१९९९ : मायकेल स्लॅटरचा धमाका. ब्रिस्बेन कसोटीत पाकिस्तानच्या ३६७ धावांना प्रत्युत्तर देताना कुणीही सावधच सुरुवात केली असती पण मायकेल स्लॅटरने वेगवान १६९ धावा काढल्या आणि ग्रेग ब्लिवेटसोबत पहिल्या जोडीसाठी २६९ धावा रचल्या.
१९५६ : पश्चिम ऑस्ट्रेलियात ग्रॅएम वूडचा जन्म. या डावखुर्या सलामीवीराला ‘कामिकाझे किड’ (स्वतःला गोत्यात आणणार्या गोष्टी स्वतःहून करणारा मुलगा) असे संबोधले जाते. […]
१९८६ : पहिल्या सामन्यात ५३ धावांवर सर्वबादची नामुष्की ओढवलेल्या (पहा : २८ ऑक्टोबर, अनपेक्षित हार) वेस्ट इंडीज संघाने दुसर्या सामन्यात पाकिस्तानचा एक डाव राखून दणदणीत पराभव केला.
१९८५ : अतुलनीय रिचर्ड हॅडलीचा एक सनसनाटी दिवस. ब्रिस्बेनमध्ये पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ५२ धावांमध्ये ९ तर एकूण १२३ धावांमध्ये १५ फलंदाजांना तंबूची वाट दाखवीत हॅडलीने ऑस्ट्रेलियाची वाट लावली. […]
१९०० : धावांची खूप जास्त भूक असणार्या बिल पॉन्सफोर्डचा जन्म.१९९८ : पेशावरमधील सामना अनिर्णित राहिल्याने १-० अशी आघाडी कायम राखत १९६०नंतर प्रथमच पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकण्याच्या आशा कांगारूंनी जिवंत ठेवल्या. […]
१९६३ : कालपरवा द ग्रेट इंडीयन लाफ्टर चॅलेंजमध्ये विनोद पूर्ण होण्याआधीच हसणार्या नवजोतसिंग सिद्धूचा जन्म. त्याच्या उमेदीच्या काळात सिद्धूने जगभरातील फिरकीपटूंची झोप उडविली होती.
१९७८ : भारताच्या पहिल्या कसोटी त्रिशतकवीराचा जन्म. कारकिर्दीच्या सुरुवातीसच ज्याची सचिन तेंडुलकरशी तुलना केली गेली तो वीरेंद्र सेहवाग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणातच शतक ठोकून प्रकाशात आला. […]
१९४० : जेफ्री बॉयकॉटचा जन्म. त्याची प्रतिभा आणि तंत्र याबाबत कुठेही दुमत नाही पण त्याच्या अप्पलपोटेपणामुळे क्रिकेटविश्वात त्याच्याबद्दल विविध मते आढळतात.
१८५१ : यॉर्कशायरच्या जॉर्ज उल्येट या उमद्या अष्टपैलू खेळाडूचा जन्म. त्याची २४ ही त्या काळातील सरासरी तो काळ पाहता आजमितीच्या ४८ पेक्षा चांगली आहे. […]
१९८३ : मॅकोच्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस. कानपूरमध्ये भारताविरुद्ध माल्कम मार्शलने ९२ धावा काढून सर्वोच्च कामगिरी तर नोंदविलीच पण पहिल्याच हप्त्यात गोलंदाजी केली ८-५-९-४.
१९६७ : इअन ब्रेशॉ (ब्रॅडशॉ नाही) या पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने ‘दस्कटाचा’ मान मिळविला- व्हिक्टोरियाचे दहाच्या दहा गडी बाद केले. […]
१९०० : शरीरवेधी गोलंदाजीच्या आविष्कारकर्त्याचा जन्म. १९१५ : क्रिकेटमधील सर्वात विख्यात दाढीचे मालक असलेल्या डॉक्टर विल्यम गिल्बर्ट ग्रेस यांचे वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. […]