नवीन लेखन...

भारतातला शेक्सपिअर  – राम गणेश गडकरी

मुठा नदी किनारी वसलेल्या उद्यानात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा होता. १९६२ मध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हा पुतळा होता. राम गणेश गडकरी स्मारक समितीने पुणे महापालिकेला हा पुतळा भेट म्हणून दिला होता. मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला. हा पुतळा मुठा नदीत फेकण्यात आला .

भारतात सुद्धा एक शेक्सपिअर जन्माला आला होता आणि त्यांचे नाव –राम गणेश गडकरी ! पण मला हे ‘भेटले’ ते ‘भेटले’ अशी अशुद्ध भाषा बोलणारी पैदास मोठ्या संख्येने वैचारिक गोंधळ घालत आहेत . त्यांना त्यांचे काय महत्व कळणार . मुर्खांना काच आणि हिरा सर्व सारखेच . यांच्या पैकी किती जणांनी गडकरींचे वाङ्मय वाचले आहे. महाराष्ट्रात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही हेच खरे आहे. गडकरींची हि कविता फक्त वाचावी आणि साहित्य संमेलनात फक्त हजार मतदानात निवडून आलेल्यांनी आपण कुठे बसतोय याचे आत्मशोधन करावे.

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥ धृ. ॥

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ।
अंजनकांचनकरवंदीच्या कांटेरी देशा ॥
भावभक्तिच्या देशा, आणिक बुध्दीच्या देशा ॥
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा, ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी
निशाणावरी
नाचतें करीं ॥
जोडी इहपरलोकांसी
व्यवहारा परमार्यासी
वैभवासि वैराग्यासी ॥
जरिपटक्यासह भगव्या झेंडयाच्या एकचि देशा ॥
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥ 1 ॥

अपर सिंधुच्या भव्य बांधवा ! महाराष्ट्र देशा ।
सह्याद्रीच्या सख्या ‘जिवलगा’ महाराष्ट्र देशा ॥
पाषाणाच्या देहीं वरिसी तू हिरव्या वेषा ।
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा ॥
तुझिया देहीं करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची ॥
मंगल वसती जनस्थानिंवी श्री रघुनाथांनी ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी… ॥2॥

भिन्न वृत्तिंची भन्न भिन्न हीं एक जीवसत्त्वें ।
तुझिया देहीं प्रकट दाविती दिव्य जीवतत्त्वें ।
चित्पावन बुध्दीनें करिसी तू कर्तबगारी ।
देशस्थाच्या खुल्या दिलाची तुजला दिलदारी ॥
कायस्थाचें इमान फिरवी रक्ताचा फेर ।
ठाक मराठी मनभट दावी तुझें हाडपेर ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी … ॥ 3॥

ठायीं ठायीं पांडव लेणीं सह्याद्रीपोटी ।
किल्ले सत्तावीस बांधिले सह्याद्रीपाठीं ॥
तोरणगडचा, प्रतापगडचा, पन्हाळगडिंचाहि ।
लढवय्या झुंझार डोंगरी तूंच सख्या पाही ॥
सिंधुदुर्ग हा, विजयदुर्ग हा, ही अंजनवेल ।
दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी … ॥ 4॥

तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणीकाेंडा ।
वहाण पायीं अंगि कांबळी उशाखालिं धोंडा ॥
विळा कोयता धरी दिंगबर दख्खनचा हात ।
इकडे कर्नाटक हांसतसे, तिकडे गुजरात ॥
आणि मराठी भाला घेई दख्खन कंगाल ।
तिकडे इस्तंबूल थरारे, तिकडे बंगाल ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी … ॥ 5 ॥

रायगडावर माय जिवाची गवळण बिनधोक ।
झोंक हिरकणी नांव ठेवुनी जाइ रोखठोक ॥
करीत पावन अर्पुनि पंचप्राणांचा पिंड ।
हिरडस-मावळचा श्रीबाजी, ती पावनखिंड ॥
करी रायगड रायरिचा तो जिजाइचा तान्हा ।
कोंडाण्याचा करि सिंहगड मालुसरा तान्हा ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी .. ॥ 6 ॥

रसवंतीच्या पहिल्या बाळा मुकुंदराजाला ।
पहिलावहिला अष्टांगांनीं प्रणाम हा त्याला ॥
शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरिच्या देशा
पुंडलिकांच्या, शिवरायांच्या, टिळकांच्या देशा ॥
अनंत कोटी ग्रंथ रचुनिया जोडि तुझ्या नामा ।
वाल्मिकीचें शतकोटी यश विष्णुदास नामा ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी .. ॥ 7 ॥

मयूर कविच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा ।
कवि कृष्णाच्या* निर्यमका हे महाराष्ट्र देशा ॥

*केशवसुत.

देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ ।
तिथेंच गीतारहस्य बसवी बुध्दीचा मेळ ॥
जिथें रंगलीं साधींभोळीं जनाइचीं गाणी ।
तिथेंच खेळे श्रीपादांची कलावती वाणी ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी …. ॥ 8 ॥

विकावयाला अमोल असली अभंगमय वाणी ।
करी तुझी बाजारपेठ तो देहूचा वाणी ..
तुला जागवी ऐन पहांटे गवळी गोपाळ
धार दुधाची काढित काढित होनाजी बाळ ॥
मर्दानी इष्काचा प्याला तुझा भरायासी ।
उभा टाकला सगनभाउ हा शाहुनगरवासी ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी… ॥ 9 ॥

प्रभाकराची जडण घडण कडकडित म्हणायाला ।
दो हातांचा मुजरा माझा तुळशीरामाला ॥
भीमथडीहुनि चहुंमुलखांवर फिरले धारकरी ॥
भीम थडीवर चहुंमुलखांतुनि जमले वारकरी ।
आळंदीच्या ज्ञानोबांची भिंत घेत धांव ॥
पुंडलिकांचें नांव चालवी दगडाची नाव ॥
गोलघुमट घुमवीत सारखा नवलाची भाक ।
जेजूरीवर चढी पायरी उभी नऊ लाख ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी ….. ॥ 10 ॥
कवी …राम गणेश गडकरी —

 

चिंतामणी कारखानीस

४ जानेवारी २०१७

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..