नवीन लेखन...

रंग चिकित्सा – मृगशीर्ष नक्षत्र

लेखांक सहावा

हरिणीच्या मस्तका सारखीआकृती या नक्षत्राची दिसते म्हणून या नक्षत्राला मृग किंवा मृगशीर्ष किंवा मृगशिरा या नावाने संबोधले जाते. या नक्षत्राला आकाशात तीन तारकांच्या आकारात पाहता येते.

सत्तावीस नक्षत्रांच्या मालिकेत पाचव्या क्रमांकावर हे नक्षत्र येते. राशींचा विचार केल्यास वृषभ आणि मिथुन राशींच्या व्यक्तींचा जन्माच्या वेळी, पहिल्या २ चरणासाठीवृषभ आणि नंतरच्या दोन चरणांसाठी मिथुन राशी आहे. कष्ट आणि शृंगार वा मौजमजा करणाऱ्या अशा दोन स्वभावाचे व्यक्तींचा राशींसाठी मृग नक्षत्राची योजना आहे. शीतरंग म्हणजे निळा, जांभळा, हिरवा, हिरवट जांभळा, पिवळट हिरवा, पोपटी या रंगांचा सकारात्मक प्रभाव या नक्षत्रावर पडतो. या नक्षत्रावरच पावसाचा जोर अधिक असतो. त्यामुळे या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींच्या प्रकृतीवर जलतत्वाचाच प्रभाव अधिक असतो.

या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचं जीवन हे चंद्र प्रभावाखाली येतं.त्यामुळे चंद्र कलांचं वाढत वाढत जाणं आणि कमी कमी होत जाणं जसं दर महिन्याला दिसत असतं तद्वतच या नक्षत्रावर जन्मझालेल्या व्यक्तींच्या बाबतीत असतं. मग प्रकृती असो वा आर्थिक गती असो त्यातही कमी-अधिक प्रमाण घडत जातो.

ब्रह्मदेवाने अत्रीऋषींना प्रज्ञा उत्पन्न करण्याची आज्ञा दिली. अत्रि ऋषी तपश्चर्येला बसले. त्यांनी  तेजाचे ध्यान करण्यास सुरुवात केली.त्या ध्यानाच्या वेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू निघाले. ते अश्रू अष्ट दिशांनी प्राशन केले. त्यामुळे त्या गर्भवती राहिल्या. ऋषींच्या तेजाचे त्यांच्या उद्री राहिलेले गर्भ दिशांना पेलता आले नाहीत म्हणून त्यांनी त्या गर्भाचा त्याग केला.ब्रह्मदेवाने हे सर्व गर्भ एकत्र करून बालक बनविले ते बालक म्हणजे चंद्र. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र दोष असल्यास त्या व्यक्तीला म्हणूनच खूप त्रास होऊ शकतो.

या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी चंद्रप्रकाशात अधिक वेळ थांबावे. यांच्यासाठी चंदेरी, पांढरा, इतर शीतलरंग लाभदायी ठरतात. या व्यक्तींनी पूर्णचंद्र अंमल असलेल्या रात्री चंद्रा कडे पाहात महत्त्वाचे निर्णय घेतल्यास लाभ होईल. सर्व वनस्पतींचा तो कारक आहे. वनस्पती आणि मानवी मन चंद्रामुळे उद्दीपित होतात.

प्राचीन ऋषीमुनींनी चंद्राची प्रार्थना शोधून काढलेली आहे. ओम चंद्रमसे नमः, ओम सोमाय नमः हा जप या व्यक्तींनी सतत सुरू ठेवला तर मन व शरीर सुदृढ होते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती लेखक, कार्यनिपूण, अहंकारी, व्यावसायिक बुद्धी,स्वार्थी बुद्धीच्या, उत्तम स्मरणशक्तीच्या, नेतृत्व गुण असलेल्या, कामुक असतात.

या नक्षत्राचा वृक्ष, खैर खदिर अर्थात विड्याच्या पानात जो कात टाकतो तो कात होय.या व्यक्तींनी खैराच्या झाडाजवळ जाऊन वा अथ मृगशिरोत्पन्न रोगशांती: || हा जप केल्यास झाड नसल्यास त्याचा फोटो देवाच्या फोटो प्रमाणे समोर ठेवून, खिशात ठेवून अद्भुत परिणाम अनुभवायला मिळतात.

याशिवाय ॐ इमं देवा असपत्न सुबध्वं महते क्षत्राय महते ज्यैष्ठ्याय महते जानराज्यायेन्द्रस्येन्द्रियाय | इममुष्य पुत्रमुष्यै पुत्रमङ्य विश एष वोऽमी राजा सोमोऽस्माकं ब्रह्मणानां राजा | ॐ चन्द्रमसे नमः | शुक्ल यजुर्वेद ९.४० वर नमूद केलेल्या रंगाचे पेहराव करून वरील जोब या व्यक्तींनी केल्यास फारच लवकर त्यांना इच्छित काम पूर्ण झाल्याचा आनंद मिळतो.

शुभं भवतु

प्रा. गजानन शेपाळ

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 22 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..