नवीन लेखन...

क्रिकेटपटू विनू मंकड

विनू मंकड म्हणजेच मुळवंतराई हिंम्मतलाला मंकड यांचा जन्म १२ एप्रिल १९१७ रोजी रणजी आणि दुलीप त्यांच्या गावी म्हणजे जामनगर येथे झाला.

त्यांना कोणीतरी शाळेत विनू या नावाने हाक मारत असत त्यामुळे हेच नाव पुढे रूढ झाले.

क्रिकेटचे प्राथमिक धडे विनूभाई यांना मिळाले ते वेन्सलीकडून मिळाले . परंतु त्याशिवाय त्यांना दुलीपसिहांनी देखील क्रिकेटचे तांत्रिक मार्गदर्शन वेळोवेळी केले . समोरचा गोलंदाज कितीही उच्च दर्जाचा गोलंदाज असेल तरी ते डगमगत नसत. कुठलाही गतिमान बंपर आला तरी ते त्याला तोंड देत. लक्षात ठेवा त्यावेळी हेल्मेट नव्हते हे महत्वाचे. त्यांनी जे काही पराक्रम किंवा मोठ्या खेळी केल्या आहेत त्या जलद गोलंदाजीवरच. ह्याचे मोठे उदाहरण आहे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड च्या वेळचे द्यावे लागेल . मेलबोर्नला त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यांमध्ये अनुक्रमे ११६ आणि १११ धावा केल्या आणि त्यावेळी गोलंदाज होते ते लिंडवॉल आणि मिलर . त्यांच्या तोफखान्याला तोंड देणे सोपे नव्हते. दुसऱ्या महायुद्धानंतर हीच जोडी सर्वात आघाडीची आणि फलंदाजाच्या छातीत धडकी भरवणारी होती. तिसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये विनूभाई यांनी ११५ धावा फक्त १३५ मिनिटामध्ये केलेल्या होत्या. खरे तर ते प्रसिद्धीच्या झोतात आले ते १९३७ साली लॉर्ड टेनिसन यांच्या संघाविरुद्ध खेळताना . परंतु पुढे १९४१ ते १९४५ मध्ये ते फारसे काही करू शकले नाहीत. परंतु १९४५ साली सिलोनच्या ( श्री लंका ) टूरवर गेले असताना एक दिवसाचा एकच कसोटी सामना झाला आणि त्यातच त्याच्या गोलंदाजीला पोषक ठरलेल्या खेळपट्टीवर त्यांनी ३५ धावांमध्ये विरुद्ध संघाचे ८ खेळाडू बाद केले. विनूभाई पहिला कसोटी सामना २२ जून १९४६ रोजी खेळले. तो सामना इंग्लंड विरुद्ध होता.

तर दुसरीकडे १९५२ साली लॉर्ड्सला त्यांनी जबरदस्त शतक केले . त्यांनी १८४ धावा केल्या . त्यावेळी इंग्लंडचे गोलंदाज होते फ्रेंडी ट्रुमन , अलेक बेडसर , जिम लेकर आणि जेकिन्स . या सगळ्यांना त्यांनी चौफेर फटके मारले होते . कधी कधी त्यांच्यावर आरोप व्ह्यायचा तो म्हणजे त्यांच्या धावा काढण्यामध्ये सातत्य नाही परंतु ४९ ते ५० ओव्हर टाकल्यानंतर परत फलंदाजी करायची हे सोपे काम नाही . इतकी गोलंदाजी केल्यानंतर लगेच पॅड बांधून खेळायला जायचे ही काही सोपी गोष्ट नव्हती. ते खऱ्या अर्थाने ऑल राऊंडर होते. आपण म्हणती कपिल देव ऑल राऊंडर परंतु खरे ऑल राउंडर विनू मंकड होते . कारण इतकी गोलंदाजी करून ओपनिंगला ते यायचे .

विनूभाई हे अत्यंत महत्वाचे खेळाडू होते ते उत्तम फलंदाज आणि गोलंदाज होतेच होते परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होते , फलंदाजाच्या जवळ उभे राहू झेल घेण्यात पटाईत होते. परंतु जेव्हा जेव्हा संघ अडचणींमध्ये येत असे तेव्हा ते झुंझारपणे ते खेळत असत. त्यांना कंटाळलेले किंवा गोलंदाजी करून थकलेले कोणी पाहिले नाही . ते गोलंदाजी करताना फलंदाजाचे वीक पॉईंट शोधत आणि त्याप्रमाणे चेंडू टाकत असत. कुठलीही खेळपट्टी त्यांना चालायची परंतु मंदगतीला साथ देणाऱ्या खेळपट्टवर ते तर फलंदाजांना हैराण करत असत. विनू मंकड यांनी १९५२ मध्ये लॉर्ड्सला पहिल्या इनिंग मध्ये ७२ तर दुसऱ्या इनिंगमध्ये १८४ धावा केल्या आणि ७४ ओव्हर्स टाकून ५ खेळाडू बाद केले होते. ही त्यांची क्रिकेटमधली खेळी खूप महत्वाची म्हणता येईल. त्यावेळी विनूभाई प्रमाणे दोन वेगळ्या देशांचे खेळाडू होते ज्यांना ‘ ऑनर्स बोर्ड्स ऑफ लॉर्ड्स ‘ होते ते म्हणजे सर गारफिल्ड सोबर्स आणि कीथ मिलर .

प्रत्येक खेळाडूची अशी इच्छा असते की त्यावेळी विस्डेन ( WISDEN ) च्या पहिल्या पाच खेळाडू मध्ये यावे. विनूभाई यांचे नाव १९४७ साली त्यामध्ये आले. त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमधील दुहेरी कामगिरी करून विक्रम त्यावेळी कसोटी सामन्यांमध्ये रचला तो म्हणजे १००० ध्वनीचा आणि १०० विकेट्सचा. याला इंग्लिशमध्ये ‘ डबल ‘ म्हणतात. त्यांनतर हा विक्रम इयान बोथट ने मोडला. ही दुहेरी कामगिरी त्यांनी २३ कसोटी सामन्यांमध्ये पुरी केली तर एम. ए . नोबल या खेळाडूला २७ कसोटी सामने लागले तर कीथ मिलरला ३३ कसोटी सामने लागले.

विनू मंकड यांनी शेवटचा कसोटी सामना ११ फेब्रुवारी १९५९ रोजी खेळले. तो सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होता. विनूभाई यांनी ४४ कसोटी सामन्यांमध्ये २,१०९ धावा केल्या त्यामध्ये त्यांची ५ शतके आणि ६ अर्धशतके होती. त्यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २३१. तर त्यांनी कसोटी सामन्यांमध्ये १६२ विकेट्स घेतल्या.

तर विनूभाई यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २३३ सामन्यांमध्ये ११,५९१ धावा केल्या . त्यामध्ये त्यांची २६ शतके आणि ५२ अर्धशतके होती. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ७८२ खेळाडू बाद केले.

भारत सरकारने विनूभाई मंकड यांना १९७३ साली ‘ पदमभूषण ‘ देऊन त्यांचा सन्मान केला.

अशा ग्रेट विनू मंकड यांचे २१ ऑगस्ट १९७८ रोजी वयाच्या ६१ व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झाले.

— सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 223 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..