नवीन लेखन...

मेडिकल टुरिझम-वेलनेस टुरिझम

आरोग्य व आरोग्यसेवेचा हक्क हा मानवाचा जन्मजात अधिकार म्हणता येईल. जगण्याचा – नागरिकत्वाच्या अधिकाराबरोबर आरोग्यदायी वातावरण व पुरेशी – नियमित आरोग्य सेवा आवश्यक असते.

परंतु कित्येक वेळेला स्वतःच्या शहरातल्या/ देशातल्या आरोग्य सेवा आपल्याला अपेक्षित गती प्राप्त करून देऊ शकत नाही. अशा वेळी परदेशी आरोग्य उपचाराचे सल्ले मिळतात. ज्यांना आर्थिक दृष्टया शक्य आहे अथवा ज्यांचे सर्व प्रयत्न साफल्य देत नाही म्हणून नाराज लोक ह्या पर्यायाला उत्तर म्हणून परदेशी उपचारासाठी मार्गस्थ होतात.

अशाप्रकारे चिकित्सा ह्या उद्देशाने आंतराष्ट्रीय सीमा ओलांडून परदेशी उपचार घेणे याला वैद्यकीय पर्यटन असे संबोधले जाते.

व्यवसायाचे एक साधन म्हणून अनेक देशात ह्या पर्यटनाचा उत्तम विकास होत आहे. वैद्यकीय पर्यटन (Medical Tourism ) प्रामुख्याने cosmetic treatment, Bariatric surgeries, kneecap replacements, liver transplants, cancer treatments 3 fertility treatment यासाठी केले जाते.

भारतात सुद्धा वैद्यकीय पर्यटन जोमाने वाढत आहे. भारत वैद्यकीय पर्यटनात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पहिले दहा देश खालील प्रमाणे

१. थायलंड

२. भारत

३. ब्राझील

४. मलेशिया

५. तुर्की

६. मेक्सिको

७. कॉस्टा रिका

८. तैवान

९. दक्षिण कोरिया

१०. सिंगापूर

भारतात, तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहर भारताचे आरोग्य शहर म्हणून जाणले जाते. वैद्यकीय सेवेसाठी आलेले ४५% परदेशी पर्यटक तर ४०% स्वदेशी पर्यटक उपचारासाठी चेन्नई या शहराची पसंती दाखवतात.

आरोग्यासाठी पर्यटन करणे यामध्ये अजून एक झपाट्याने विकास होत असलेला प्रकार म्हणजे कल्याण पर्यटन – Wellness tourism.

वैद्यकीय पर्यटन आणि वेलनेस टुरिझम यामध्ये बरेच लोक गल्लत करतात. अर्थात आरोग्य हा दुवा दोघांमध्ये समान आहे मात्र वैद्यकीय पर्यटन असलेल्या आरोग्य तक्रारीच्या उपचारासाठी केले जाते आणि वेलनेस पर्यटन स्वास्थ्य रक्षण हेतूने केले जाते.

ह्यामध्ये पर्यटकांचे दोन प्रकार केले जाऊ शकतात,

१. प्राथमिक – ज्या पर्यटकांचा प्रवास हाच मुळी स्वास्थ्य रक्षणाच्या फायद्यासाठी केला गेला आहे. तेच प्रवासाचे मूळ उद्दिष्ट होय.

२. द्वितीय (सेकंडरी ) – ठरलेल्या पर्यटन स्थळी जाणे आणि प्रवासाचा एक भाग म्हणून, सहज म्हणून त्या देशातील स्वास्थ्य पद्धती अनुभवणे. मूळ उद्देश त्या देशात फिरणे, पर्यटन स्थळी जाणे अथवा व्यापारसुद्धा असू शकतो.

काही लोक दोन्ही प्रकारात मोडतात. उदा. फॅमिली बरोबर ट्रिपला येऊन तुर्कीच्या उष्ण कुंडांचा अनुभव घेणे (सेकंडरी) आणि नंतर एकट्याने उष्ण कुंडांच्या पहिल्या अनुभवाने प्रेरित होऊन फक्त आरोग्य या उद्देशाने तुर्कीला परत येणे (प्राथमिक).

प्रत्येक ठिकाणचे वेगळेपण स्वास्थ्याचे उपाय तेथील खाद्य, संस्कृती, अनमोल ठेवा इ. शी संलग्न असते. त्यामुळे काही पर्यटक तेथील स्थानिक मसाज, व्यायाम प्रकाराचे वर्ग, खाद्य प्रकार ह्यानी सुद्धा खूश होतात. पण काही चोखंदळ पर्यटक मात्र अद्वितीय आणि अभूतपूर्व अनुभवांसाठी स्वदेशी प्रचलित, विकसित पूर्वापार परंपरेने चालत आलेले, टिकलेले शाश्वत आणि सिद्ध स्वास्थ्य रक्षण पद्धतीवरच भर देतात आणि मागणी फक्त त्याचीच करतात.

प्रत्येक पर्यटन ठिकाण- परदेश आपापली वैविध्यता जपून असतो आणि तेच त्याचे वैशिष्ट्रय पर्यटकांना आकर्षित करते.

असेच एक माध्यम…

आपल्या अगदी सहज जवळ… नाशिक येथे. Wellness tourism या प्रोॲक्टीव्ह हेल्थ अॅप्रोच (Proactive Health Approach) बद्दल सह्याद्रीच्या काजळी रांगामध्ये असलेल्या पुण्यभूमी त्र्यंबकेश्वर ह्या तीर्थस्थळी बहरलेल्या हिरव्यागार वसुंधरेच्या कुशीत वसले आहे विवेदा (VIVEDA).

समाधिस्त अंजनेरी पर्वताच्या प्रसन्न मुद्रेसमोर, बेझे तलावाच्या शांत परिसरात, ४० एकर हिरव्यागार दरी डोंगरात स्वास्थ्य रक्षणार्थ सिद्ध निवारा म्हणजे VIVEDA.

आयुर्वेद, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, विविध आंतरराष्ट्रीय स्पा, सेंद्रिय आहार – खाद्य संस्कृती अशा सर्व भारतीय पारंपरिक जीवनमूल्यांचे अभूतपूर्व संयोजन, विवेदा या निवारा (Retreat ) मध्ये आपल्याला प्राप्त होते.

विवेदामधे वास्तव्यासाठी, आरोग्यदायी उपचारांसाठी १६ हाथकामाने सज्ज दगडी घरे आपले अगत्याने स्वागत करतात. प्रत्येक घर आपल्या सभोवती एक विहंगम सौंदर्यपूर्ण नक्षीदार ऐवज ओढून नटले आहे. उपचारासाठी परिपूर्ण १७ – कक्ष आणि योग विद्यासाठी तल्लीन परंतु दक्ष असा घुमट ह्या निवाऱ्याचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. स्वास्थ्य लाभासाठी आलेला प्रत्येक पर्यटक या आरोग्यपूर्ण विलोभनीय Retreat निवान्यामध्ये हरवून जाईल हे निश्चित. आमचे आरोग्य सल्लागार पर्यटकांचा अपेक्षा आणि त्यांच्या अनारोग्य/ आरोग्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून सानुकूलित (Customised) उपचार निर्दिष्ट करतील. आपण केलेली निवड सर्वार्थाने आपल्याला लाभदायक-आरोग्यदायी होण्यासाठी विवेदा कटिबद्ध आहे. आपले विवेदा मध्ये सस्नेह स्वागत आहे.

आमच्या उपचार पद्धती: –

Naturopathy चे उपचार जसे Underwater massage, Mud bath, Renal Pack, Herbal Packs, Full Body Acupressure, Vibro Therapy, Chocolate Bath, Colon HydroTherapy, Enema, Spinal Spray, Hip Bath, Electro Muscular Stimulator, Salt Bath, Liver Flush, Infrared Therapy, Cellulite Pack, Hydro Jet आणि बरेच काही…

आयुर्वेदाचे उपचार जसे Shirodhara, bhyanga, Udvardanam, Potli Massage, Takradhara, Shiro Basti, Greeva Basti, Netra Basti, Karna Basti, Nasyam इत्यादी.

आंतरराष्ट्रीय स्पा उपचार पद्धती जसे Aroma Massage, Thai Massage, Swedish Massage, Hot Stone Massage, Bamboo Massage, Body Exfoliators, Facials, etc. Homeopathy, Yoga, Chiropractic, Meditation, Spinal Physiotherapy, Manipulator, Music Therapy, Detoxifier, Laughter Therapy many more.

नित्यक्रमाने थकलेल्या त्रस्त शरीर आणि मनाला, पुन्हा Recharge होण्यासाठी, काहीसा आरामदायक Break आवश्यक असतो. स्वतःच्या घरी राहून हा किती साध्य करता येतो हा प्रत्येकाचा स्वतंत्र व्यक्तीनिष्ठ प्रश्न आहे, परंतु तुम्हाला समजून, तुमच्या गरजा जाणून कायाकल्प होण्यास सिद्ध विवेदा खात्रीशीर हमी देतो.

पर्यटकांसाठी विवेदाने काही वेगवेगळे Packages तयार केले आहे. DETOX, Weight Management, Stress Management, Pain Management इत्यादी सारखे स्वतंत्र Packages पण आहेतच.  ३ दिवस ४ रात्री ते २१ दिवस २२ रात्रीपर्यंत वेगवेगळे Packages आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत.

-किरण चव्हाण

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..