मणिपूरचे लुकवाक लेक

मणिपूरच्या हिरव्या गार डोंगररांगा कापत इंफाळ या राजधानीच्या शहरापासून लुकवाक लेक कडे प्रयाण केले.३० ते ४० किमी परीघाचे गोड्या पाण्याचे सरोवर थेट क्षितीजापर्यंत पसरलेले,यात विविध आकाराची अनेक बेटे तरंगत होती.काही बेटे एखादा माणूस उभा राहील इतकी लहान तर काही बेटावर बांबूच्या झोपड्या,त्यांच्या बाजुनी उगवलेले हिरवे गार गवत,ते चरणारी बकरी,गाय,छोटया झुडपात पक्षांची घरटी,दोन बेटातून वाहाणारे संथ पाणी,छोटया होडीतून जाणारा नावाडी,जाळ्यात पकडलेले मासे टोपलीत भरतानाही दिसत होता. रात्रभरात ही  बेटे तरंगत जात आपली जागा बदलतात,दुसरया दिवशी वेगळ्याच भागात दिसतात.पान् वेलींच्या  जाळ्यामुळे ती उभी राहतात.प्रवाहाबरोबर ती वाहत जातात.प्रवाह फसवे असल्याने या लेक मधील प्रवास जाणकार नावाड्या बरोबर करावा लागतो.रात्री या बेटावर अतिरेकी लपण्या करता येतात त्यामुळे जवानांचा मोठा तळ सरोवराला लागूनच होता.दिवसा शांत दिसणारे हे निसर्गाचे अनोखे लेणे रात्री युद्ध भूमी ठरते.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

 — डॉ. अविनाश केशव वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 49 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....