नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ४

लाळघोटेपणाचे पालन (किंवा हलकीसलकी कामे करण्याची रीत), सततचा खोटारडेपणा, सदैव वितंडवादाची सवय, इतरांबद्दल नित्य वाईट विचार, अशा माझ्या गुणसमुच्चयाची ख्याती ऐकून ऐकून तू सोडून दुसरे कोणी क्षणभर तरी माझे तोंड पाहील काय? […]

आत्मपूजा उपनिषद : ६ – ७ : आत्मप्रकाश हेच स्नान आणि प्रेम हेच गंध !

सातवा श्लोक समजायला अद्वैत सिद्धान्ताची कल्पना असणं अगत्याचं आहे. अद्वैत सिद्धांत ही खरं तर वस्तुस्थिती आहे, सिद्धांत नाही; कारण त्यात सिद्ध करण्यासारखं काही नाही, फक्त जाणलं की झालं ! […]

निरंजन – भाग १० – कथा श्री दत्तगुरुंची

गुरु म्हटल्यावर आपल्याला दत्तगुरु सर्वात आधी स्मरण होतात. दत्तगुरु म्हणजे साक्षात दत्तरुपी हरि ॐ ब्रह्म… काय आहे या दत्तगुरुंची कथा ….कशी रचना साकारली  या त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्तगुरुंच्या अवताराची… हरि ॐ ब्रह्मांच्या जन्माची…. पाहुया कथा श्री ॠषीरुपी दत्तगुरुंची… […]

श्री अन्नपूर्णाष्टकम् – १

आई जगदंबेचे अत्यंत दिव्य स्वरूप म्हणजे श्री अन्नपूर्णा. भगवान महाकाल विश्वनाथ आपल्या क्षुधाशांतीसाठी आई जगदंबे च्या समोर भिक्षेकरी रूपात उभे राहतात. ती काशीपूर निवासिनी त्यांना भिक्षा देते. भगवान जगद्गुरु आदी शंकराचार्य महाराज या स्तोत्रात त्या अन्नपूर्णेचे स्तवन करीत आहेत. […]

श्री आनंद लहरी – भाग २०

आई जगदंबेच्या सौंदर्याचे खरे वैभव हे आहे की ते सौंदर्य पाहणाऱ्याच्या मनात वासना नव्हे तर वात्सल्य जागृत करते. पाहणाऱ्याला तापवत नाही तर त्याचा ताप दूर करते.
या वैभवाला अधोरेखित करताना , इतर वेळी मानवी भावनांना चंचल करणाऱ्या समस्त गोष्टींचे वर्णन आचार्य करीत आहेत. […]

श्री आनंद लहरी – भाग १९

खरे वैभव ते, जे इतरांना वैभवसंपन्न करते. खरे श्रेष्ठत्व ते जे इतरांना श्रेष्ठत्व प्रदान करते. त्याच प्रमाणे खरे सौंदर्य ते जे इतरांना सौंदर्य प्रदान करते. आई जगदंबेच्या अशा सौंदर्याचे वर्णन करताना आचार्यश्री प्रथम तिच्या स्नानासाठी केलेल्या तयारीचे वर्णन करीत आहेत. […]

श्री आनंद लहरी – भाग १८

आई जगदंबेचा लोकोत्तर सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री येथे एक वेगळाच मार्ग अवलंबित आहेत. त्यांनी त्यासाठी भगवान शंकरांच्या मस्तकावर असणाऱ्या गंगेला आधार केले आहे. ते म्हणतात, […]

श्री आनंद लहरी – भाग १७

भगवान श्री शंकरांचे केवळ बाह्यरंगच नव्हे तर अंतरंग देखील आपल्यासाठी तितकेच भयावह आहे हे सांगत असताना आचार्य श्री म्हणतात…. […]

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ३

हे माते, तुझा उगम रमापति श्रीविष्णूच्या चरणकमलाच्या शुभ्र नखापासून (झाला आहे), तर तुझी वस्ती मदनाचा विरोधक असलेल्या (शंकराच्या मस्तकावरील) जटांच्या बंधनात आहे. मग (असे असूनही) ही तुझी दीन पातकी लोकांची मुक्तता करण्याच्या कार्याची तळमळ जगात सदैव का जागृत रहाणार नाही? […]

श्री आनंद लहरी – भाग १६

या श्लोकात आचार्यश्रींची प्रतिभा एका वेगळ्याच विषयाला स्पर्श करते. आरंभीच्या तीन ओळीत भगवान शंकरांचे वर्णन आहे. हे वर्णन काहीसे नकारात्मक म्हणता येईल. मात्र त्या नकारात्मकतेच्या आधारे आचार्यश्री चौथ्या ओळीत आई जगदंबेचे वैभव स्पष्ट करीत आहेत. […]

1 85 86 87 88 89 143
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..