नवीन लेखन...

फॅमिली

नुसतंच कोणाला तरी आवडणं आपलं आकर्षण वाटणं. ही स्वाभाविक प्रतिक्रीया आहे. या ,अशा नात्यात समोरच्याला गृहीत धरलेलं अजिबात नसतं… जी असते ती व्यक्तीची स्वतःची ओळख असते….त्या साठी आयुष्यात येणारा त्याचा चाहता असावाच ही ही अपेक्षा नसते…

मग ही संवेदना प्रेम या व्याख्येत बसते का…? समोरच्या ला जसं असेल तसं स्विकारणं हेच तर खरं प्रेम…या साठी याचना करावी लागत नाही…तक्रार ही नाही…जबरदस्ती तर अभिप्रेतच नाही….

नात्यांची गुंफण ही जितकी नाजूक ,तलम तेवढीच समजावता न येणारी…

अपेक्षा पूर्ती च्या कोणत्याही निकषाची गरजच नसते…काळजी करणं, नाती निभावून नेणं, स्वतः पेक्षा त्याची कींवा तिची ..ही इतकी सुुंदर भावना असते…काहीतरी वेगळी अफलातून असते….

जवळ प्रत्येक वेळा ती व्यक्ती असावीच असं नसलं तरी तीचं असणं जाणवतं…

अगदी माणसांनी, मिञ मैञीणींनी घेरले असलो तरी कुठेतरी अंतर्मनात खास माणसाचा सतत विचार करत रहातं … मन….

संवेदना एकमेकां पर्यंत पोहोचवणं घडत असतंच…टेलिपथी असते ती…

विचारात आपल्या ती व्यक्ती घुटमळत रहाते….किती सहज करता येण्याजोग्या गोष्टी असतात….बिझी शिड्यूल मध्ये एखादा फोन बायकोला, प्रेयसिला,जवळच्या मैञीणीला कशी आहेस, काय चाललंय…एवढंच….

शब्द ही फार नाहीत पण आपली काळजी कोणीतरी करतंय ही भावनाचं भन्नाट असते…हे चार शब्दच किमया घडवतात….

तेच बायको, प्रेयसीनं कींवा मैञीणीनं कसा गेला दिवस…? जेवलात का…?बीझी आहात ,दोनच मिनिटं बोला माझ्याशी माझा दिवस छान जातो मग…बस्स ईतकंच विचारावं…नाती जपावीत अशी…

इगो, मतभेद, मान -अपमान किती कुरवाळत बसायची ?…त्या पेक्षा मनं राखायला शिकावित एकमेकांची….लावावं छानसं आपुलकीचं रोप..

घालावं रोज खतपाणी प्रेमाचं, शिंपडावं अधून मधून काळजींचं गहीवरलें पण… येतील कोंब तरतरीत, फुटतील धुमारे ही वादातीत….फुलतील असंख्य कळ्या भावनांच्या… दरवळेल निमिषात आसमंत ही त्या प्राजक्त बहरात….

बघा करून एकदा.. मेहेनत थोडी पण आयुष्यभराची कमाई…

कोणताही परतावा नाही ,कोणतेही व्याज नाही…तरीही केलेली गुंतवणूक लाख मोलाची..

कदाचित उद्या मिळेलही न मागता सव्याज परतफेड… न दिसणारी, फक्त जाणवणारी तुझ्या माझ्या मनातल्या नात्यांची…..

घट्ट जमिन असलेली, खोलवर रूजलेली..चिरंजीव, अक्षय ही…..

— © लीना राजीव.

ही पोस्ट कोणीही शेअर करावी…माझी हरकत नाही…माझ्या नावाशिवाय ही शेअर केली तरी हरकत नाही..फक्त पोहोचू दे..लोकां पर्यंत एवढीच इच्छा आहे…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..