नवीन लेखन...

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १४

पारो हे ७००० फूट उंचीवरील अतिशय टुमदार गाव, सर्व बाजूनी डोंगर रंगानी वेढलेले आणी मधील सपाट पट्टीत उभारलेला आखीव विमानतळ, द्रूक एअरवेज ही भूतान सरकारची विमान कंपनी, दिल्ली, खाटमांडू, कलकत्ता या शरण जोडते. येथील धावपट्टीवर विमान उतरवताना वैमानिकाचे कौशल्य पणाला लागते,

पहाटे ६ वाजताच बिपीन व मृणालने थिंपू ते पारो असा ६६ किमी चा प्रवास आलेशान टॅक्सीने चालू केला. आज मृणालने आकर्षक पद्धतीने बंगाली साडी नेसलेली, उत्तम गळ्यातील हार त्याला साजेसा मेकअप मीटिंगची सूत्रे तीच चालवणार होती, भारतीय बायका कामात किती तरबेज आहेत हेही जर्मन पाहुण्यांना समजणार होते. त्यांचा प्रवास खोल दऱ, जंगल व संथ वाहणाऱ्या नदीच्या बाजूनी चालला होता, वाटेत वॅनगचू नदीवरील भव्य ब्रिज पाहण्याकरता दोघेही खाली उतरले होते. ब्रीजच्या कडेला पाटी होती ‘bridge constructed by gharpure and company Pune India. पुणे नाव वाचल्यावर बिपीन गतस्मृतीत हरवला, लग्नाच्या आधी तो व संगीता भर पावसात पुणे व आजूबाजूला मनमुराद भटकले होते, लग्नाच्या गाठी तेथेच बांधल्या गेल्या होत्या. भूतकाळाला क्षणात मागे सारत मृणालचा हात कुरवाळत तिच्या प्रेमात बुडून गेला. रस्त्यावर बसलेल्या एका छोट्या मुलाने मृणालच्या हातात सुरेख संत्री दिली, तिनी सोलून दिलेल्या प्रत्येक फोडीची गोडी चाखता तो प्रेमाच्या विश्वात रममाण झाला.

पारो गावातील आखीव सिमेंट रस्ते, दोन्ही बाजूनी शीशवी लाकडाची घरे, छोट्या बागा, अगदी युरोपातील छोटे गाव वाटावे. हे बघत त्यांची गाडी थेट विमानतळाकडे वळली. दोन जर्मन इंजिनीयर्स विमानातून नुकतेच उतरत होते. तेथून सर्वजण चुखा या वांगचू नदीवरील प्लांट कडे गेले. जर्मन कंपनी कडून work completion certificate मिळवायचे होते, या बाबतची सर्व कागदपत्रे सर्व डिझाईन माहिती बिपीन देत होता. मृणालने सर्व चोख व्यवस्था केलेली होती. पाहुणे कामावर एकदम खुश होते, रात्री सर्वांची झकास पार्टी हॉटेलच्या भव्य हॉलमध्ये चालू होती. व्हिस्की, वाईन यांचा आस्वाद घेत गप्पागोष्टी, हसणे चेष्टा मस्करी जल्लोषाचे वातावरण होते.

पार्टी संपल्यावर बिपीन व मृणाल एकमेकांना बिलगत हळूहळू आपल्या राहण्याच्या सुटकडे चालले होते, हवेतील गारठा चांगलाच वाढला होता, कॉफी पिण्याचे निमित्त साधून दोघे सूटच्या बाहेर बसले होते. वातावरणातील निस्सीम शांतता, चंद्र प्रकाशात नाहून निघालेला सूटचा परिसर, धुंद मस्त वातवरणात दोघे कॉफीचा एकेक घोट घेत होते. दोघांच्या मनातील कोंडलेल्या भावना उफाळून निघत होत्या, रात्र केव्हां सरली हे दोघांना कळलेच नव्हते, सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणात हिमशिखरे चकाकत होती, दोघांची थंडी अजून उतरली नव्हती, मृणालच्या खोलीचे कुलूप उघडलेच नव्हते.

थिंपूत मौशु आईची आठवण काढीत मुसमुसत जोगना बरोबर न संपणारी रात्र पुढे ढकलत होती. नियतीने मांडलेला हा क्रूर खेळ कधीच संपणार नव्हता का?

— डॉ. अविनाश वैद्य.

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 178 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..