नवीन लेखन...

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे

जन्म. ३ जून १९७५ बीड जिल्ह्यात ताडसोना या लहानशा गावात.

त्यांचे पूर्ण नाव तुकाराम हरिभाऊ मुंढे. तुकाराम मुंढे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील सावकाराच्या कर्जात बुडाले होते. घरच्या संस्कारात तुकाराम मुंढे यांना प्रामाणिकपणा, सत्य आणि बेडरपणा शिकण्यास मिळाला. मुंढे हे अतिशय उज्वल विद्यार्थी होते. त्यांनी आपले उच्चशिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केले. त्यांचे इतिहास, सामाजिक शास्त्र मधून त्यांनी बीए ही पदवी प्राप्त केली, सोबतच राज्यशास्त्र घेऊन एमए पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००१ मध्ये त्यांनी राज्य सेवा परिक्षेत प्राविण्य मिळवले व त्यांना दुस-या दर्जाची वित्त विभागात नोकरी मिळाली. ही निवड प्रक्रिया काहीशी वेळखाऊ असल्याने त्यांनी दोन महिने जळगावमध्ये व्याख्याता म्हणून काम केले.

त्यानंतर मे २००५ ला यशदा पुणे येथे प्रशिक्षणादरम्यान ते केंद्रीय सेवा परिक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समजले. विशेष म्हणजे ते देशात २० वे आले होते आणि तेथून त्यांचा हा बेडर प्रवास सुरु झाला. तुकाराम मुंढे यांच्या सेवेची सुरवात सोलापूरातून झाली, नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली तिथून त्यांची बदली नांदेडला उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. २००८ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची CEO म्हणून निवड झाली. त्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेट दिली. त्यात त्यांना अनेक शिक्षक गैरहजर दिसले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सर्व शिक्षकांचे निलंबन केले. तेव्हापासून १०-१२ टक्के असणारे शिक्षकाचे गैरहजरीचे प्रमाण १-२ टक्क्यावर आले. वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केले. इतिहासात पहील्यांदाच CEO ने डॉक्टरला निलंबित केले होते. २००९ सालीच नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ पदावर करण्यात आली, हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केले होते. पुढे मे २०१० ला मुंबईला KVIC ला CEO म्हणून बदली झाली. नंतर त्यांची जालन्याला कलेक्टर म्हणून बदली झाली. जिथे जेल तिथे आपल्या कामांनी वेगळीच छाप पाडत असत. जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचे काम सहा वर्षापासून रखडले होते त्यांनी तीन महीन्यात ते करून दाखवून जालनाकरांची तहान भागवली.
पुढे २०११-१२ साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर पद सांभाळले. सप्टेंबर २०१२ साली त्याची बदली मुंबई, विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी झाली. त्यांच्या काळात १४३ कोटी रूपयांचा महसूल 500 कोटीवर गेला. जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी सोलापूरातील २८२ गावे घेतले. या गावातील कामे त्यांनी फक्त १५० कोटी रूपयांमध्ये केले. यात लोकांचे योगदान ५०-६० कोटींचे होते. वर्षाला ४०० टँकर लागणार्याच सोलापूरात टँकरची संख्या ३०-४० वर आली. सोलापूर मध्ये असताना मुंढे याना पंढरपूर येथील वारीची जबाबदारी देण्यात आली होती आणि मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. वारीच्या वेळी सर्वात मोठा धोका साथीच्या रोगांची शक्यता असते कारण १४-१५ लाख लोकं यावेळी वारीला हजेरी लावतात.त्यापैकी बहुतांश उघड्यावर शौचविधी करतात त्यातून नदी प्रदूषित होते. परंतु पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी असताना अवघ्या २१ दिवसात आषाढी वारीच्या वारकऱ्यांसाठी तीन हजार शौचालयाची व्यवस्था त्यांनी केली. त्याचवेळी CM सोडता इतर VIP दर्शन त्यांनी बंद केले. नवी मुंबई मनपा आयुक्तपदी असताना ‘आयुक्तासोबत चाला’ हा Walk With Commissioner चा कार्यक्रम जनतेत चांगलाच गाजला. रुजू झाल्यापासून त्यांनी कित्येक कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. अनेक अधिकाऱ्यांचे बेशिस्त वागणूक, कामातील अनियमितता इत्यादी कारणामुळे निलंबन केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी नवी मुंबई मधील वाहतुकीची अडचण ओळखता, रस्त्याच्या बाजूला बसणारे फेरीवाले व अनधिकृत विक्रेते यांना चाप लावला ज्यामुळे नवी मुंबईकर सुखावला खरा,पण अनेकांचा रोषही त्यांनी ओढून घेतला. पुढे त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली. ते पुणे महानगरपालिकेच्या PMPML चे अध्यक्ष असताना महीन्याला PMPML ची सहा लाख लोकांची असणारी ग्राहक संख्या नऊ लाखांवर गेली. पुणे परिवहन बस ही देशातील पहिली रियल टाइम इ -टिकीटींग बस म्हणून दावा करण्यास सज्ज झाली होती. पुण्या नंतर त्यांची नाशिक येथे, बदली झाली. नाशिकचे आयुक्त असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळं लोकप्रतिनिधी आणि मुंढे यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला होता. अखेर मुंढे यांची बदली करण्यात आली. त्या नंतर तुकाराम मुंढे यांची मुंबईत मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची नियोजन विभागाच्या सहसचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तुकाराम मुंढे यांच्या आपल्या पंधरा वर्षाच्या नोकरीत चौदा वेळेस बदल्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी तुकाराम मुंढे हे नागपूर महानगरपालीकेचे आयुक्त म्हणून काम बघत होते. पण बदली झाल्याने ते सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव म्हणून काम बघत आहेत.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..