नवीन लेखन...

“नोटबंदि…एक हजाराची नोट’ – एक अनुभवकथन

लासलगावला दवाखाना चालवणाऱ्या डाॅक्टर मित्राला आलेला अनुभव,”नोटबंदि…एक हजाराची नोट.!
काल सकाळी दवाखान्यात एक गरीब वयोवृद्ध गृहस्थ तपासणीसाठी आले होते, तपासणी झाल्यानतंर त्यांनी फी देण्यासाठी फाटक्या कोपरीत हात घातला व एक जुनी थोडीशी मळलेली नोट माझ्यासमोर ठेवली, क्षणभर माझे डोळेच बिचकले व बघतो तर काय बाबांनी ११ महिन्यापूर्वी बंद झालेली ‘एक हजाराची नोट’ माझ्यासमोर ठेवली होती..
त्याक्षणी माझ्या मनात खुप सार्या शंकांचा कल्लोळ माजला होता की, इतके दिवस ही नोट यांनी कशी काय सांभाळली..? यांना नोटबंदि झाली याची माहीतीच नसावी का..? असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते, न राहवता मी विचारले बाबा ही नोट तुम्हाला कोणी दिली तर त्यांनी सांगितले की बॅकेतून मिळाली, तेव्हा मी त्यांना सांगितले की हे शक्य नाही कारण ही नोट मागील ११ महिन्यांपासूनच चलनातून बंद झाली आहे, तर ते म्हणाले की, ‘ही नोट आज माझ्या म्हातार्या बायकोने मला तीन हप्तापासून आजारी आहे तर जा दवाखाण्यात जावून या..म्हणून सकाळी तिच्या पिशवितून काढून दिली, हे ऐकल्यावर क्षणभर मी सुन्न झालो होतो..
आणि स्वताःशीच विचार करु लागलो की ११ महिन्यानतंर पण ज्या लोकांना नोटबंदि झाली हेच माहीती नाही तिथे “डिजिटल इंडिया” काय दिवे लावणार आहे अथवा, ज्या रेल्वे दादरावर माणसे चेगंरुन मरतात त्या देशाला एेका रेल्वे बजेट इतक्या’ बुलेट ट्रेनची’ काय आवश्यकता आहे..?, पंतप्रधान मोदिजींना मी विनंती करतो की सामान्य जनतेच्या मुलभुत गरजा ओळखुन मगच काम करा, सामान्य जनतेच्या पैश्याशी असे ऐका रात्रीत निर्णय घेवुन त्यांच्यावर गदा आणु नका..
असो…फक्त खर्या भारताची स्थिती कशी आहे…? यासाठी हा लेख आहे. फक्त जाहीरातीचा विकास हा कोणालाच नको आहे..शेवटी त्या बाबांना नोटबंदि सर्व समजुन सांगितल्यावर माझ्या जवळचीच दवाखान्यातील काही औषधे देवुन, बसभाड्याला काही पैसे दिली, ते थोडे हताश होऊन निघुन गेले..!- डॉ अनिल ठाकरे, लासलगाव
खरंच विचार करणारी हि गोष्ट आहे. आपल्या देशात अजूनही गावागावात अशिक्षित, अडाणी तसेच आंगठे बहादूर लोक आहेत. कितीतरी स्वार्थी लोक या भोळ्या भाबड्या लोकांना आर्थिक व्यवहारात फसवतात. आपण विचारपुस केल्यास महाराष्ट्र गुन्हा अन्वेषण विभाग व स्थानिक पोलिस दूरक्षेत्र विभाग आपल्याला आकडेवारी सांगू शकतात.
आज देशातील, गावागावातील अशिक्षित लोकांना नोटीबंदी, GST, Digitization, Aadhar, Latest Government Policies, subsidies, Wi-Fi, Internet of Things IoT, Android mobile applications etc…या सारख्या आधुनिक काळातील तंत्रज्ञान technologies माहित नाही आहेत.
आज मला सांगा हो…आपल्या सारख्या सुशिक्षित वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी म्हणजेच डाॅक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, बँक आणि सरकारी कर्मचारी लोकांना, Demonetization, GST किती लोकांना माहिती आहे..?? Indian Taxation system किती लोकांना माहिती आहे..?
नोटबंदीला आमचा विरोध मुळीच नव्हता, सन १९८५ साली काॅग्रेस सरकारच्या वेळी पण नोटबंदी झाली होती. पण मोदी सरकारने गव्हर्नर (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) बदलून तडकाफडकी असे निर्णय घेताना आपल्या देशातील लोकसंख्येचा विचार करता, कुठलेही planning दिसून आले नाही. आपल्या देशात किती बॅका, सब-बॅचेंसेस, ATM यांची documentry, डेटा आहे का..? किती ATM आणि Bank infrastructure supportive तसेच उपलब्ध आहेत. याचा कोणी का नाही विचार केला..?
मनात एक प्रश्न निर्माण होतो की मोदी सरकार तुम्ही फक्त टाटा, बिर्ला, अंबानी तसेच गुजराती, सिंधी, पारसी, मारवाडी यांच्यासारखे बल्याढ्य उद्योगधंदेवाले यांच्याच विचार केला होता का..? नोटबंदीच्या दरम्यान सामान्य माणसाला काय त्रास होईल.? याउलट त्या ५० दिवसांत म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ पासून सामान्य लोकांना.. गोरगरिबांना जो त्रास झाला. त्याला कोण जबाबदार.? ज्यांना PayTM, online payment, OLA, Uber माहित नव्हतं त्यांचा कोणी विचार केलाय का..?
राजकारण सोडाच…किती लोकांना मनापासून वाटतं की आपण काही समाजासाठी केल पाहिजे. आपला पण संविधानानुसार सरकारला मत देताना किती विचार करतोय..?? माफ करा.. कदाचित माझं हे वैयक्तिक मत आपल्याला कदाचित पटणार पण नाही..पण हि शिक्षण प्रबोधनाची गोष्ट गांभिर्याने विचार करून अॅक्शन घेण आवश्यक आहे.
परवा घडलेली मुंबईतील दुःखद घटना…
अजून पावसाळा संपलेला नाही. निदान एकदोनदा तरी चांगला पाऊस मुंबईत पडायचा आहेच. तसा तो पडला, मग प्रत्येक वाहिनीने मुंबईच्या उपनगरी रेल्वेस्थानकांच्या बाहेर पडायच्या जिने वा पायर्‍यांवर जाऊन आपले कॅमेरे रोखून बसावे. जे काही तिथे घडत असेल ते तसेच्या तसे चित्रित करून जगाला व प्रामुख्याने मुंबईकरांना दाखवावे. मग परेल एल्फ़िन्स्टन स्थानकाच्या बाहेर पडताना चेंगराचेंगरी का झाली..?, त्याचा उलगडा होऊ शकेल कारण तेच घडण्याची शक्यता कित्येक वर्षापासून आहे आणि त्याचा विचार रेल्वेने केला नाही तसाच तो सामान्य नागरिकही करायला तयार नाहीत, हे लक्षात येऊ शकेल.
आता मृतांच्या नातेवाईकांना पैसे देऊन द्यांच्या जीवाची किंमत लावली जाईल आणि आपणही सर्व विसरून आपल्या मजबुरीपोटी आपापल्या कामाला लागू… पण मुंबईकरांनो, हे आजचे नरबळी विसरू नका..! येणाऱ्या निवडणुकीत मतांचा जोगवा मागायला येणाऱ्या ‘लांडग्यांना’ याचा जाब विचारा…! तुम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असलात तरी प्रथम सामान्य मुंबईकर आहात हे विसरू नका…आणि हे विसरलात तर आजचे तडफडून मेलेले आत्मे आपल्याला कधीच माफ करणार नाहीत… पक्ष बाजुला ठेवा आणि प्रथम माणूस मेहणून जगायला शिका…!
बुलेट ट्रेनचा सुट वैगरे जरूर शिवा आम्हाला, पण ज्या आम्हा मुंबईकरांची ‘चड्डी फाटली’ आहे, त्याला ‘सुट-बुट’च स्वप्न दाखवून काय उपयोग…? प्रथम आम्हाला आमची चड्डी नीट शिवून द्या आणि मग सुट शिवायचं बोला…! आज गेलेल्या नरबळींचं बलिदान वाया घालवू नका.. याची किंमत राजकारण्यांना चुकवायला लावा…!
सरकार, रेल्वेखाते नालायक आहे.., प्रशासन भ्रष्ट व नाकर्तेच आहे. राजकीय नेते पक्ष बदमाश आहेत. पण त्यापैकी कोणी चेंगराचेंगरीत मरणार नाही. म्हणूनच त्यात मरणारा आहे, त्याने विचार करायला नको काय…? की आपण मरून सरकार प्रशासन व नेत्यांना गुन्हेगार ठरवण्यात शहाणपणा आहे…? सार्वजनिक जागी थोडी शिस्त संयम राखला, तरी असे प्रसंग टाळता येऊ शकतील. त्यासाठी आपली तयारी नसेल तर आपल्याला कोणी वाचवू शकणार नाही. ‘सार्वजनिक बेशिस्त’ हा आपला मूलभूत अधिकार झाला आहे आणि तोच आपल्यावर उलटतो आहे. त्याबद्दल बोललो नाही म्हणून आपण सुरक्षित आहोत अशा समजुतीत जगण्याला ओढवून आणलेले मरण म्हणणे भाग आहे…
जय हिंद..! जय भारत..!
© गणेश उर्फ अभिजित कदम

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..