नवीन लेखन...

मणिपूरचे लुकवाक लेक

३० ते ४० किमी परीघाचे गोड्या पाण्याचे सरोवर थेट क्षितीजापर्यंत पसरलेले,यात विविध आकाराची अनेक बेटे तरंगत होती. रात्रभरात ही बेटे तरंगत जात आपली जागा बदलतात. दुसरया दिवशी वेगळ्याच भागात दिसतात. पानवेलींच्या जाळ्यामुळे ती उभी राहतात. […]

लडाख मधील पेंगौंग लेक

पृथ्वीवरील स्वर्गच उतरलेला आहे की काय अशी वाटणारी जागा म्हणजे १४२७० फूट उंचीवरील ११० किमी लांब व ५ कीमी रुंद खार्या पाण्याचे सरोवर, लेह पासून १५५ किमी. ६ तासाचा प्रवास १७८०० फुटावरील बर्फात गाडलेल्या चांगला पास मधून होतो. […]

ओरिसातील चीलिका लेक

ओडिसा वा ओरिसा राज्यातील ११०० स्क्वे. किमी परिसर असलेले अती भव्य सरोवर चीलिका वा चिल्का हे पूर्व किनाऱ्यावरील तीन जिल्ह्यात पसरलेले असून जगातील स्थलांतरित पक्षांचे दोन नंबरचे स्थान.थंडीच्या मोसमात १६० विविध तर्हेचे हजारो पक्षांचे थवेचे थवे चीलिकात उतरतात.कॅप्सीकन सी,बेकल लेक,उरल सी,(रशिया),मंगोलिया,लडाख,उत्तर हिमालय, अशा हजारो मैल दूर अंतरावरील हे पाहुणे,लेकमध्ये तीन महिने मुक्काम करतात. […]

उत्तर सिक्किम मधील गुरडोगमार लेक

समोर बर्फाचा पसरलेला समुद्र व त्याच्या मध्यात चिंचोळा स्वच्छ निळ्या पाण्याचा ओहोळ, भ्रर दुपारच्या १ वाजताच्या उन्हात चकाकत होता. त्या पाण्यापर्यंत पोहचण्यास बर्फाच्या पायऱ्या. मुंगीच्या पावलाने लेकच्या काठावर येऊन ध्यानस्थपणे १० मिनिटे उभा होतो. मनाला मिळालेल्या अविस्मरणीय शांतीच्या वलयात पूर्णपणे डुबून गेलो होतो. गोठलेल्या बर्फात हे पाणी कसे राहते, हा निसर्ग चमत्कारच. […]

सिक्कीम मधील चांगु लेक

१२३१० फूट उंचीवर पांढऱ्या शुभ्र दगडासारख्या घट्ट बर्फाचा समुद्र पसरलेला होता. ३ ते ५ किमी व्यास असलेल्या सरोवरात पाणी म्हणून दिसत नव्हते. आकाश ढगाळलेले. सूर्य डोकावत होता आणि सरोवराचा काही बर्फ चकाकत होता. सरोवराचा परिसर हिरवागार,पाणी इतके नितळ आणि निळे,त्यात बाजूच्या निसर्गाचे रम्य प्रतिबिंब पडते. शेकडो वर्षापूर्वी लामा गुरु पाण्याचा नितळ पणा व आकाशातील विविध रंगछटावरून वरून पुढील काळाचे भविष्य सांगत. […]

गोंदियाजवळील नवेगाव बांध व ईटीया डोह

नवेगाव बांध गोंदिया पासून ५५ किमी. अंतरावर, नागपूर गोंदिया हे अंतर १७० किमी. ही जागा भारतातील पक्षी व स्थलांतरीत पक्षांचे माहेरघर आहे. नवेगाव बांध म्हणजे ७५ फूट लांब मातीचा बंधारा ज्यामुळे मोठा जलाशय सात डोंगरांच्या कुशीत पसरलेला आहे,चोहोबाजुनी घनदाट झाडी. […]

वाघांचा प्रदेश – ताडोबातील तेलिया तलाव

जंगलातील मध्यात असलेल्या तेलिया तलावाचे पाणी इतके संथ, नितळ व निस्तब्ध पाहून आपण अवाकच होतो. समोरच्या डोंगराचे त्यात पडलेले प्रतिबिंब. वर शुभ्र निळे आकाश. दहा मिनिटे निस्सिम शांततेत जंगल न्याहाळण्याचा आनंद वर्णनातीत होता. […]

महाराष्ट्रातील प्राचीन लोणार सरोवर

गेली दोन एक हजार वर्षे अनेक राजवटीनी या विवराची नोंद घेत परीसराभोवती अनेक मंदीरे व उत्तम शिल्पे उभारली आहेत. सम्राट कृष्णदेवराय व चक्रधरस्वामी यांची येथे भेट झाली होती. असा आहे मनोरंजक इतिहास लोणारचा. […]

भ्रमंती सरोवरांची

गावागावागणिक प्रत्येक तळ्याला, लेकला त्या गावाची परंपरा व इतिहास जोडलेला आहे, कोल्हापूरचा रंकाळा,  नागपूरचा शुक्रवार,  हैदराबादचा हुसेनसागर,  नैनितालचा नैनी या व अशा अनेक तलावांच्या सुंदर आठवणी मनाला आगळा वेगळा आनंद देतात. काही सरोवरे मात्र माझ्या अंतर्मनाला विलक्षण आनंद देत गेली ती त्यांच्या  निर्मितीचा छाती दडपून टाकणारा इतिहास, त्यांची अती भव्यता व निसर्गाच्या  वैविधतेमुळे ! सरोवरांच्या भटकंतीची मजा औरच आहे.  […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..