वाघांचा प्रदेश – ताडोबातील तेलिया तलाव

ताडोबा जंगल चंद्रपूर पासून ४० किमी तर नागपूर पासून १६० किमी अंतरावर. वाघाकरिता प्रसिद्ध. त्या जंगलातील पाणथळी व तलाव ह्या प्राणी बघण्याच्या हमखास जागा आहेत.

जंगलातील मध्यात असलेल्या तेलिया तलावाचे पाणी इतके संथ,  नितळ व निस्तब्ध पाहून आपण अवाकच होतो. समोरच्या डोंगराचे त्यात पडलेले प्रतिबिंब. वर शुभ्र निळे आकाश. दहा मिनिटे निस्सिम शांततेत जंगल न्याहाळण्याचा आनंद वर्णनातीत होता. ध्यान समाधीचा अनुभव वाटत होता. एका पक्षाच्या शिटी सारख्या आवाजाने शांतता भंग पावली होती. हळूहळू ५ हरणांचा कळप तलावाच्या काठावर आला.त्यां चे कान व डोळे वाघाच्या चाहुलीकडे   लागलेले, पण भराभर पाणी पीत होते. हळूहळू एकेक पाडस काठाजवळ येत होते.मधेच पाण्याला तोंड लावत,क्षणात झाडाआड  लपत. ओल्या मातीत वाघाच्या पायाचे ताजे ठसे दिसत होते, वाघाच्या दर्शना पेक्षा तलावाच्या वातावरणाने मिळालेला आनंद लाख मोलाचा होता.

—  डॉ. अविनाश केशव वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 49 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…