नवीन लेखन...

लडाख मधील पेंगौंग लेक

(tso} tso means lake in tibetian language.

पृथ्वीवरील स्वर्गच उतरलेला आहे की काय अशी वाटणारी जागा म्हणजे १४२७० फूट उंचीवरील ११० किमी लांब व ५कीमी रुंद खार्या पाण्याचे सरोवर, लेह पासून १५५ किमी. ६ तासाचा प्रवास १७८०० फुटावरील बर्फात गाडलेल्या चांगला पास मधून होतो.

लक्षावधी वर्षापूर्वी हा प्रदेश विशाल समुद्र होता, प्रचंड उलथापालथ झाल्याने वालुकामय प्रदेश, पिवळट मातीचे डोंगर,व खारे पाणी असलेले सरोवर,पण थंडीत पूर्ण गोठ्णारे.विस्तार पश्चिम बाजुनी लडाख पासून थेट पूर्वेला तिबेट पर्यंत,लेकच्या ३० टक्के भागावर भारताचा हक्क तर ७० टक्के चीनच्या ताब्यात.१९६२ च्या तुंबळ युद्धात हे सरोवर रक्तरंजीत झालेले तेंव्हा पासून अती संवेदनशील विभाग,परमीटची गरज.बोटींगची परवानगी नाही, काठाने फक्त ३ किमी.जाण्यास परवानगी.

दुपारचे १२ वाजलेले,६ तासाचा प्रवास संपत येत होता. गाडीने एक वळण घेतले आणि समोर संथ निळ्या पाण्याचा समुद्रच पसरलेला.तिन्ही बाजुनी मातकट,पिवळसर काळपट अशा विविध छटांच्या डोंगररांगा, काहींच्या माथ्यावर बर्फाचे चढलेले मुकुट, आकाशाची स्वच्छ निळाई, त्याला शोभा आणणारे पांढरे ढगांचे आरामात पसरलेले पुंजके,मधेच डोकावणारा सूर्य,वाहाणारे थंड गार वारे,पाण्याचे सतत बदलणारे रंग, निळ्या,हिरव्या काळपट पांढऱ्या सर्व रंगांची उधळण चालू होती.डोंगरांवर सावल्यांचा खेळ. तासभर मंत्रमुग्ध झालो होतो.शब्द अपुरे होते,फोटो काढून तृप्त झालो होतो,काठावर पांढरी कबरी रंगाची मुलायम पसरलेली वाळू,त्यातील एक पट्टा फर्लांगभर सरोवराच्या आत गेलेला होता.पाण्याची खारट चव घेत,वाळूतून फिरण्याचा अनोखा अनुभव आणि समोर पाण्याचे फिरते रंग पाहून डोळ्यांचे पारणे फिटले होते.आकाशात वा पाण्यात एकही पक्षी दिसत नव्हता.कुठूनही कसलाच आवाज येत नव्हता,खरोखर स्वर्गातील नंदनवन आमच्या समोर अवतरले होते.

लेक पाहाताना अरुणाचल प्रदेश डोळ्यासमोर आला.येथून २५०० किमी दूर तवांग येथील सेला पास जवळचे पॅरेडाईज लेक त्याचे संपूर्ण निळे पाणी आणि सर्व बाजुनी पसरलेले बर्फ. दोन लेकची विविधता पण मनाला सारखाच आनंद देऊन गेले.

डॉ. अविनाश केशव वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 50 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..