पाकिजा – हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दंतकथा

कमाल अमरोही- मीनाकुमारी यांचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर हा संपूर्ण चित्रपटच एक भव्य- करुण काव्य आहे. कोठा आणि तवायफ हा हिंदी चित्रपटांमध्ये तसा खूप वेळा येणारा विषय. केवळ याच विषयाला वाहिलेले चित्रपटही बरेच आहेत. पण भव्यतेचे आणि परिपूर्णतेचे कमालीचे आकर्षण असणार्या् कमाल अमरोहींच्या दिग्दर्शनाने एरवी घिस्या-पिट्या विषयावरील या चित्रपटाला सौंदर्याचे एक वेगळेच मूल्य मिळवून दिले आहे.

खरंतर चित्रपटाचे कथासूत्र नेहमीचेच. कथानक आणि प्रसंगांची रचनाही अवास्तव वा अतिरंजित. आणि शैलीही टिपिकल भावव्याकुळ रोमॅण्टिक उर्दू शायरीसारखी. पण अमरोहींनी भव्यता, नजाकत, संतुलन, लालित्य, शालिनता आणि रंगाची मोहकता त्यात अशी काही भरली आहे की संपूर्ण चित्रपटाला शुद्ध शालिन श्रीमंतीचेच एक सौंदर्यमूल्य लाभले आहे. चित्रपटभर त्याचा प्रत्यय येत राहतो. गाण्यांमध्ये जास्तच. आणि त्यातही ‘चलते चलते यूही कोई मिल गया था’ मध्ये तर सर्वाधिक. सार्याच चित्रपटातील भव्यता, परिपूर्णता, सौंदर्य आणि प्रेमव्याकुळ शोकात्मकतेचा ‘चलते चलते’ हा सूत्रबद्ध आविष्कार. कथेत रुतलेले, पण कथेपेक्षा अधिकचे सांगणारे, अधिक अवकाश व्यापणारे आणि मनात अधिक काळ रेंगाळणारे गाणे. हिंदी चित्रपटगीतातील जणू ताजमहाल.

‘चलते चलते’ हे खरंतर कोठय़ावरचे गाणे. उत्तर हिंदुस्थानातील सरंजामी व्यवस्थेने प्रस्थापित श्रीमंत पुरुषी नजरेच्या आणि देहाच्या भोग-विलासासाठी केलेली एक सोय म्हणजे कोठा. सरंजामी सत्तेतून स्त्रीदेहावर आणि मनावर स्वामित्व सांगू पाहणार्याे एकाधिकारवादी पुरुषी नजरेसमोर हे गाणे उलगडते. साहिबजान (मीनाकुमारी) ते गाते. कथक शैलीत त्याच्यावर अतिशय नजाकतदार पदन्यास करते. नखशिखान्त दागिन्याने मढलेली आणि सौंदर्यवती साहिबजान हे सारे एका सवयीतून सादर करते खरे,
‘ये चिराग बुझ रहे है’ या ओळींच्या जोडीने भव्य पडद्यावर येणारे साहिबजानच्या व्याकूळ डोळ्यांचे आणि जमीनदाराच्या जरबी डोळ्यांचे एक्स्ट्रीम क्लोजअप्स तर मनाच्या पटलावरून दीर्घकाळ जातच नाही. त्याच्या सोबतीला येतात सतारीचे सुरेख बोल, तबल्याचा अंगात भिनणारा, परंतु संयत ठेका आणि घुंगरांचा लयबद्ध नाद. या सर्वांवर कडी करतो तो लताचा विलक्षण उत्कट अर्थगर्भ स्वर. शब्दांच्या चिमटींमध्ये न सामावणारे असे सारे दृक आणि श्राव्य नाट्य. श्रीमंत प्रतीकांच्या शांत-संयत वापरातून समृद्ध करणारा, झपाटून टाकणारा अनुभव.

दिग्दर्शक कमाल अमरोही, संगीतकार गुलाम मोहम्मद, गीतकार कैफी आझमी, छायाचित्रकार जोसेफ विर्शचिंग आणि कलादिग्दर्शक एन. बी. कुलकर्णी यांच्या एकात्म कामगिरीतून उभी राहिलेली ऐतिहासिक आणि परिपूर्ण कलाकृती. म्हणूनच कोठय़ावर घडत असूनही हे कोठय़ाचे गाणे राहत नाही. भव्यता, नजाकत, सौंदर्य आणि कारु ण्य यांचा एकाचवेळी अनुभव देत राहते. थेट अगदी ताजमहालासारखा. पाकिजा बनायला १४ वर्षांचा वेळ लागण्याचे मुख्य कारण होते ते दिग्दर्शक कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली पाकिजाची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतर तलाक.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेटसंजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 1749 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…