नवीन लेखन...

राममंदिर उभे रहातेय

जय श्रीराम.

त्या निमित्ताने असंख्य उपक्रम केले जात आहेत.समाज जोडला जातोय. काही जणांना हा सगळा अतिरेक वाटतो..राजकारण वाटते.प्रत्येकाची मते वेगळी भूमिका वेगळी.सर्व मतांचा आदर करुन मी मला काय वाटतेय ते सांगण्याचा प्रयत्न करते. राममंदिर उभे रहातेय ही गोष्ट सहज साध्य नाही. यवनी आक्रमणाने आपली देवळे राऊळे श्रध्दास्थाने नष्ट केली. महाराष्ट्रात सुध्दा..कोल्हापूर , तुळजापूर..पंढरपूर..कोणतेही देवस्थान सोडले नाही.

आज रामजन्म भूमीवर राममंदिर उभे रहातेय ही असामान्य घटना आहे..हा बदल एका दिवसात , रात्रीत झालेला नाही.लाखो लोकांची इच्छा शक्ती..हजारो लोकांचे परीश्रम या मागे आहेत. एक पोस्ट वाचनात आली.

1990 साली दादरहून ज्या महिला स्वयंसेवक अयोध्येसाठी रवाना झाल्या त्यातील या एक शालिनी डबीर .या महिलांना अयोध्येपासून साधारण 50-60 किलोमीटरवर एका शाळेत बंदिस्त करण्यात आले होते. काही कारसेविका तिथून पळून गेल्या व पायी चालत हे अंतर कापत अयोध्येत दाखल झाल्या. पोलिसांनी चालवलेल्या गोळ्या, अश्रूधूर व लाठीचार्ज याचा सामना केला खरा पण बाबरी वर भगवा ध्वज फडकताना पाहिला.
आज 96 वर्षांच्या शालिनी डबीर यांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण, अक्षत कलश तसेच राममंदिराची सुबक प्रतिकृती भेट मिळाली. रामजन्म भूमीवर राममंदिराचा ध्यास घेतलेले असे हजारो लोक आहेत.त्यांच्या कार्याची नोंद त्यांचा यथोचित सन्मान करणे ह्यात कोणते राजकारण आहे? आज धर्मनिरपेक्ष म्हणवल्या जाणाऱ्या देशात येवढी मोठी घटना घडत असताना अनेकांचा विरोध सहन करावा लागतोय..अनेकांचा बाबरी मशिद पाडून मंदिर उभे करायला विरोध आहे. मंदिराची गरज काय ,? त्याने काय साध्य होणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत..हा सगळा विरोध मोडून काढत मंदिर उभे करणे ही फार मोठी घटना आहे.

कारसेवा , मंदिरासाठी एक विट , एक रुपया प्रतिज्ञा पत्र अश्या अनेक टप्प्यावर संघटन होऊ लागले ..विश्व हिंदू परिषद..ने प्रचंड जनजागरण केले..हजारोंचे प्रयत्न आहेत यामागे. कारसेवकांवर झालेला हल्ला..अनेकांनी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून दिलेला आपला बहुमूल्य वेळ..अनेकांनी कोणताही गाजावाजा न करता केलेली आर्थिक मदत …या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर निर्माण होणारे मंदिर .ही असामान्य घटना आहे. आता त्या अनुषंगानेच अनेक कार्यक्रम आयोजित केले…अगदी एक धागा विणणे , रांगोळ्या , कलशपूजा , मिरवणूका आमंत्रण..वगैरे अगणित कार्यक्रम या सगळ्यातून आपली संघटनात्मक ताकद दाखवली जात आहे. जेव्हा इतर धर्माचे लोक हे करतात तेव्हा आपल्याला हे प्रश्न पडत नाहीत. आज हा आपल्याच देशात आपल्याच धर्मावर होणारा अन्याय गाडून आपण आपले स्थान निर्माण करतोय. सामुदायिक रामरक्षा पठण ,रामनाम यात वाईट काय आहे..डी.जे.लाऊन नाचत तर नाहीत ना?रामनामाचा धागा जोडला जातोय..हा एक संस्कार आहे. सामुदायिक प्रार्थना एक उर्जा आहे ..त्यात सकारात्मक ताकद आहे. .हे मान्य करावेच लागेल. आज रामनामाने हिंदुराष्ट्र जोडले जातंय..संघटनात्मक ताकद कोणत्याही प्रकारचा हिंसाचार , गैरवर्तन न करता काय करु शकते हे आपल्या लक्षात येतंय. स.प.काॅलेजच्या याच मैदानावर गीता पटणारा विश्वविक्रम घडला.अत्यंत शिस्त उत्तम नियोजन याचा वस्तुपाठ निर्माण झाला. आता त्याच मैदानावर लाखोंच्या उपस्थितीत रामरक्षा पठण मंत्र जप होणार आहे.यात वावगे काय आहे? रामरक्षा हा सिध्द मंत्र आहे..म्हणण्याचे तंत्र आहे. आज आपल्या देशात कोणत्याही राज्यात जा रामरक्षा एकाच सुरात म्हटली जाते..अभिमानास्पद आहे हे सगळे..रामनाम हा देशाला जोडणारा धागा आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने खलनिर्दालन करुन रामराज्य स्थापन करणारे , नराचा नारायण झालेले प्रभुरामचंद्र आज परत सन्मानाने आपल्या जन्मभूवर येत आहेत..हा खूप मोठा क्षण आहे आपल्या देशाची अस्मिता जागृत करणारा. तो साजरा करायलाच पाहिजे. हे करताना कुठेही बेशिस्त नाही..अक्षत देण्यात ही पावित्र्य आहे..श्रध्दा आहे..कुठल्याही प्रकारची सक्ती नाही.दबाव नाही.सगळा आनंदाचा खुशीचा मामला आहे.

आता प्रश्न उरतो तो राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा .. लोकसभेत दोन सीट ते पूर्ण बहुमत हा प्रवास एखाद्या पक्षाने नेटाने केला आहे..त्याला प्रत्येकजण साक्ष आहे. त्या पक्षाच्या तीन पिढ्या प्रामाणिकपणे काम करत आहेत..मा.पंतप्रधान ही हे माझे एकट्याचे यश नाही अनेकांची तपश्चर्या या मागे आहे हे विनयाने सांगतात.

तीन पिढ्यांनी कार्य यज्ञ केलाय ..आज त्यांना सफलता मिळत आहे. अजून काही चांगले करण्याची बलसागर भारत उभारण्याची इच्छा आहे..त्यासाठी सत्ता हवी आहे..ती लोकशाही मार्गाने …केलेल्या स्वप्न पूर्तीच्या आनंदाचे प्रगटीकरण हे राजकारण असेल तरी मला तरी त्यात काही वावगं वाटत नाही. प्रत्येकाने हा ऐतिहासिक विजय साजरा केला पाहिजे.

धनश्री जोशी.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..