नवीन लेखन...

नियतीचा फटका

भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र… एक भयानक रात्र अशी, सहस्त्रावधींचा घेई बळी । नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी ।।१।। मध्यरात्र होऊन गेली, वातावरण शांत होते । गादीवरती पडून सारे, स्वप्ने रंगवीत होते ।।२।। तोच अचानक विषारी वायू, पसरला त्या वातावरणी । हालचालींना वाव न देता, श्वास रोखीले स्वप्न […]

मेघ- गर्वहरण

अंहकाराचा पेटून वणवा, थैमान घातिले त्या मेघांनी । तांडव नृत्यापरि भासली, पाऊले त्यांची दाही दिशांनी ।।१।। अक्राळ विक्राळ घन दाट, नी रंग काळाभोर दिसला । सूर्यालाही लपवित असता, गर्वाचा भाव चमकला ।।२।। पृथ्वीवरती छाया पसरवूनी, चाहूल देई आगमनाची । तोफेसम गडगडाट करूनी, चमक दाखवी दिव्यत्वाची ।।३।। मानवप्राणी तसेच जीवाणे, टक लावती नभाकडे । रूप भयानक बघून […]

देह मंदीर

शरीर एक साधन, साध्य करण्या प्रभूला, शुद्ध देह- मनांत आठवा त्याला ।।१।। व्यायाम आहार, नियमित वेळी, शरीर तंदुरस्त, सुदृढ ठेवी ।।२।। सुदृढ असता देह, करावे मनाला शांत, टाळत असतां मोह, न येई तो भावनेत ।।३।। षडरिपू हे विकार, काढा विवेकांनी, निर्मळ ठेवा शरीर, पवित्रता राखूनी ।।४।। देह आहे मंदीर, गाभारा तो मन, आत्मा तो ईश्वर, आनंद […]

कवच

आघात होऊनी परिस्थितीचे, सही सलामत सुटत असे, संकटाची चाहूल लागूनी, परिणाम शून्य ठरत असे ।।१।। दु:खाची चटकती उन्हे, संरक्षणाची छत्री येई, कोणती तरी अदृष्य शक्ती, त्यास वाचवोनी निघून जाई ।।३।। दूर सारूनी षडरिपूला, मनावरती ताबा मिळवी, प्रेमभाव अंगी करूनी, तपशक्तीला सतत वाढवी ।।३।। तपोबलाचे बनूनी कवच, फिरत होते अवती भवती, दु:खाचे वार झेलुनी, रक्षण त्याचे सदैव […]

नशीब

का असा धांवतोस तूं , नशिबाच्या मागें मागें, यत्न होता भगिरथी, नशीब येईल संगे ।।१।। प्रयत्न होतां जोमाने, दिशा दिसताती तेथें, यशाचे ध्येय सदैव, योग्य मार्गानें मिळते ।।२।। प्रयत्न करूनी बघा, ईश्वर देखील मिळेल, इच्छा शक्ती प्रभावानें, नशीबही बदलेल ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

भावंडे जुळी दोन

देवाने दिली आपणास बाळे जुळी दोन, पाठीला पाठ लाऊन जन्मास आली जणू एकाच नाण्याच्या बाजू दोन ! एक बहिण आणि एक भाऊ नामकरण करती त्यांचे तृप्ती आणि समाधान ! जुळ्यांना समजावून घेतना होते मनाची कसरत, मीमी तूतू ने गाडी नाही पुढे सरकत ! प्रेम करता एकावर रुसवे दुसरे उगाच, दुसऱ्यास जवळ घेता पहिले पाहे रागेच ! […]

देवा तुझा मी सोनार

देवा तुझा मी सोनार माझे काय बरे होणार पैजण होऊ पाहे पायी परंतु घुंगरु वाजलं नाही मग कैसे रुनझुणणार माझे काय बरें होणार? मौतीक माळा होऊ पाही परी मौतीक गुंफत नाही कैसी मी रुळणार माझे काय बरें होणार? कमरपट्टा होऊ पाही चाप बंधनी अडकत नाही कैसी मी कसणार देवा काय बरे होणार? मुकूट मस्तकी होऊ पाही […]

जन्म स्वभाव

गोड शब्द बोबडे, लकब मनास आवडे । शब्दांची भासली जाण, नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान ।। भावनांचा उगम दिसला, मनी व्यक्त होई हालचालीतूनी । रागलोभ अहंकारादी गुण, दिसून येती जन्मापासून ।। देश-वेष वा जात कुठली, सर्व गुणांची बिजे दिसली । हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी ।। प्रसंग घडता अवचित , बाह्य जगाते विसरत । […]

क्षण मुक्तीचा

तपसाधना करूनी मिळवी, सत्वगुणाची शक्ती अंगी । त्याच शक्तीच्या जोरावरती, स्थान लाभे त्यांना स्वर्गी ।। शक्ती ऱ्हास जे करिती त्याचा, सारे सुख आणि भोग भोंवतीं । परिणामी तो फेकला जाऊनी, पुनरपी येई याच भूवरती ।। एक दया दाखवी ईश्वर, वातावरणी देऊनी संधी । जन्म मिळे ते त्याच ठिकाणी, कमविले पुण्य ज्याने आधी ।। चक्र खेळ हा […]

शांततेचा शोध

मनाची शांति । मिळेना कुणा कुठें शोधूं ती । प्रश्न सर्वांना ।। जीवन ध्येय । शांततेसाठीं प्रयत्न होय । त्याच्याच पाठी ।। शांतीचे घर । अंतःकरण नसे बाहेर । कधीं चूकून ।। शत्रू शांतीचा । अशांति असे ठिकाणा त्याचा । बाह्यांत वसे ।। विरोधी दोघे । दूर राहती । वाईट बघे । एकमेकाती ।। अशांत वाटे […]

1 382 383 384 385 386 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..