नवीन लेखन...

काव्याची सफर

पिंपात मेले ओले उंदीर त्यांचे जहर कडू पिऊन होतील आत्मे ज्यांचे स्तब्ध शांत मडू ।।१।। अशाच भाही लहरी येती लहरी घुमून जाती अशाच काही काव्यकल्पना जीवा घेरुन जाती ।।२।। परंतु राही अमर जगामधी गाथा तुकारामाची आणि स्मरती अभंगवाणी नाम्या ऐक्याची ।।३।। अजुन ऐकवी कुणी वैराणी वाणी मिरेची ज्ञानदेव तो अमृत पाजी बोधसत्व यासी ।।४।। — द्वारकानाथ […]

दयेची कसोटी

करुनी दयेची बरसात पावन करीतो दुष्टाला तुझ्या मनाचा ठाव उमजला नाहीं कुणाला वाल्या होता खूनी पापांनी भरले रांजण परि तुझ्या दयेद्वारे गेला तो उद्धरुन कालीदास होता ऐष आरामी राहात होता वेश्येघरीं महाकवी बनवूनी त्याला किमया तूंच करी बहकला होता पुंडलीक पत्नीच्या विपरीत नादानें उभे केले तुला विटेवरी आईबाप सेवा शक्तिनें क्षमा करुनी पाप्यांना पावन तूं करितो […]

होळीत जाळा दुष्ट भाव

एकत्र येऊं सारेजण विसरुन जाऊ भेदभाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //धृ// ऐष आरामांत राहून देह झाला मलीन शरीर सुखासाठी करती नाना खटपटी आज आहे सण होळीचा नष्ट करा ऐहिक भाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //१// मन असे चंचल भारी सर्व दिशेने घेई भरारी राग लोभ अहंकार मनाचे तर हे विकार […]

दिव्य शक्ति

व्याकूळ झाला जीव प्रभू तुझ्या दर्शना अर्पितो मी भाव तुझीया चरणा //१// तेजांत लपले तुझे दिव्य स्वरुप नयना न जमले टिपण्या ते रुप //२// निनादाच्या स्वरी तुच आहेस संगीत कर्ण अवलोकन न करी ऐकण्या तुझे गीत //३// पुष्पातील सुवास तुंच आहेस सुगंध न येई घ्राणेद्रियास ओळखता तो आनंद //४// मधुर रसाची फळे सर्वात तु बसलास जिव्हेला […]

1 402 403 404 405 406 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..