नवीन लेखन...

भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी

जन्म: १० ऑगस्ट १८९४
मृत्यू: २३ फेब्रुवारी १९८०

कामगारांबाबत व्ही. व्ही. गिरी यांना कमालीची आस्था होती. कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. कामगारांसंबंधीचे विचार इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर प्रॉब्लेम्स इन इंडियन इंडस्ट्री, जॉब्ज फॉर अवर मिलियन्स वगैरे पुस्तकांद्वारे मांडले.

कार्यकाळ: २४ ऑगस्ट १९६९  ते २४ ऑगस्ट १९७४

व्ही. व्ही. गिरी हे भारताचे चौथे राष्ट्रपती ! राष्ट्रपती पदावर निवड होण्याआधी ते काही काळ कार्यवाहू राष्ट्रपती व त्याआधी उपराष्ट्रपती पदावर होते. केंद्रीय राजकारणात शिरण्याआधी गिरी उत्तर प्रदेश, केरळ व म्हैसूर या राज्यांचे राज्यपाल होते. १९७५ साली त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात आला.

व्ही. व्ही. गिरी यांचा जन्म ब्रह्मपूर (ओरिसा) येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. बेरहमपूर येथे प्राथमिक शिक्षण झाल्यावर डिब्लन विद्यापीठात त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. बार ॲट लॉ झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली. पुढे ते काँग्रेसचे सभासद झाले. होमरूल चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. कामगार संघटनेचे सचिव व ऑल इंडिया रेल्वेमन फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. १९२६ ते १९४२ दरम्यान त्यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. १९२७ साली जिनीव्हा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेत भारताच्या कामगारांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी हजेरी लावली होती. गोलमेज परिषदेतही ते सहभागी झाले होते. १९३४ ते ३७ या दरम्यान मध्यवर्ती विधिमंडळात त्यांनी कामगारांचे प्रतिनिधित्व केले. हंगामी हिंदुस्थान सरकारचे परराष्ट्र वकील म्हणून त्यांनी सीलोनमध्ये (श्रीलंकेत) दोन वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी कामगारमंत्री म्हणून काम पाहिले. १९६७ ते ६९ या काळात उपराष्ट्रपती आणि १९६९ ते १९७४ या काळात त्यांनी राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..