नवीन लेखन...

वनसंवर्धन दिन

आज दिनांक २३ जुलै. आज वनसंवर्धन दिन साजरा केला जातो. मंडळी नावातच हा दिन का साजरा केला जातो ह्याचा एक अंदाज आपल्याला येतो. आपण नेहमी ऐकतो की निसर्ग आपला मित्र आहे. खरोखरच हे वाक्य अगदी सत्य आहे. अगदी जगद्गुरू संत तुकोबारायांनीही त्यांच्या अभंगात वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे असे सांगितलं आहे.

पण सद्यस्थिती फार वेगळी आहे. असं म्हटलं जातं की , जागतिक तापमान रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण भूभागापैकी ३३% क्षेत्र हरित आवरणाखाली म्हणजेच वनांखाली असणं आवश्यक आहे. वर्षोनुवर्षे लोकसंख्या वाढत आहे आणि त्यांच्या निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी वृक्षतोड , जंगलतोड मोठया प्रमाणात होत आहे. त्याचा परिणाम संपूर्ण निसर्गचक्रावर होत आहे. निसर्ग चक्रावर परिणाम होत असल्याने जागतिक तापमानात विलक्षण वाढ होणे , अवकाळी पाऊस , सुका दुष्काळ , खराब हवामान , कार्बन डायॉक्साईडचे वाढते प्रमाण अशा अनेक निसर्गाला घातक असणाऱ्या समस्या आपलं डोकं वर काढू लागल्या आहेत. साधारणतः गेल्या २५ ते ३० वर्षांत ३०० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील वने तोडण्यात आलेली आहेत. आपल्या भारताच्या बाबतीत विचार केला तर , साधारणपणे १९८० ते २००५ पर्यंत १,६४,६१० हेक्टर जंगलांचे खाणीत रूपांतर झाले आहे आणि त्यातील निम्म्याहून अधिक जमिन कोळश्यांच्या खाणीने व्यापलेली आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या नोंदीनुसार , २००९ ते २०११ ह्या कालावधीत एकंदरीत ३६७ चौरस किलोमीटर जंगलांचा ऱ्हास झाला आहे आणि आता ह्याचे गंभीर पडसाद उमटत आहेत. सन २००० पासून संपुर्ण जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ३०० टक्क्यांनी वाढलं आहे आणि त्यापैकी ६५% मृत्यू आशियात होत आहेत. एकंदरीत वनांचे आरोग्य राखणे हे आपले आरोग्य राखण्यासारखेच आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी वनसंवर्धन करणं हेच शहाणपणाचं लक्षण ठरेल. आज वनसंवर्धन दिनादिवशी पुन्हा नव्याने वन संरक्षणाची शपथ घेऊ. एक झाड प्रत्येकाने लावून त्याची निगा राखली तर आपण आपल्या भविष्याची निगा राखली असं म्हणता येईल.

जमिनीत रुजवून झाडाचं मूळ
सुरक्षित करू आपलं भविष्य आणि कुळ

— आदित्य दि. संभूस

 

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..