नवीन लेखन...

काजळी धरल्या वाती

तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देऊनी सर्व जनां, आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना ।।१।। शांत जळते केंव्हां तरी, भडकून उठते कधी कधी, फडफड करीत मंदावते, इच्छा दाखवी घेण्या समाधी ।।२।। जगदंबेच्या प्रतिमेवरती, प्रकाश टाकुनी हास्य टिपते, हास्य बघूनी त्या देवीचे, चरण स्पर्शण्या झेपावते ।।३।। अजाणपणाच्या खेळामधली, स्वप्न तरंगे दिसती, दिव्यामधले तेल संपता, काजळी […]

विष्ठा

विष्ठा बघूनी थुंकलो, घाण वाटली मजला, अमंगल संबोधूनी, लाखोली देई तिजला ।।१।। संतापूनी मजवर , कान उघडणी केली, तुझ्याचमुळें मूर्खा मी, अमंगळ ती ठरली।।२।। आकर्षक रूप माझे, लाडू करंज्यानें युक्त कपाटातूनी काढूनी, केले सारे तूंच फस्त ।।३।। परि मिळतां तुझा तो, अमंगळ सहवास, रूप माझे पालटूनी, मिळे हा नरकवास ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० […]

उदरांतील शेषशायी

मातेच्या उदरांत झोपला, शेषशायी भगवान वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन शेषशायीचे चित्र बघतां, साम्य ते दिसेल उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल शेषापरी वेटोळे असुनी, ‘ नाळ ‘ तयाला म्हणती क्षारयुक्त पाण्यामध्यें, बालक ते निद्रिस्त असती बालकाच्या नाभी मधुनी, येई कमलाकृती भाग जीवनसत्व त्यावर असुनी, ब्रह्मापरी दिसे अंग ‘ सो हं ‘ निनादुनी सांगे, ‘ मीच तोच […]

मर्यादा

मर्यादेचा बांध घालूनी, मर्यादेतचि जगती सारे । अनंत असता ईश्वर , मर्यादा घाली त्यास बिचारे ।। जाण जगाची होई इंद्रियांनी, त्याला असती मर्यादा । विचार सारे झेपावती, ज्ञान शक्ती बधूनी सदा ।। अथांग वाटे विश्वमंडळ, दाही दिशांचा भव्य पसारा । ईश्वर आहे थोर त्याहूनी, मोजमापाच्या उठती नजरा ।। कशास करीतो तुलना सारी, भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी […]

नियतीचा फटका

भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र… एक भयानक रात्र अशी, सहस्त्रावधींचा घेई बळी । नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी ।।१।। मध्यरात्र होऊन गेली, वातावरण शांत होते । गादीवरती पडून सारे, स्वप्ने रंगवीत होते ।।२।। तोच अचानक विषारी वायू, पसरला त्या वातावरणी । हालचालींना वाव न देता, श्वास रोखीले स्वप्न […]

मेघ- गर्वहरण

अंहकाराचा पेटून वणवा, थैमान घातिले त्या मेघांनी । तांडव नृत्यापरि भासली, पाऊले त्यांची दाही दिशांनी ।।१।। अक्राळ विक्राळ घन दाट, नी रंग काळाभोर दिसला । सूर्यालाही लपवित असता, गर्वाचा भाव चमकला ।।२।। पृथ्वीवरती छाया पसरवूनी, चाहूल देई आगमनाची । तोफेसम गडगडाट करूनी, चमक दाखवी दिव्यत्वाची ।।३।। मानवप्राणी तसेच जीवाणे, टक लावती नभाकडे । रूप भयानक बघून […]

देह मंदीर

शरीर एक साधन, साध्य करण्या प्रभूला, शुद्ध देह- मनांत आठवा त्याला ।।१।। व्यायाम आहार, नियमित वेळी, शरीर तंदुरस्त, सुदृढ ठेवी ।।२।। सुदृढ असता देह, करावे मनाला शांत, टाळत असतां मोह, न येई तो भावनेत ।।३।। षडरिपू हे विकार, काढा विवेकांनी, निर्मळ ठेवा शरीर, पवित्रता राखूनी ।।४।। देह आहे मंदीर, गाभारा तो मन, आत्मा तो ईश्वर, आनंद […]

कवच

आघात होऊनी परिस्थितीचे, सही सलामत सुटत असे, संकटाची चाहूल लागूनी, परिणाम शून्य ठरत असे ।।१।। दु:खाची चटकती उन्हे, संरक्षणाची छत्री येई, कोणती तरी अदृष्य शक्ती, त्यास वाचवोनी निघून जाई ।।३।। दूर सारूनी षडरिपूला, मनावरती ताबा मिळवी, प्रेमभाव अंगी करूनी, तपशक्तीला सतत वाढवी ।।३।। तपोबलाचे बनूनी कवच, फिरत होते अवती भवती, दु:खाचे वार झेलुनी, रक्षण त्याचे सदैव […]

नशीब

का असा धांवतोस तूं , नशिबाच्या मागें मागें, यत्न होता भगिरथी, नशीब येईल संगे ।।१।। प्रयत्न होतां जोमाने, दिशा दिसताती तेथें, यशाचे ध्येय सदैव, योग्य मार्गानें मिळते ।।२।। प्रयत्न करूनी बघा, ईश्वर देखील मिळेल, इच्छा शक्ती प्रभावानें, नशीबही बदलेल ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

भावंडे जुळी दोन

देवाने दिली आपणास बाळे जुळी दोन, पाठीला पाठ लाऊन जन्मास आली जणू एकाच नाण्याच्या बाजू दोन ! एक बहिण आणि एक भाऊ नामकरण करती त्यांचे तृप्ती आणि समाधान ! जुळ्यांना समजावून घेतना होते मनाची कसरत, मीमी तूतू ने गाडी नाही पुढे सरकत ! प्रेम करता एकावर रुसवे दुसरे उगाच, दुसऱ्यास जवळ घेता पहिले पाहे रागेच ! […]

1 384 385 386 387 388 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..