नवीन लेखन...

वेदना

वेदना म्हणजे काय? वेदना म्हणजे पेशींना झालेल्या इजेमुळे आपल्याला आलेला पण नकोसा वाटणारा भावनिक अनुभव. आपले शरीर यावर प्रतिक्रिया देते आणि पेशींची इजा रोखण्याचा प्रयत्न करते.

वेदनेचा उगम – आपल्या शरीराकडून मेंदूकडे सतत संदेश जात असतात. शरीरातील पेशींना इजा झाल्यास तसा संदेश Nociceptor या मज्जापेशी (Sensory Neurons) ग्रहण करतात व मज्जारज्जूद्वारे मेंदूला पाठवतात. तापमान, दाब व रसायनाचा संपर्क याविषयीचे संदेश ग्रहण करणार्‍या ग्राहक पेशी वेगवेगळ्या असतात. हे संदेश शरीराच्या पृष्ठभागाजवळील पेशी व पेशीसमूहांकडून वा अंतर्गत अवयवांकडून वा मज्जातंतूंकडून निघतात व मेंदूकडे पोचतात.

वेदनेचा कालावधी – वेदना थोड्या काळापुरती वा खूप काळापासूनची असू शकते.

वेदनेचा प्रभाव – वेदना शरीराच्या एखद्या भागापुरती असते वा सर्व शरीरात जाणवणारी (फ्लूचा ताप) असते.

वेदनेचे वर्णन – डोकेदुखी, दाढदुखी, घशातील खवखव, पोट दुखणे, स्नायू मुरगळणे, कापणे, भाजणे, खरचटणे, हाड मोडणे, बधीरता येणे असे वेदनेचे वर्णन केले जाते. काही वेळा वेदनेचे वर्णन करता येत नाही.

वेदनेचे प्रकार – शरीरिक व मानसिक असे वेदनेचे प्रकार असतात.

१. शारीरिक वेदना

पुढील प्रसंग पहा.

1 चालताना ठेच लागते व पायाचा अंगठा ठणकतो. राग आल्यावर आपण पायाने वस्तू लाथाडतो तीही ठेचच असते.
2 झाडावरून गुलाबाचं फूल तोडताना काटा लागला तर जखम होते. रक्त तपासणीसाठी बोटाला सुई टोचली की जखमच होते.
3 हातावर गरम पाणी पडले तर आपण हात बाजूला घेतो. पाणी किती गरम आहे ते पाहण्यासाठी आपण मुद्दाम गरम पाण्यात हात घालतो.

वरील तीन उदाहरणात पहिल्या भागात दिल्याप्रमाणे घडले तर आपल्याला वेदना जाणवते, पण त्यापुढे लिहिल्याप्रमाणे घडले तर वेदनेची तीव्रता कमी होते. वरील प्रत्येक जोडीत शारीरिक क्रिया व परिणाम सारखेच आहेत. मग वेदनेत फरक का पडतो? कारण मेंदूतील प्रक्रियेनंतर वेदना रूप घेते. शरीराकडून येणार्‍या संदेशांची गोळाबेरीज केली जाते. ही वेदना आहे का? असल्यास कितपत तीव्र आहे? शरीराने यावर कसा प्रतिसाद दिला पाहिजे ते मेंदू ठरवतो. पायाला ठेच लागल्याचा संदेश जातो तसेच आपण पायाचा अंगठा दाबून धरल्याचाही संदेश जातो. परिणामी वेदनेची तीव्रता कमी होते. एकाच क्रियेबाबत (काटा बोचणे) प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. कोणी आकांडतांडव करतो तर कोणी शांतपणे सहन करतो. वेदना दोघांनाही जाणवत असते, पण शारीरिक प्रतिक्रिया वेगवेगळी दिसते. दोघांपैकी कोणालाही खरे वा खोटे ठरविता येत नाही. कारण वेदनेचे मोजमाप करणे अजून शक्य झालेले नाही. रक्तदाब, ताप वगैरे मोजण्यासाठी जशी उपकरणे आहेत तशी वेदना मोजण्यासाठी नाहीत. डॉक्टरही रुग्णाला अनेक प्रश्न विचारून माहिती घेतात व रुग्णाने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. कोणत्याही प्रकारची चाचणी यासाठी उपयुक्त ठरत नाही. (आठवा आपली हुशारी. शाळा टाळण्यासाठी पोटात दुखतंय, डोकं दुखतंय म्हटल्यावर पालक व शिक्षक चॅलेज करू शकलेले नाहीत. आजही करू शकत नाहीत). वेदना होतील याचा अंदाज असल्यास वेदनांची तीव्रता कमी होते. असा अनुभव लस घेताना सर्वांनी घेतला आहे, कारण सुई टोचणार हे माहीत असते. यावेळी मेंदूचा Anterior Insula हा भाग सक्रीय असतो. चाचण्यांतून पुश्कळशा वेदनांचे निदान होते व औषधांनी त्या बर्‍या होतात. काहींना नसलेल्या अवयवांकडूनही वेदना जाणवते. गँगरीनमुळे कापावा लागलेला किंवा अपघातात गमावलेला हात वा पाय दुखत असल्याच्या तक्रारी डॉक्टरांकडे येत असतात. मेंदू हा शरीराचा अवयव आहे. पण Nociceptor या मज्जापेशी मेंदूत नसतात. त्यामुळे मेंदूला वेदना होत नाहीत. कवटी ऊघडलेला रूग्ण ऑपरेशन सुरू असताना डॉक्टरांशी बोलू शकतो.

वेदना चांगली की वाईट?

वेदना आपल्या बरोबर आयुष्यभर असतात. त्या वाईट असतात किंवा त्यांचा काय उपयोग असतो असे वाटणे साहजिक आहे. जखमेमुळे झालेली वेदना हळूहळू कमी होत कालांतराने नाहीशी होते. काही वेदना टिकून राहतात. वेदना आपल्याला शिकवते, आपल्या स्मृतीत राहते. बरी होत असलेली जखम ठणका देत असते तेव्हा ती सांगत असते की ‘अजून काळजी घेतली पाहिजे’. स्मरणातील जखम आठवण करून देते की, पुन्हा बोट कापले तर परीक्षा देता येणार नाही. या झाल्या शारीरिक वेदना.

२. मानसिक वेदना

मानसिक वेदना या शारीरिक वेदनांपेक्षा वेगळ्या असतात. याचे अनेक उपप्रकार आहेत. प्रियजनांचा विरह, स्वजनांकडून झालेले दुर्लक्ष, अपमान, रोजगार जाणे, भुकंप, पूर यासारख्या घटना मनावर परिणाम करतात. मनाला वेदना होतात, यातना होतात (मेंदूला नव्हे). परिस्थिती बदलली तर ही वेदना काही प्रमाणात दूर होऊ शकते. Dorsal Anterior Cingulate Cortex (DACC)हा मेंदूचा भाग वगळले जाण्याच्या वेदनेशी संलग्न असल्याचे fMRI ने समजले आहे. पण शरीरात जशी वेदनेची जागा दाखविता येते तशी मानसिक वेदनेची जागा ठरलेली नसते. हा भावनांचा खेळ असतो. भावना जरी ऍमिग्डालाशी निगडित असल्या तरी मानसिक वेदनेचा अपचार ऍमिग्डालावर करता येत नाही. समुपदेशनाच्या जोडीने औषध घेऊन फायदा होऊ शकतो. रुग्णामधील मानसिक असंतुलन शरीरिक लक्षणांद्वारे निदर्शनास येते. पण हे मान्य करण्यास रुग्ण सहसा तयार नसतो. रूग्ण शारीरिक चाचण्या हव्या तेवढ्या करेल, अनेक डॉक्टरांकडे जाईल पण मानसोपचाराचा मार्ग स्वीकारण्यास नकार देतो. एका रुग्णाला वेगवेगळ्या शारीरिक वेदनांशी सामना करावा लागत होता. असंख्य चाचण्या, अनेक डॉक्टर केले तरी शारीरिक व्याधीचे निदान झाले नाही. नंतर रूग्ण मनासोपचार तज्ञाकडे गेला. प्रश्नोत्तराचे वेळी, रुग्णाने खूप काळ भावना दाबून ठेवल्या होत्या (Repression) हे मानसोपचार तज्ञाला समजले. शारीरिक वेदनांचे मानसिक कारण समजले. समुपदेशनाद्वारे रूग्णाने विचार करण्याची पध्दत बदलली व तो पूर्णपणे बरा झाला.

ज्या ताणतणावांचा आपल्याला त्रास होतो त्या तणावांपासून दूर राहण्यासाठी मन संरक्षक पध्दत वापरते (Repression). ज्या गोष्टी आपल्याला वा समाजाला मान्य नसतात त्या सूप्त मनात दडपल्या जातात. अशी गोष्ट जेव्हा जागृत कक्षेत येते तेव्हा तिचे शारीरिक त्रासात रूपांतर होते. आर्थिक तणाव, अपेक्षाभंग, मतभेद यामुळे मानसिक त्रास उद्भवतात. कंबर दुखणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात. रुग्णांशी दीर्घकाळ संवाद करून त्रासाची मानसिक कारणे शोधता येतात. रुग्णाने योग्य द्ष्टीकोन ठेवला तर दबलेल्या भावनांचा निचरा होतो व रुग्ण ठीक होतो.

— रविंद्रनाथ गांगल

 

                 

शारीरिक वेदना                                           मानसिक वेदना

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

2 Comments on वेदना

  1. खूपच छान विवेचन केले आहे.
    वेदना दोन प्रकारच्या असतात हे विस्लेषण मनावर चांगले ठसेल असे लिहिले आहे.
    खूप चांगला व अभ्यासपूर्ण लेख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..