खोडकर कृष्ण

किती रे खोड्या करशी कृष्णा
यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।।

झोपू दे रे तिजला आता,  ती तर गेली खूप दमूनी
दही दुधानी भांडी भरली,
काही प्याली, काही वाटली,
काही तर ती उपडी झाली,
पिऊनी सांडूनीच सगळे,  नासलेस दही दूध लोणी…१,

किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी
गणरायाचे पूजन करितां
मग्न झाली यशोदा माता
लक्ष्य तुझे नैवेद्यीं पडता
फस्त करशी काही मोदक,  ताटामधले तूच खाऊनी….२,

किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,
गोपीच्या तू फोडल्या घागरी,
पळवी त्यांची वस्त्रे सारी,
दुधा तुपाची केली चोरी,
मौज वाटते गोप-गोपींना, नटखटता तुझी बघूनी…४

किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,
खोंड्या नच लीला बघूनी,
प्रेमभावना उचंबळूनी
जाई यशोदा ती बावरूनी
डोळ्यामधले लपवून आश्रू,  लटका राग दिसे शब्दानी…५,

किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1382 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

Loading…