नवीन लेखन...

नटसम्राट

४८ वर्षे झाली ’नटसम्राट’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला.

२३ डिसेंबर १९७० रोजी धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व मा.पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे, नाना पाटेकर यांनी नटसम्राट मधील अप्पासाहेब बेलवलकर रंगवले आहेत.

नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले आहे. मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.

या नाटकाच्या प्रयोगात अप्पासाहेब बेलवलकारांची भूमिका करणाऱ्या नटाला मानसिक थकवा येतो. असे असून २७ ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी पावणेसहा वाजता सुरू झालेले आणि एकापाठोपाठ सलग चाललेले ’नटसम्राटचे’ एकाच नटसंचातले एकूण आठ प्रयोग २८ ऑगस्टच्या दुपारी दीड वाजता संपले. हे प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात एकूण ३१ तास ४५ मिनिटे चालले होते. हा बहुधा जागतिक विक्रम असावा. ’तीर्थराज’, ’रंगमैत्री’ आणि दादा कोंडके फाउंडेशन यांनी हे प्रयोग रंगमंचावर सादर केले होते.

गिरीश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते व अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिकाही केली होती. मराठी रंगभूमीवर आपल्या कथा आशयाने अजरामर ठरलेले नटसम्राट हे नाटक आता मराठी चित्रपटाच्या रूपातही आपल्यासमोर आला आहे. नाना पाटेकर निर्मित आणि अभिनीत ‘नटसम्राट’ हा चित्रपट. हा चित्रपट १ जानेवारी २०१६ ला प्रदर्शित झाला आहे. आपल्या अभिनयाने अनभिषक्त सम्राटाची पदवी मिळवलेला अभिनेता नाना पाटेकर या सिनेमात प्रसिद्ध आप्पासाहेब बेलवलकर यांच्या भूमिकेत दिसले आहेत. या नाटकातील एका वाक्याने अवघ्या मराठी जनमानसावर आपला ठसा उमटवला आहे. ते वाक्य म्हणजे ‘कुणी घर देता का घर…’

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..