा मोठा तळ, देशातील व परदेशी प्रवाशांची प्रचंड वर्दळ, रस्ते म्हणजे बजबजपुरी होते. मौशुचे डोळे रडून थकले होते, चेहरा कोमेजून गेला होता, बाबा म्हणेल तशी वागत होती, आजूबाजूची माणसे पाहून ती इतकी बावरली होती, की शेवटी बाबाच बरा अशी परीस्थिती होती. त्यांच्या मराठीतील बोलण्याकडे कोणाचे लक्षही नव्हते. रस्त्यावरील बूथ मधून त्याने कलकत्ता ऑफीस मध्ये मृणाल सेनशी संपर्क साधला. भूतान मधील एका कंपनीचे पूर्ण माहिती मिळवली. जिच्याशी तिचा निकटचा संबंध होता, मौशूला खोलीत एकटी ठेऊन तो बाहेरील फोनवरून अनेक वेळा संवाद साधत होता. दोन दिवसांनी भारत भूतान सीमेवरील जयगाव गावी टॅक्सीने पोहचले. अतिशय गलीच्छ गाव, कोपऱ्या कोपऱ्यावर घाणीचे ढिगारे, घोंगावणाऱ्या माशांच्या झुंडी, धुळीचे साम्राज्य, आणि त्या वातावरणाला साजेसे टुकार हॉटेलमध्ये राहण्याकरता खोली घेतलेली, मौशुची दयनीय अवस्था होती, पण त्याला कसलाच पाझर फुटणार नव्हता. भूतान मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी फुटनशोलींग या सीमेवरील गावात परमिट मिळणार होते, त्याकरता भारतीय नागरिकत्व असल्याची कागदपत्रे फोटो द्यावे लागणार होते. ही सर्व तयारी गुप्तपणे मुंबईहून निघतानाच केली होती. एका इलेक्ट्रिक प्लांट मध्ये काम करण्याचे परमीट त्याच्या हॉटेलमध्ये पोहचविण्याची सोय मृणालने केलेली होती. ज्या टॅक्सीने त्याला जयगाव पर्यंत सोडले, त्या ड्रायव्हरला भरपूर पैसे देऊन आपणच त्या दोघांना गंगटोक येथील मुख्य चौकात सोडले असा निरोप जलपईगुरी येथील तो राहत असलेल्या हॉटेल मालका पर्यंत पोहचविण्याची चोख व्यवस्था केली होती. मौशूच्या मनातून आईची आठवण नाहीशी करण्यासाठी तो नाना पद्धती वापरत होता, निष्पाप मुलीच्या मनाचा चुराडा झाला होता.

दुसरे दिवशी सकाळी भुतानच्या तिबेटी सजावटीच्या भव्य गेट मधून फुटनशोलींग गावात प्रवेश केला. पुढे प्रवास करण्यासाठी आणखीन लागणारी महत्वाची कागदपत्र हातात मिळेपर्यंत येथेच थांबावे लागणार होते. कुइंगा या उत्तम हॉटेलमध्ये प्रशस्त खोली मिळाली होती. मुंबई सोडून ८ दिवस झाले होते, गतकाळ वेगाने मागे धावत होता, आई हा शब्दच काळ विसरायला लावणार होता, आता बाबा म्हणेल ती पूर्वदिशा होती, खोलीतील टीव्ही हे तिचे विश्व बनले होते, भूतान भूमीत एक कुसकरलेली कळी जाऊन पडणार होती ती कधी उमलणार होती का ?

— डॉ. अविनाश वैद्य.

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..