नवीन लेखन...

सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन

नोव्हेंबर १० : आफ्रिकेचा पुनर्प्रवेश आणि बांग्लादेशचे आगमन

२१ वर्षांच्या खंडानंतर दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय क्रिकेट संघ अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना या दिवशी खेळता झाला. बेसिल डी-ऑलिव्हेरा प्रकरणानंतर दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगताने वाळीत टाकले होते. आफ्रिकी राज्यकर्त्यांच्या वर्णद्वेषी धोरणाचा हा परिपाक होता. दक्षिण आफ्रिकेच्या या पुनरागमनानंतर ९ वर्षांनी बांग्लादेश हा भारताचा शेजारी आंतरराष्ट्रीय कसोटीविश्वात प्रवेश करता झाला.
[…]

ऑक्टोबर २६ – बकरा केन आणि कैदी हॅरी

न्यूझीलंडच्या केन रुदरफोर्डचा जन्म. केनच्या कसोटी कारकिर्दीची सुरवात वाईट झाली. पहिल्या महायुद्धादरम्यान कैदी म्हणून पकडल्या गेलेल्या एकमेव कसोटीवीराचा जन्म.
[…]

ऑक्टोबर २८ – विंडीज गडबडी आणि शतकानंतर शतक

१९८६ : वेस्ट इंडीजची मधली फळी मजबूत असतानाही आश्चर्यकारकरीत्या ती कोसळल्याने पाकिस्तान फैसलाबाद कसोटीत विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले.

१९९४ : सामन्यांच्या शतकानंतर पहिले शतक आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी सलामीवीराकडून शतक अशी दुर्मिळ घटना. […]

ऑक्टोबर २९ – जिवंत झालेले क्रिकेट आणि दारुण पराभव

१८७७ : विख्यात क्रिकेटलेखक नेविल कार्डसने ज्याचा ‘मूर्त रुपातील यॉर्कशायर क्रिकेट’ म्हणून गौरव केला होता त्या विल्फ्रेड र्‍होड्सचा जन्म.

२००० : तोवरच्या इतिहासातील सर्वात मोठा एकदिवसीय विजय आणि अर्थातच सर्वात दारुण पराभवही. […]

ऑक्टोबर ३१ – पहिला नायक आणि पहिला त्रिक्रम व सुनीलचे नवल

१८९५ : भारताच्या पहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म. कर्नल कोट्टरी कंकरिया नायडू ड्राईव्ह करण्यात अतिशय पटाईत फलंदाज आणि उपयुक्त मंदगती गोलंदाज होते.
१९८७ : विश्वचषक स्पर्धेतील पहिला त्रिक्रम. आपल्या सहाव्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर केन रुदरफोर्ड, इअन स्मिथ आणि इवेन चॅटफिल्डला बाद करीत भारताच्या चेतन शर्माने त्रिक्रम साधला. […]

नोव्हेंबर ०१ – व्हीव्हीएस आणि शेर्विन कॅम्प्बेल

१९७४ : खूप खूप खास फलंदाजाचा जन्म. १३-१४ मार्च २००१ या दोन दिवसांत वेरिगुप्पा वेंकट साई लक्ष्मणचे आयुष्य पार बदलून गेले.

१९७० : शेर्विन कॅम्प्बेलचा जन्म. वेस्ट इंडीज क्रिकेट सलामीच्या भरवशाच्या जोडीच्या शोधात असूनही शेर्विनला संधी का मिळाली नाही हा अनुत्तरित प्रश्न आहे. […]

नोव्हेंबर ०३ – बिशनसिंग बेदीची बहाली आणि सर्वात ‘लांब’ डाव

१९७८ : आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात एखाद्या संघाने सामना सुरू ठेवण्यास नकार दिल्याने एकदिवसीय सामना बहाल झाल्याची पहिली घटना.

१९९९ : प्रथमश्रेणीतील सर्वात लांब डावाची अखेर. […]

1 26 27 28 29 30 39
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..