नवीन लेखन...

आमदार श्री ठाणेदार

२२ फेब्रुवारी बेळगावचे मराठमोळे अमेरिकेतील आमदार श्री ठाणेदार यांचा वाढदिवस. यांचा जन्म दि. २२ फेब्रुवारी १९५५ रोजी बेळगाव येथेझाला.

२०२० च्या अमेरिकेतील निवडणूकीत भारतीय वंशाचे अमेरिकेतील करोडपती श्री ठाणेदार मिशिगनमधून ९३ टक्के मते मिळवत सिनेटर (आमदार) झाले आहेत. डेमोक्रेटिक पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढविली होती. श्री ठाणेदार पेशाने ते संशोधक आणि व्यवसायिक आहेत. त्यांनी सहा जणांना हरवत निवडणूक जिंकली आहे.

ठाणेदार हे मुळचे सीमाभागातील बेळगावचे आहेत. त्यांनी वयाच्या १८व्या वर्षी बी.एस्सी. उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. मग धारवाडच्या महाविद्यालयात एम.एस्सी.ला प्रवेश घेतला पण लगोलग विजापूर स्टेट बँकेत त्यांना नोकरीची संधीही चालून आली. ती करता करता पहिल्या वर्षांत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर, मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधक साहाय्यक म्हणून रुजू झाले. यात राहून गेलेली एम.एस्सी. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पूर्ण केली. पुढे १९७९ साली अमेरिकेच्या अॅतक्रॉन विद्यापीठात रसायनशास्त्रातील पीएच.डी.साठी त्यांनी प्रवेश घेतला अन् ते अमेरिकावासी झाले ते कायमचेच. दशकभरात त्यांना अमेरिकेचे नागरिकत्वही मिळाले. त्यांनी व्यवसाय-प्रशासन या विषयातले उच्चशिक्षणही घेतले. ‘केमिर’ या रासायनिक कंपनीत ते नोकरीला लागले आणि अखंड अभ्यास व कष्टाच्या जोरावर अल्पावधीत तिचे मालकही झाले. ‘बेळगावातला मॅट्रिकच्या परीक्षेत जेमतेम ५५ टक्क्यांनिशी उत्तीर्ण झालेला एक साधारण विद्यार्थी’ ते कष्टाने उच्चशिक्षण घेऊन ‘अमेरिकेतला एक कल्पक, यशस्वी व्यावसायिक’ बनण्यापर्यंतचा ठाणेदार यांचा हा प्रवास त्यांच्या ‘ही ‘श्री’ची इच्छा’ या आत्मकथनात त्यांनी प्रांजळपणे सांगितला आहे.

या प्रवासात ठाणेदार यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. धीर खचवणाऱ्या घटनाही त्यांच्या आयुष्यात घडल्या. रोल्स रॉईस, फेरारी यांसारख्या अतिमहागडय़ा गाडय़ांतून फिरणाऱ्या ठाणेदार यांच्यावर २००८ च्या आर्थिक अरिष्टामुळे आलेल्या व्यवसाय-मंदीत मालमत्ता जप्त होण्याचे संकट ओढवले, पण खचून न जाता त्यांनी चिकाटीने पुन्हा ‘श्री’ गणेशा केला आणि पुन्हा यशस्वीही झाले. दोन वर्षांपूर्वी मिशिगन प्रांताच्या गव्हर्नर (आपल्याकडच्या मुख्यमंत्र्यांशी समकक्ष) पदाच्या निवडणुकीसाठी ते डेमोक्रॅट पक्षाकडून लढले, त्यात यश मिळाले नाही; पण यंदा त्याच प्रांतातील आमदार म्हणून ते निवडून आले. प्रतिकूलतेशी झगडत यशोशिखरापर्यंत मुसंडी मारण्याची त्यांची ही वृत्ती प्रेरणादायी ठरावी अशीच. ‘दारिद्रय़ाच्या वेदना मी समजू शकतो’ असे म्हणणारे ठाणेदार त्यामुळेच अमेरिकेतील त्यांच्या मतदारांनाही भावले. वयाच्या चोविसाव्या वर्षी अमेरिकेत गेलेले ठाणेदार आता पासष्टीत आहेत. म्हणजे तब्बल चार दशके ते अमेरिकेत आहेत. पण म्हणून मराठीशी असलेली त्यांची नाळ तुटलेली नाही. अमेरिकेत मराठी संस्कृती जपणाऱ्या मंडळींमध्ये ते सक्रिय आहेत. त्यांची दोन आत्मकथने मराठीत वाचकप्रिय ठरली आहेत; आता या निवडणूक अनुभवांवर आधारित पुस्तक ते लिहिणार आहेत. श्री ठाणेदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4334 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..