नवीन लेखन...

मराठी व्यावसायिक आणि GST

गिरगावतल्या ठाकुरद्वारचं हॉटेल विनय इथं GST लागू झाल्यापासून खाद्यपदार्थांचे दर कमी करण्यात आलेले आहेत… या हॉटेलमध्ये १ जुलै २०१७ पासून नवे रेट कार्ड आले आहे… हॉटेलच्या मेन्यू कार्डवर नवे आणि जुने दर स्पष्टपणे लिहिलेले आहेत… या नव्या दराचे परिणाम बिलात दिसतात. बिल ५ ते १०% कमी झालेले आहे… हा बदल झालाय तो GSTमुळे..

हे काही काल – परवाला टाकलेलं उडुपी हॉटेल नाहीए… एका मराठी कुटुंबाचे ७७ वर्षं जुने हे हॉटेल आता चौथ्या पिढीच्या ताब्यात आहे. इथली मिसळ तर प्रसिद्ध आहेच… पण, पाव पातळ भाजी म्हणजे सोवळा तांबडा पांढरा रस्साच जणू..! GSTनंतर विनयच्या या दोन्ही लोकप्रिय डिशेस स्वस्त झाल्यात ही सुद्धा खवैय्यांसाठीची आनंदाची बातमी… दोन्ही प्लेट ६० रूपयाला होत्या त्या ५५ ला झाल्यात.सोबतचे सुट्टे पाव मात्र ३ रूपयालाचआहेत. कारण, तो हॉटेलात बनणारा पदार्थ नाही मागणीनुसार त्याच्याऑर्डरचे आकारमान बदलत असते.

मराठी माणसाने स्थापन केलेल्या आहार संघटनेवर आज शेट्टयांचं वर्चस्व आहे… मुंबईची भूक आणि चव त्यांच्या ताब्यात आहे. यातले बहुतांश लोक सरसकट जुन्या दरावर GSTचा अतिरिक्त बोजा लादत असताना एका मराठी व्यापाऱ्याने सर्वप्रथम चाकोरी बाहेरची वाट चोखाळली आहे… त्यांचं कौतुक यासाठी की, त्यांनी नव्या कररचनेचं खरं गुपित उघड केलंय…

आतातरी आपण आपली बिलं भरताना काळजी घेऊ का.? मोदी सरकारने आणलेल्या नव्या कररचनेला अभ्यासणार का.? वस्तू विकताना त्यावर जुन्या-नव्या किंमती स्पष्ट लिहाव्या लागणार असल्याचा सरकारी फतवा यायच्या आधी हॉटेल विनयने ते प्रामाणिकपणा दाखवत करून दाखवलं आहे. धंद्यातली सचोटी हीच मराठी माणसाची खरी ओळख..

महेंद्र मोने
About महेंद्र मोने 4 Articles
श्री महेंद्र मोने हे ठाणे येथील एक जागरुक नागरिक असून ते भाडेकरूंचे प्रतिनिधी या नात्याने भाडेकरुंच्या समस्यांना वाचा फोडत असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..