आदिक्षान्तामक्षरमूर्त्या विलसन्तीं भूते भूते भूतकदम्बप्रसवित्रीम् । शब्दब्रह्मानन्दमयीं तां तटिदाभां गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ४॥ आई जगदंबेचे अतुलनीय वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, आदिक्षान्तामक्षरमूर्त्या विलसन्तीं- अ पासून क्ष पर्यंत सर्व अक्षरांच्या स्वरूपात विलास करणारी. यामध्ये अ पासून म्हणतांना सर्व अक्षरांपासून तर क्ष पर्यंत म्हणताना सर्व जोडाक्षरां पर्यंत असा भाव अंतर्हित आहे. सामान्य शब्दात सकल विद्या, सकल ज्ञान. सर्व शास्त्र […]
संसारात अन् परमार्थात आपल्याला काही साध्य करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या मनाची एकाग्रता साधणे अतिशय आवश्यक आहे.मन स्थिर नसेल तर आपल्या अभ्यासाचा किंवा साधनेचा काही उपयोग होत नाही. भक्तगणांची ही अडचण ओळखून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूनांच चित्त स्थिर करण्यासाठी ह्या स्तोत्रातून साकडे घातले आहे. […]
चन्द्रापीडानन्दितमन्दस्मितवक्त्रां चन्द्रापीडालंकृतनीलालकभाराम् । इन्द्रोपेन्द्राद्यर्चितपादाम्बुजयुग्मां गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ३॥ आई जगदंबेच्या या जगन्मोहन स्वरूपाचे अधिक वर्णन करतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात, चन्द्रापीडानन्दितमन्दस्मितवक्त्रां- चंद्रापीड अर्थात ज्यांनी आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला आहे असे, म्हणजे भगवान शंकर. त्यांना आनंद देणारे मंद स्मितहास्य जिचा वदनावर विलसत आहे अशी. वास्तविक भगवान शंकर म्हणजे योगीराज शिरोमणी. कोणाच्याही व्यावहारिक सुखात, आकर्षणात ते अडकणारच नाहीत. पण […]
नृसिंहपंचरत्न स्तोत्रात श्रीमत् शंकराचार्य मनाला भ्रमराची उपमा देऊन, या वैराण वाळवंटासारख्या जगातील नश्वर गोष्टींमध्ये सुखासाठी वेड्यासारखे फिरण्याऐवजी भगवान लक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील शाश्वत मकरंद ख-या आनंदासाठी तू सतत सेवन करावास, असे विविध उदाहरणे देऊन पटवून देतात. हे अवघ्या पाच श्लोकांचे स्तोत्र अतिशय लालित्यपूर्ण आणि मधुर आहे. […]
प्रत्याहारध्यानसमाधिस्थितिभाजां नित्यं चित्ते निर्वृतिकाष्ठां कलयन्तीम् । सत्यज्ञानानन्दमयीं तां तनुरूपां गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ २॥ आई गौरीचे हे स्वरूपच सर्व साधकांचे साध्य आहे, उपास्य आहे,हे स्पष्ट करतांना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, प्रत्याहारध्यानसमाधिस्थितिभाजां- प्रत्याहार, ध्यान, समाधी इत्यादी योगशास्त्रातील स्थितींना जे भाज अर्थात पात्र आहेत अशा साधकांच्या, नित्यं चित्ते निर्वृतिकाष्ठां कलयन्तीम् – चित्तामध्ये नित्य निवृत्ती रूपाने क्रीडा करणाऱ्या, काष्ठा अर्थात […]
सकाळी पंधरा मिनिटात पूजा करून टाकतात आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का? […]
लीलालब्धस्थापितलुप्ताखिललोकां लोकातीतैर्योगिभिरन्तश्चिरमृग्याम् । बालादित्यश्रेणिसमानद्युतिपुञ्जां गौरीममम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ १॥ आई जगदंबेच्या शुद्ध सात्विक स्वरूपाला गौरी असे म्हणतात. तिचा गौरवर्ण तिच्या सात्विकतेचे ,शुद्धतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. या आई जगदंबेचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, लीलालब्धस्थापित लुप्ताखिललोकां- भगवान ब्रह्मदेवांच्या दिवसाच्या शेवटी म्हणजे कल्पांती ही चवदा भुवनात्मक सृष्टी विलोप पावते. पुन्हा नवीन कल्पात अर्थात श्री ब्रह्मदेवांच्या नवीन दिवसाच्या […]
कृपा ही जाणून घेण्याची गोष्ट आहे! उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या अवस्थेतून प्रत्येक जीव वाटचाल करत असतो. दासबोधात रामदास स्वामीनी जन्म हेच दुःख आहे असे म्हटले आहे, तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून ह्या भाव सागरातून मुक्त व्हायचे आहे,तू सद्गुरुंना शरण जा! हे सद्गुरू म्हणजे कोण? व्यक्ती का नाही! हे एक तत्व आहे ह्या आधी होते आत्ता ही आहे आणि पुढे ही राहणार आहे! […]
ह्रींकारत्रयसंपुटॆन महता मन्त्रॆण संदीपितं स्तोत्रं यः प्रतिवासरं तव पुरॊ मातर्जपॆन्मन्त्रवित् । तस्य क्षॊणिभुजॊ भवन्ति वशगा लक्ष्मीश्चिरस्थायिनी वाणी निर्मलसूक्तिभारभरिता जागर्ति दीर्घं वयः ॥ १६ ॥ कल्याणवृष्टिस्तवाच्या या शेवटच्या श्लोकात फलश्रुती वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात, ह्रींकारत्रयसंपुटॆन- तीन ह्रींकार संपुटित. कोणत्याही मंत्राच्या मागेपुढे एखादी गोष्ट लावले जाते तेव्हा त्याला संपुट असे म्हणतात. ह्रीं या बीजाक्षराच्या आधी ओंकार आणि नंतर […]