नवीन लेखन...

ऑक्टोबर १२ – विजय मर्चंट आणि २ दिवसांची कसोटी

एका विजय दहियाचा अपवाद वगळता नावात ‘विजय’ असलेल्या इतर सर्व जणांनी कसोट्यांमध्ये भारताकडून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. विजय हजारे, विजय मर्चंट, विजय मांजरेकर आणि अगदी आत्त्ताच्या मुरली विजयची सुरुवातही आश्वासक आहे.
१२ ऑक्टोबर १९११ रोजी विजय माधवजी मर्चंट (ठाकरसी) यांचा जन्म झाला मुंबईत. मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी सामने, भारताकडून १० कसोटी सामने आणि हिंदूंच्या संघाकडून काही सामने ही त्यांची उल्लेखनीय क्रिकेट कारकीर्द.

दीडशे प्रथम श्रेणी सामन्यांमधून तब्बल ७१.६४ च्या सरासरीने ४५ शतके आणि ५२ अर्धशतकांसह त्यांनी १३,७४० धावा जमविल्या. नाबाद ३५९ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या. प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सरासरीचा विचार करता त्यांच्याहून सरस एकच फलंदाज ठरतो – डॉन ब्रॅडमन ९५.१४!

फलंदाजीच्या मुंबई प्रशालेचे ते संस्थापक मानले जातात. मुंबईची शैली समुचित तंत्र, पोलादी मनोबल आणि बॅटच्या मुक्त संचारापेक्षा पारंपरिक तंत्राला महत्त्व देते. सचिन तेंडुलकरच्या आगमनापर्यंत हे तंत्र टिकून राहिले. या प्रशालेचे आदर्श उदाहरण म्हणजे सुनील गावसकर.

आपले १० कसोटी सामने मर्चंट खेळले इंग्लंडविरुद्ध तेही १८ वर्षांच्या विराट अंतराळात. १९११ मध्ये जन्म – त्यांच्या ऐन उमेदीची वर्षे दुसर्‍या महायुद्धात कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने वाया गेली. एवढ्याशा कारकिर्दीतही त्यांनी लौकिक कमावला होता. चार्ल्स फ्राय त्यांच्याबद्दल म्हणाले होते “आपण त्यांना पांढरा रंग देऊ आणि ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर सलामीवीर म्हणून घेऊन जाऊ!” रंगभेदाच्या भीषणतेची आणि मर्चंटांच्या खेळाची या वाक्यावरून जाणवते.

विजय हजारे हे त्यांचे समकालीन. चौरंगी स्पर्धामध्ये त्यांची एकमेकांशी निरोगी स्पर्धा चाले. वेस्ट इंडीजचा जॉर्ज हेडली ‘काळा ब्रॅडमन’ म्हणून प्रसिद्ध आहे. सरासरी आणि सातत्य विचारात घेता खर्‍या अर्थाने ‘दुसरे’ ब्रॅडमन मात्र विजय मर्चंटच ठरतात. रणजी करंडकाच्या सामन्यांमधील त्यांची सरासरी ९८.७५ एवढी प्रचंड आहे.

अवघ्या दुसर्‍याच दिवशी संपलेली एक कसोटी १२ ऑक्टोबर २००२ रोजी शारजात सुरू झाली. वकार युनिसने नाणेफेक जिंकली. पाकचा पहिला डाव ५९ धावांवर आटोपला. दोन्ही सलामीवीर आणि आणखी दोघे शून्यावर बाद. १ जण १ वर, १ जण २ वर, १ जण ४ वर, १ जण ५ वर, १ जण ८ वर बाद, १ जण ४ वर नाबाद, १४ अवांतर, अब्दुल रझाक तब्बल २१ धावा! शेन वॉर्न : अत्यंत ‘लयबद्ध’ गोलंदाजी अकरा-चार, अकरा-चार.

कांगारूंनी ३१० धावा केल्या आणि पहिल्या डावापेक्षा ६ कमी धावा जमवून सगळे जण पुन्हा एकदा बाद झाले. शेन वॉर्न : ६.५-२-१३-४.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..