नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

सिंहासनकार अरुण साधू

एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये अरुण साधू यांचे नाव घेतले जाते. राजकीय परिस्थितीत अचूकपणे दाखवणारा सिंहासन व मुंबई दिनांक हे चित्रपट त्यांच्या कादंबरींवर आधारीत होते. अरुण साधू यांचा जन्म १७ जुन १९४१ साली झाला. ३० वर्ष त्यांनी पत्रकारिता केली. टाईम्स ऑफ इंडीया, स्टेटसमन, फ्री प्रेस जर्नल,केसरी, माणूस, इंडीयन एक्सप्रेससाठी त्यांनी […]

मराठी गायिका व अभिनेत्री आर्या आंबेकर

आर्या आंबेकरची आजीसुद्धा एक शास्त्रीय गायिका आहेत. तिचा जन्म १६ जून १९९४ रोजी झाला. त्यांनी आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले. आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली. तिसरीत असताना आर्याने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले पारितोषिक मिळवून […]

सुप्रसिद्ध गायक, संगीतकार व निर्माता हेमंत कुमार

हेमन्ता कुमार मुखोपाध्याय उर्फ हेमंत कुमार यांना संगीताचे औपचारिक शिक्षण मिळाले नव्हते. त्यांचा कुटुंबीयांचा संगीतक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. त्यांचा जन्म १६ जून १९२० रोजी झाला. कोलकाता येथील महाविद्यालयात शिकताना १९३५ साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परिक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले. गायनात गती असणाऱ्या हेमंत कुमार यांना साहित्यक्षेत्रात देखिल रस होता. १९३७ साली त्यांनी […]

ख्यातनाम उर्दू शायर आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित शहरयार

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला गावात जन्मलेल्या अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार यांच्या कुटुंबात लष्करी सेवेची परंपरा होती. त्यांचा जन्म १६ जून १९३६ रोजी झाला. त्याचे वडिल पोलीस अधिकारी होते. त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. त्यामुळे त्याच्या प्राथमिक शिक्षणाचे काही दिवस वडिलांची पोस्टिंग असलेल्या ठिकाणी झालं. त्यानंतर हरदोईमध्ये काही वर्षे घातल्यानंतर त्यांना १९४८ मध्ये अलीगढला पाठवण्यात आलं. त्यावेळी […]

संगीतकार व मेंडोलीन वादक सज्जाद हुसेन

सज्जाद हुसेन यांना बालपणापासून संगीताची आवड होती. त्यांचा जन्म १५ जून १९१७ रोजी झाला.त्यांनी लहान वयातच सतार, व्हायोलीन, वीणा, बासरी, पियानो सारख्या वाद्ये शिकून घेतली. मेंडोलीन हे त्यांचे अतिशय आवडते वाद्य होते. सज्जाद हुसेन हे चित्रपटसंगीताचे बेताज बादशाह होते. सज्जाद हुसेन यांच्या रचलेल्या चाली ऐकायला खूप सोप्या असत. पण त्यांची नक्कल करायचा जेव्हा प्रयत्न होई तेव्हा त्या संगीतकाराला […]

सुरेल गायिका सुरैय्या

सुरैया हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका स्वप्निल, सुरेल काळाचं मोरपंखी प्रतीक होतं. त्यांचा जन्म १५ जून १९२९ रोजी झाला. लहानपणी शाळेच्या सुट्टीत सुरैय्या अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात भाग घेत असे. अशाच एका सुट्टीत ती आपले मामा (एम. हुजूर) यांच्याबरोबर सुभाष स्टुडिओ मध्ये शुटिंग पहायला गेली होती. एम. हुजूर हे चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्याचे काम करत असत. तेव्हा सुभाष स्टुडिओ मध्ये ‘ताजमहल’ […]

कविवर्य प्रा.शंकर वैद्य

त्यांचा जन्म १५ जून १९२८ रोजी ओतूर पुणे येथे झाला.  वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते काव्यविश्वात रमले. ‘आला क्षण गेला क्षण’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. तर ‘कालस्वर’ हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर तब्बल २७ वर्षांनी त्यांचा ‘दर्शन’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांचे […]

जेष्ठ संगीतकार अनिल विश्वास

भारतीय संगीताच्या इतिहासात अनिलदा म्हणजेच अनिल विश्वामस या बंगाली संगीतकाराचं नाव ठळकपणे कोरलं गेलंय. त्यांचा जन्म ७ जुलै १९१४ रोजी बंगालमधील बरिसाल येथे झाला. अनिल विश्वास यांच्या दर्जेदार संगीतानं लाखो श्रोत्यांना तृप्त केलं. अनिल विश्वाास नसते, तर मुकेश आणि तलत महेमूद यांचा हृदयाला भिडणारा आर्त स्वर आपल्यापर्यंत पोहोचलाच नसता. हिंदी चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून अनिल विश्वास ओळखले जातात. ते स्वतः […]

दिग्दर्शक राज खोसला

मुळचे पंजाबचे असलेले राज खोसला हे शास्त्रीय संगीत शिकलेला गायक म्हणून मुंबईत आले होते ते गायक बनायला. त्यांचा जन्म ३१ मे १९२५ रोजी झाला. काही काळ आकाशवाणीवर म्युझिक विभागात काम ही केले पण बॉलीवूड हीच त्याची खरी कर्मभूमी ठरली. या राज खोसालावर नजर पडली देव आनंद यांची आणि त्यांनी राज खोसला यांना गुरु दत्तचा असीस्टंट बनवले. १९५४ मध्ये देव […]

हृदयाच्या बाह्य आवरणावर पहिली यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉ डॅनिएल हेल विल्यम्स

हृदयाच्या बाह्य आवरणावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचे श्रेय डॉ विल्यम्स यांना जाते. १० जुलै १८९३ रोजी जेम्स कॉर्निश या नावाच्या कृष्णवर्णी रुग्णावर डॉ विल्यम्स यांनी शस्त्रक्रिया केली. डॉ विल्यम्स स्वतः कृष्णवर्णी होते. अमेरिकेत कृष्णवर्णी जनतेला जेव्हा समान हक्क प्राप्त झाले नव्हते तेव्हा एका कृष्णवर्णी रुग्णावर यशस्वी हृद्य शस्त्रक्रिया करून डॉ विल्यम्स यांनी इतिहास घडविला असेच म्हटले पाहिजे. […]

1 219 220 221 222 223 377
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..