गोगटे कुटुंब मूळचे बेळगावचे. रावसाहेब गोगटे यांचे वडील त्या काळातील एल.एम.अँड एस. डॉक्टर होते. गंमत म्हणजे बुद्धिवान असणाऱ्या रावसाहेबांच्या वडिलांनी आपली डॉक्टरकी सोडून एक पिठाची गिरणी सुरू केली. हे फारच थोड्या लोकांना माहीत असेल. आजही ती गिरणी छोट्या स्वरूपात चालू आहे. […]
बॅटमॅन, कॉनन दी बारबॅरिअन आणि जेम्स बाँडसारख्या लोकप्रिय व्यक्तिरेखा कॉमिक्सच्या माध्यमातुन प्रसिध्द करणारे डग्लस माँच यांचा जन्म. २३ फेब्रुवारी १९४८ रोजी शिकागो येथे झाला. डग्लस माँच हे प्रामुख्याने ओळखले जातात, ते त्यांनी लिहिलेल्या ‘बॅटमॅन’च्या कथांबद्दल! ‘बॅटमॅन’ व्यतिरिक्त, मून नाइट हा सुपरहिरो, ब्लॅक मास्क हा सुपरव्हिलन, डेथलॉकसारखा सायबॉर्ग, इलेक्ट्रिक वॉरिअर हा रोबॉट, सिक्स फ्रॉम सीरिअस हे विश्वातल्या […]
१९२६ साला पासून या स्टॅन लॉरेल व हार्डी जोडीनी खरी धमाल सुरू केली. लॉरेल हा सडपातळ, काहीसा कुरकु-या आणि हार्डी लठ्ठ नि मस्तमौला. दोघांची एकमेकांवर चाललेली कुरघोडी, त्यांचा एकत्र गोंधळ आणि मस्ती यावर प्रेक्षक तुडूंब प्रसन्न होते. सा-या जगभर या जाड्या-रड्याचा धुमाकूळ चालू होता. […]
२२ फेब्रुवारी स्काउट व गाईड्स या अवघ्या जगाला व्यापून टाकणाऱ्या विधायक चळवळीचे जनक लेफ्टनन्ट जनरल लॉर्ड बेडन पावेल यांचा स्मृतीदिन. यांचा जन्म दि. २२ फेब्रुवारी १८५७ रोजी लंडन येथे झाला. लॉर्ड बेडन पावेल यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन्स स्मिथ बेडन पॉवेल. लंडन मधील चार्टर औस ह्या शाळेत शिष्यवृती मिळवून त्यांनी शिक्षण केले. १८७६ साली लष्करात त्यांना […]
विद्यार्थिदशेत वाळिंबे पुण्यात वास्तव्यास होते. १९४८ साली गांधी हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते . या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडले. […]
२०२० च्या अमेरिकेतील निवडणूकीत भारतीय वंशाचे अमेरिकेतील करोडपती श्री ठाणेदार मिशिगनमधून ९३ टक्के मते मिळवत सिनेटर (आमदार) झाले आहेत. डेमोक्रेटिक पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढविली होती. श्री ठाणेदार पेशाने ते संशोधक आणि व्यवसायिक आहेत. त्यांनी सहा जणांना हरवत निवडणूक जिंकली आहे. […]
शंकर जयकिशन, नौशादपासून मदनमोहन पर्यंत आणि सचिनदेव बर्मनपासून राहुलदेव बर्मनपर्यंत त्यांच्यापाशी आठवणींचा खजिना होता. याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत अमीन सायानी यांची पर्सनॅलिटी फुलली.‘जी-हाँ बहनो और भाइयो’.. म्हणत सुरुवात करणारी त्यांनी शैली निर्माण केली. नंतर त्यांनी अनेक कार्यक्रम सुध्दा निवेदित केले. […]
प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. श्रीधर माडगूळकर यांनी १९७० साली ‘जिप्सी’ या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन करुन अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली. त्याचप्रमाणे ‘धरती’ व साप्ताहिक ‘मायभूमी’ या नियतकालिकांचा उपसंपादक म्हणून काम केले. […]
वाडा या पारंपरिक भारतीय वास्तुरचनेमधील राहणीमान व त्यात नांदणारी संस्कृती नव्या पिढीला पर्यटनातून अनुभवता यावी, या उद्देशातून ढेपे वाडा वास्तू साकारण्यात आली. […]
मेजर थॉमस कँडी हे जन्माने ब्रिटिश असलेले लष्करी अधिकारी भारतीय भाषापंडित होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असलेले थॉमस त्यांच्या आयुष्याची शेवटची पंचावन्न वर्षे भारतातच राहिले. संस्कृत, मराठी या भाषांचा, त्यांच्या व्याकरणाचा आणि तत्कालीन प्रचलित बोली मराठीचा सखोल अभ्यास केलेल्या थॉमस कँडी यांनी भावाच्या मदतीने कॅप्टन मोल्सवर्थचे अर्धवट राहिलेले इंग्रजी-मराठी शब्दकोशाचे काम पूर्ण केले. […]