नवीन लेखन...

घडलय बिघडलंय

दोन भागात भांडी धुणी महात्म्य सांगितले आहे. त्यामुळे जो आमूलाग्र बदल झाला आहे त्यातून बरेच काही बिघडून गेले आहे. सोने नाही पण सोन्यासारखी भांडी आणि संसाराची चकाकणे संपून गेले. जुनी भांडी मोडीत गेली. यातून मोठ्या माणसांची मते. तत्वे हे ही मोडीत गेले. जर्मनी व हिंडालियम आले. आणि राजकारण शिरले. भिकेचे डोहाळे लागले. पितळी डबे जाऊन हिंडालियमाचे डबे पुढे चालून प्लॅस्टिक आले. घासण्याचा त्रास वाचला. स्टिलचे राज्य सुरू झाले. ती होममिनीस्टर झाली. सगळ्यांना एकेका ठिकाणी गपगुमान बसायला सांगितले. आणि ते कडेकोट बंदोबस्तात. ज्याची गरज आहे तेवढीच बाहेर येणार. थोडक्यात झाकली मूठ सव्वा लाखाची. आता स्वयंपाक करत नाहीत बनवतात म्हणून ते बनवण्यासाठी भांडी बनवली गेली. आता रुची आवडनिवड सगळे काही जाहिराती प्रमाणे झाले. ना चव ना ढव तरीही तो बायकोच्या खांद्यावर हात ठेवून म्हणणार. आखिर बिबी किसकी है. तिच्या अंगावर मूठभर मांस चढलेच. पण यात प्रेशर किती आणि कशा कशाचे आणि कशात आले हे कळालेच नाही. कढई आणि तवे नॉनस्टिक व निर्लेपचे. त्यामुळे नाती आणि मन दोन्ही अशीच झाली निर्लेप. स्टिलचा दिखाऊपणा घालवण्यासाठी शेवटी तांबेच कामी आले. जुन्या पिढीतील लोकांप्रमाणेच पण मानले जात नाही. बूड कशाचे आहे हे महत्वाचे नाही. वरचा भाग चकाचक आहे ना? अशी विचारसरणी. आणि यात नाती. मैत्री दुरावले गेले. हम दो हमारे दो किंवा एक. मनाप्रमाणेच घरेही लहान झाली. जागा नाही या कारणावरून सगळे कार्यक्रम बाहेर होऊ लागले. आतला जिव्हाळा कमी झाला. आणि प्रसंगी घरी झालाच तर कागदी ताट. वाट्या ग्लास. कटकट नको. घरातील कचरा बाहेर पडतो. पैसाही जातो. आणि प्रदुषण. मातीचे नुकसान ते वेगळेच.जेवण ऑनलाईन घरपोच फक्त वाढणे. यातही किती दमायला होते ना?
कपड्या बद्दल तर एवढी मोठी क्रांती झाली आहे की एक स्वतंत्र ग्रंथ होईल. वारेमाप कपडे. पण धुण्याचा अजिबात त्रास नाही. वॉशिंगमशिन तयार आहेच. डाग काढायला सोयीचे झाले आहे. त्यामुळे दाग अच्छे है असे म्हणत आई हसतमुखाने लेकराचे कपडे धुते. शिवाय हे लेस ते लेस सगळेच यूजलेस असलेले तोकडे कपडे पाहून वाटते की मूलभूत गरज आहे की मूलभूत सुविधा आहे. आणि एक फायदा म्हणजे जीन्स. टिशर्टस कुणीही कुणाचे घालू शकतात. म्हणजे हे मला नक्की माहीत नाही पण ऐकले आहे म्हणून लिहिण्याचे धाडस केले आहे. कदाचित चुकीचेही असेल. लहान मुलांचे कपडे अंगावर घातले की खूप वाईट वाटते. त्यांचे गोजिरवाणे रुप त्याला लागलेला डाग म्हणजे चित्रविचित्र फोटो व वाक्ये असतात. ते पाहून माझ्या हृदयात कालवाकालव होते. थोडक्यात काय तर यूज ॲ‍ण्ड थ्रो असे काही तरी म्हणतात. ते एका अर्थी खरेच आहे. त्यामुळे मनाची तयारी केली पाहिजे. नाती. मैत्री आणि निसर्ग यांची ताटातूट झाली आहे. आमचे कुणाशिवाय अडत नाही. अशी मनोवृत्ती झाली आहे. पैसा फेको चैन से रहो. असे वातावरण निर्माण झाले आहे….
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..