पद्मा तळवलकर या माहेरच्या पद्मा सहस्रबुद्धे. पद्मा तळवलकर या जयपूर-अत्रौली घराण्याच्या लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका आहेत. पद्मा तळवलकर यांचे आजोबा काणेबुवा हे कीर्तनकार होते. त्यामुळे घरात गाणे होते. गाणे शिकण्यासाठी पद्मा तळवलकरांना घरातून आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळाला […]
जेनिफर यांचे वडील गोफरे केंडल जेष्ठ रंगकर्मी होते. ते आपली पत्नी व दोन्ही मुलीच्या सोबत कोलकाता येथे शेक्सपियरन ग्रुप चालवत असत. जेनिफर यांची बहीण फ्री केंडल यांनी ‘शेक्सपीयर वाला’ या ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितलं की, शशी आणि जेनिफर यांची पहिली ओळख एका कनफ्यूजनमुळे झाली होती. […]
लेखक दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांचा जन्म दि. २८ फेब्रुवारी १९६६ रोजी झाला. दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांनी ‘गोळाबेरीज’ या सिनेमात पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील ३२ व्यक्तिरेखा एकत्र आणल्या असून, त्यात ‘म्हैस’चाही समावेश आहे. संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३
एकविसाव्या शतकात मराठी कविपरंपरेत अग्रक्रमाने उल्लेख करावा असे कवी म्हणजे देवगड येथील कविराज प्रमोद जोशी. संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अढळ निष्ठा प्रमोद जोशी सरांनी ढळू दिली नाही. […]
सामाजिक कार्यामुळे लाखोंचा पोशिंदा झालेले भवरलाल जैन यांनी आपली ‘भाऊ’म्हणून ओळख निर्माण केली होती. भंवरलाल जैन यांचे दहावीपर्यंत शिक्षण आर. आर. हायस्कूलमध्ये तर बी. कॉम, एलएल.बी. मुंबई विद्यापीठातून केले. महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती जेव्हा मुंबई-पुण्यापलिकडे जात नव्हती, तेव्हा भवरलाल जैन यांनी स्वत:च्या औद्योगिक साम्राज्याचा पाया जळगावात रचला. […]
इंग्रजी तीन इयत्तांपर्यंतच त्यांचे शिक्षण झालेले असले, तरी इंग्रजी व मराठी भाषांवर त्यांनी चांगले प्रभुत्व मिळविले होते. शिक्षणक्षेत्रात प्रथम एक शिक्षक या नात्याने शिरून पुढे ते एक शिक्षणाधिकारी झाले, १८८१ साली मुलांसाठी बालबोध या नावाचे एक मासिक काढून त्यातून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. विविध प्रकारचे लेखन वैपुल्याने केले […]
मिलिंद तुळाणकर हे सुमारे ३५ हून अधिक वर्षं जलतरंग वाजवत आहेत. जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात. […]
महाराष्ट्राच्या लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक अशी ओळख लाभलेले डॉ. प्रकाश खांडगे यांनी साहित्य आणि शिक्षण क्षेत्र यांची लोककला आणि लोकसाहित्याशी सांगड घालण्याची अवघड कार्य प्रदीर्घ काळ तर केलेच आहे, पण अनेक तमाशा शिबिरांचे यशस्वी संचालक म्हणून पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. […]
पं.अनंत केशव उर्फ राजाभाऊ कोगजे हे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. त्यांचे आईवडील दोघेही संगीतप्रेमी होते. वडील संगीत नाटकात काम करायचे. राजाभाऊंनी आपल्या वडिलांकडून संगीताचे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या ६ व्या वर्षी त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यासाठी जबलपूरचे पं. गोविंदराव मुलतापीकर (विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य). यांच्याकडे पाठवण्यात आले. […]