नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

राहुल देव बर्मन – सर्जनशील आणि संवेदनशील

असे नेहमी म्हटले जाते, मोठ्या वृक्षासमोर लहान झाड वाढत नाही, मोठ्या झाडाची मुळे, ती वाढ रोखून ठेवतात. अर्थात याला काही अपवाद नक्कीच सापडतात आणि जेंव्हा असे अपवाद समोर येतात, तेंव्हा त्यांची झळाळी अलौकिक अशीच असते. राहुल देव बर्मन – यांच्या बाबतीत वरील विवेचन अत्यंत चपखल बसते, किंबहुना असे म्हणता येईल, राहुल देव बर्मन, आपल्या पित्याच्या (सचिन देव बर्मन) दोन पावले पुढेच गेला आणि हिंदी चित्रपट संगीतात अजरामर झाला. […]

प्रमोद साळुंखे – आपुलकीने वागणारा फिरस्ता..

प्रमोद माझा चुलत भाऊ. गांवाकडेच राहिलेला, शिकलेला. लहानपणी माझं गांवाकडे फारसं जाणं झालं नसल्यानं, मला माझा गांव आणि गावातले नातेवाईक तसे फारसे समजले नाहीत. परतु मी जरी गांवी जात नसलो तरी माझ्या गांववाल्यांचं मुंबईतल्यी माझ्या घरी येणं होत असायचं, म्हणून मला त्यातले काही माहित. प्रमोद, त्याचा थोरला भाऊ अरुण आणि या दोघांचे वडील बाळाप्पा त्यांच्यापैकीच एक. […]

महंमद रफी – अष्टपैलू गायकी

रफींच्या गायनशैलीचा विचार करता काही ठाम मते मांडता येतील. त्यांचे नाव बहुतेकवेळा तयार स्वरी, सुरेल पण काहीशा नाटकी गायनशैलीशी निगडित झाले. अर्थात, यासाठी त्यांचे काही रचनाकार देखील तितकेच जबाबदार आहेत, असे म्हणावे लागेल. […]

नेल्सन मंडेला – जन्मशताब्दी

दक्षिण आफ्रिकेचे सुदैव असे की, जेंव्हा सत्तापालट झाला तेंव्हा त्या देशाला मंडेला सारखा सहिष्णू, समंजस आणि व्यवहारी नेता मिळाला. त्यामुळेच नव्या राजवटीत कुठेही अनागोंदी झाली नाही आणि संक्रमण शांततेत पार पडले. इतर आफ्रिकन देशांचा अनुभव बघता, मंडेला यांचे नेतृत्व खरोखरच प्रेरणादायी असेच म्हणायला हवे. […]

रंगांच्या दुनियेतील विविधरंगी रसायन… प्राध्यापक गजानन शेपाळ

काही माणसं उपजतच कलेचं लेणं घेऊन आलेली असतात. ती इतकी मोठी असतात पण तरीही प्रसिद्धिपराङमुख असतात. `राष्टपतीपदक’ विजेते.. चित्रकार प्राध्यापक गजानन शेपाळ हे अशांपैकीच एक. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र म्हणजे प्रा. शेपाळ यांचीच देणगी…. याच चित्रासाठी त्यांना राष्टपतीपदकाने गौरवण्यात आले. […]

अनिल बिस्वास – चित्रपट संगीताचे आद्यपीठ

या संगीतकाराला भारतीय संगीताची प्रचंड आवड होती आणि त्यासाठी कुठलीही लोककला आत्मसात करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे, एक फायदा झाला, त्यांच्या गाण्यात सुश्राव्यता तर आलीच पण लोकसंगीतातील “टिकाऊपणाचा” जो अंगभूत गुण असतो, त्या गुणाचा, या संगीतकाराने केलेल्या गाण्यांना फायदा आपसूकच मिळाला. […]

गीता दत्त

आपण या गायिकेच्या आवाजाचे थोडक्यात विश्लेषण करायला घेऊ. तिच्या सुरवातीच्या गीतांत थोडा बंगाली स्पर्श जाणवतो. गीता दत्तच्या आवाजात विस्तीर्ण भावनापटांची प्रतीती येते. […]

भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई

भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. विक्रम साराभाई यांचे वडील हे एक उद्योगपती होते. शिवाय ब-याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने त्या लोकांचे (रविंद्रनाथ टैगोर, जवाहरलाल नेहरू, सरोजनी नायडू , महात्मा गांधी) त्यांच्या घरी जाणे-येणे होते. त्यामुळे खरंतर विक्रम साराभाईंना उद्योग क्षेत्रात अथवा राजकारणात जम बसवण्यासाठी […]

पं. रामाश्रेय झा

प्रतिष्ठीत संगीतकार, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विद्वान आणि शिक्षक पं. रामाश्रेय झा यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. पं रामाश्रेय झा यांनी लिहिलेल्या पाच खंड असलेल्या लेखांचा संग्रह अभिनव गीतांजली संगीत हे भारतीय संगीतातील एक महत्वाचे मानले जाते. यात रागांचे सखोल विश्लेषण केले आहे. जितेंद्र अभिषेकी यांनी मा. पं रामाश्रेय झा यांच्या अनेक रचना गाऊन रसिकांसमोर आणल्या होत्या. १९६८ मध्ये, […]

रोशन – कलात्मक संगीतकार

आम म्हटल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी रागांत रचना करणे, रोशन यांचे मनपसंद काम होते. “कव्वाली” हा गीतप्रकार रोशन यांनी प्रतिष्ठित केला. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना “बांध” घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे. […]

1 217 218 219 220 221 378
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..