नवीन लेखन...

सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन

ऑक्टोबर २५ – शहारविणारे शतक आणि झहीद-जावेद

१९८२ : सर्वात कमी चेंडूंमध्ये झळकाविले गेलेले प्रथमश्रेणीतील निर्विवाद (आणि सर्वमान्य) शतक. व्हिक्टोरियाविरुद्ध अडलेडमध्ये डेविड हूक्सने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये शतक काढले. […]

ऑक्टोबर १९ – भुकेला पॉनी आणि मार्कची मृदुता

१९०० : धावांची खूप जास्त भूक असणार्‍या बिल पॉन्सफोर्डचा जन्म.१९९८ : पेशावरमधील सामना अनिर्णित राहिल्याने १-० अशी आघाडी कायम राखत १९६०नंतर प्रथमच पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकण्याच्या आशा कांगारूंनी जिवंत ठेवल्या. […]

ऑक्टोबर २० – सीमाप्रेमी सरदार आणि नजफगढचा नवाब

१९६३ : कालपरवा द ग्रेट इंडीयन लाफ्टर चॅलेंजमध्ये विनोद पूर्ण होण्याआधीच हसणार्‍या नवजोतसिंग सिद्धूचा जन्म. त्याच्या उमेदीच्या काळात सिद्धूने जगभरातील फिरकीपटूंची झोप उडविली होती.

१९७८ : भारताच्या पहिल्या कसोटी त्रिशतकवीराचा जन्म. कारकिर्दीच्या सुरुवातीसच ज्याची सचिन तेंडुलकरशी तुलना केली गेली तो वीरेंद्र सेहवाग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणातच शतक ठोकून प्रकाशात आला. […]

ऑक्टोबर १२ – विजय मर्चंट आणि २ दिवसांची कसोटी

एका विजय दहियाचा अपवाद वगळता नावात ‘विजय’ असलेल्या इतर सर्व जणांनी कसोट्यांमध्ये भारताकडून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. विजय हजारे, विजय मर्चंट, विजय मांजरेकर आणि अगदी आत्त्ताच्या मुरली विजयची सुरुवातही आश्वासक आहे. अवघ्या दुसर्‍याच दिवशी संपलेली एक कसोटी १२ ऑक्टोबर २००२ रोजी शारजात सुरू झाली. […]

ऑक्टोबर १३ सर्पट्याचा शोधक आणि विविअन रिचर्ड्सचा तडाखा

’सर्पट्या’ चेंडूच्या (गुगली) शोधाचे श्रेय ज्याला दिले जाते त्या बर्नार्ड जेम्स टिन्डल बोसांकेचा जन्म १३ ऑक्टोबर १८७७ रोजी मिडलसेक्समध्ये झाला (इंग्लंड). […]

ऑक्टोबर १४ रशीद लतीफ आणि ‘गंभीर’ गौतम

१४ ऑक्टोबर १९६८ रोजी रशिद लतिफ या पाकिस्तानी कर्णधाराचा आणि यष्टीरक्षकाचा जन्म झाला. क्रिकेटविश्वाला ढवळून काढणार्‍या निकालनिश्चिती प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर असे प्रकार मान्य करणार्‍या थोडक्या खेळाडूंमध्ये रशीद लतीफ होता. […]

ऑक्टोबर १५ गोलंदाज गूच आणि वकार-वसिम शो

१५ ऑक्टोबर १९८९ रोजी दिल्लीत नेहरू चषकाचा सामना श्रीलंका आणि इंग्लंडदरम्यान झाला. अलेक स्टेवर्ट आणि अँगस फ्रेजर यांनी आपापली पदार्पणे साजरी केली. ग्रॅहम गूचने अनपेक्षितरीत्या या सामन्यात गोलंदाजीत यश मिळविले. […]

ऑक्टोबर १६ ‘पाका’गमन आणि अष्टपैलू कॅलिस

१६ ऑक्टोबर १९५२ : पाकिस्तान कसोटी खेळणारे सातवे राष्ट्र बनले. पूर्वीच्या संघांच्या इतिहासाप्रमाणेच त्यांचा सुरुवातीला चोळामोळा झाला. लाला अमरनाथ या सामन्यात भारताचे कर्णधार होते. त्यांचा जन्म ‘आताच्या’ पाकिस्तानात झालेला होता. […]

ऑक्टोबर १७ जम्बो लँड्स आणि कोलम्बोचा कलंदर

१९७० : चेंडूला फार मोठी फिरक न देता लेगस्पिनरने ६०० बळी मिळविणे आहे खरे पण या दिवशी जन्मलेल्या अनिल कुंबळेने ते खरे करून दाखविलेले आहे. केवळ दिशेवरील नियंत्रण आणि उसळीमुळे जम्बो खूप चांगला गोलंदाज ठरला. […]

ऑक्टोबर १८ झिम्मींची पहिली कसोटी आणि आरंभशूर नरेंद्र

१९६८ : दणदणीत पदार्पण, खणखणीत पुनरागमन आणि चटपटीत अपयश अशा विचित्र रंगांची कारकीर्द लाभलेल्या नरेंद्र दीपचंद हिरवानीचा जन्म. स्थळ गोरखपूर, उत्तर प्रदेश. त्याच्याइतके झक्कास पदार्पण लाभायला भाग्यच हवे. […]

1 28 29 30 31 32 39
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..