नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १३)

आपल्याला घडविणारे अनेक आशिर्वादाचे हात असतात त्यांच्याशी सदैव कृतज्ञ रहावं! म्हणून थोडासा व्यक्त होतो आहे .

जन्म झाल्यापासूनच आपण सर्वांच्याच आशीर्वादातून फुलत असतो ,उमलत असतो. घरी जन्मदाते मातापिता संस्कार घडवितात ! तर बाह्य जगतात आपले गुरुजन , शेजारीपाजारी , नातेवाईक ,मित्र मैत्रीणी आपले मार्गदर्शक गुरु असतात . त्यांच्या समवेत आपले जीवन घडत असते हे वास्तव आहे . ते आपण नाकारु शकत नाही. तेंव्हा विवेकी विचाराअंती आपण या सर्वांशीच सदैव नम्र आणी कृतज्ञ असावे असे मला वाटते. म्हणूनच जी माणसं आठवली त्यांच्याबद्दल संक्षिप्त लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न या सर्व भागातून मी करतो आहे .

कुणी मला म्हणाले तुम्ही अष्टपैलु आहात ! कुणी म्हणाले तुम्ही अष्टावधानी आहात ! कुणी म्हणाले तुम्ही हरफ़न मौला आहात ! तर कुणी म्हणाले तुम्ही म्हणजे एक कलंदर व्यक्तिमत्व आहात ! ….पण अगदी खरं सांगायचं झालं तर आजही मी सर्वसामान्यच आहे … *इदं न मम*…आहे तितुके देवाचे ..! एवढेच मी म्हणेन ! हे सर्व सहवासाचे फलितदान आहे !….

मी १९५८ साली ५ व्या इयत्तेत म्युनिसिपल शाळा क्रमांक १ (राजवाड़ा ) सातारा येथे शिकत होतो . कै बिंदुमाधव गुरव हे करारी शिक्षक होते. सर्व विषय उत्तम शिकवित असत. एकदिवस १ ऑगस्ट लोकमान्य टिळक जयंती निमित्त शाळेत कार्यक्रम होता . मला म्हणाले तुला आज दुपारी लोकमान्य टिळक याचेवर थोडक्यात भाषण करायचे आहे … ! मी म्हटले गुरुजी मला नाही बोलता येणार ! ते म्हटले कां ?… तू परवाच शाळेत नाटकात पोलिसाचे काम केले होते नां ? आणि बाहेर मेळ्यात नाचतोस…! गाणी म्हणतोस ..! ते जमतय ! मग आता काय झालं ? मुकाटयानं भाषण करायचं ! तुला लोकमान्यांचा धड़ा आहे नां ! चल मागे शेवटी जावून वाचत बैस ! पाठ कर !..मी रडवेला झालो ! पण काही उपयोग झाला नाही . शेवटी बोलायची वेळ आली ! घाबरलो होतो …टेबल खुर्चीवर पाहुणे होते. गुरुजींनी बोल ..सुरु कर म्हटले ..कसे तरी घाबरत , घाबरत मी सुरुवात केली ….
सर्व मान्यवरांना नमस्कार. आज लोकमान्य टिळक जयंती निमित्त मी माझे दोन शब्द बोलत आहे …! “ज्याप्रमाणे चिखलात कमळ उगवते त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी एक कमळ उगवले ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक . स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ..! तो मी मिळवणारच ..! आणि मी शेंगा खाल्ल्या नाहीत ! मी टरफले उचलणार नाही. जय भारत असे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो “….
एवढेच हे माझे घाबरत घाबरत केलेले पहिले भाषण आणि त्यासाठी मला कटाक्षाने दरडाऊन भाषण करण्यास लावणारे माझे शिक्षक (गुरुजी) कै. बिंदुमाधव गुरव आजही आठवतात ..

पुढे हळू हळू मी थोड़े थोड़े बोलू लागलो ..सराव झाला ..खुप काळ लोटला..! पण पुन्हा एक दिवस एका समारंभात निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी मला अध्यक्ष म्हणून बोलावले होते . मी व्यासपीठावर होतो तर माझे गुरुवर्य बिंदुमाधव गुरव गुरुजी हे पहिल्या रांगेत बसले होते त्यांच्या निबंधाला प्रथम पारितोषक मिळाले होते ..! नियती कशी असते पहा..! मी तर त्यांचा विद्यार्थी ! त्यांनी मला घडविले होते ..! मी सदैव त्यांचा कृतज्ञच होतो .आणि आजही आहे ..! मला ती गोष्ट प्रशस्त वाटली नाही . आयोजकांना सांगून मी थकलेल्या गुरुवर्य बिंदुमाधव गुरव गुरुजींना व्यासपीठावर माझ्या जागी बसवून त्यांचा यथायोग्य सत्कार करून त्यांच्याच हस्ते समारंभातील पारितोषक वितरण केले ..आणि त्यांच्या बद्दलची कृतज्ञता मी माझ्या व्याख्यानात व्यक्त करून त्यांना सर्वांसमोर नमस्कार केला.

असे शिक्षक लाभणं हे केवढे भाग्य !!! तसे जीवनात आपल्याला लाभेलेले सर्व गुरु , शिक्षक आणी त्यांचे मार्गदर्शन हे निश्चितच दीपस्तंभा सारखे असते. आणि प्रत्येक क्षेत्रातील आपल्या यशात या मार्गदर्शक गुरुवर्यान्चे महत्व अनन्यसाधारण असते. त्यांच्याशी आपण सदैव कृतज्ञ असणे महत्वाचे…!!!
प्रत्येकाच्या विद्यार्थी जीवनात लाभलेले सर्वच शिक्षक मग ते प्राथमिक शिक्षक असोत , माध्यमिक शिक्षक असोत किंवा महाविद्यालयीन शिक्षक ( प्राध्यापक ) असोत सारेच वंदनीय आहेत हे त्रिवार सत्य !!!

असे अनेक प्रसंग आहेत ..पण लेखन मर्यादा आहे .

©विगसा
२२ – ११ – २०१८.

(पुणे मुक्कामी)

Avatar
About विलास सातपुते 123 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..