नवीन लेखन...

गुणधर्म

करूं म्हटले करूं न शकलो रोकू म्हटले रोकू न शकलो जे जे स्फूरले येईल ते ते ठरले असते होईल ते ते   बघूनी बाह्य जगला ठरवी मिळवीन तेच सुख भावी त्याचेसाठी स्थिती आगळी उमज न येई ती सगळी   धडपड करीतो गडबड करीतो त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो सुप्त गुण हे अंगी लपले उभारून ते येतील सगळे   […]

जग

मी म्हणालो जगाला मला फक्त तुझ्यासाठी आणि स्वतःसाठी जगायचयं… जग म्हणालं मला माझ्यासाठी जगं पण टाळं स्वतःसाठी जगायचं… मी बदललो जगाच्या कल्याणासाठी पण आता जगचं मला बदलतयं… जगात बदल घडवणं आता अशक्य आहे कारण जग आता पाषाण झालयं… © कवी – निलेश बामणे ( एन.डी.) दिनांक – 9 मार्च 2016

लग्न म्हणजे काय असतं ?

लग्न म्हणजे काय असतं ? एक चुकलेलं गणित असतं कारण तिथे एक आणि एक तीन असतं… लग्न म्हणजे काय असतं ? उगाच त्याग करणं असतं कारण त्यातून काहीतरी मिळवायचं असतं लग्न म्हणजे काय असतं ? दोन जीवांचं मिलन असतं कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं लग्न म्हणजे काय असतं ? मोक्षाकडे नेणारं दार असतं कारण […]

जगणें अटळ असतां

वाट कुणाची बघतो आम्हीं, ठाऊक असते सर्वांना, मृत्यू हा अटळ असूनी, केव्हांही येई अवचित क्षणा ।।१।।   आगमनाचा काळ त्याचा, कल्पनेनें ठरविला जातो, अचूक जरी शक्य नसले, विचार त्यावरी करीता येतो ।।२।।   जीवन म्हणती त्या काळाला, जगणे आले मृत्यू येई तो, जगण्यापुढे पर्याय नसतां, सुसह्य करण्या प्रयत्न होतो ।।३।।   तन मनाला सुख देऊनी, जीवन […]

तू भेटलीस की…

तू भेटलीस की का बेचैन होते वेडे मन माझे… तू भेटलीस की का होतात डोळे ओलेचिंब माझे… तू भेटलीस की का काळीज होते कासाविस माझे… तू भेटलीस की का व्यर्थच भासे हे जीवन माझे… तू भेटलीस की का बेभान होते सारेच ग माझे… © कवी – निलेश बामणे ( एन.डी.) दिनांक – 9 मार्च 2016

स्थिर वा अस्थिर

स्थिर आहे जग म्हणूनी, अस्थिर आम्ही जगू शकतो । अस्थिर आहे जग म्हणून, स्थिर आम्ही जगू शकतो ।।१।।   पोटासाठी वणवण फिरे, शोधीत कण कण अन्नाचे । थकला देह विसावा घेई, कुशीत राहूनी धरणीचे ।।२।।   धरणी फिरते रवि भोवतीं, ऋतूचक्र हे बदलीत जाते । जगण्यामधला प्राण बनूनी, चैतन्य सारे फुलवून आणते ।।३।।   पूरक बनती […]

पतंग

एक पतंग वरी चालला, डोलत आकाशीं भाळी त्याच्या यश कोरले, झेप घेई ती कशी ।। भरारी घेई पतंग ज्याला, आधार दोरीचा जाणीव होई येतां प्रसंग, त्याला कटण्याचा ।। धरतीवरी कोसळत असतां, दृष्टी टाकी आकाशीं इतर पतंग बघूनी बोलला, तोच स्वतःशीं ।। ” नभांग मोठे दाही दिशा त्या, संचारा स्वैरपणें आठवण ठेवा त्या शक्तीची, ज्याच्यामुळें जगणें ” […]

भिकारीण

मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर, सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर ।।१।। हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला, कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला ।।२।। परि ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत, उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत ।।३।। जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी, मिळालेल्या आवाजाला, समजे ती ऋणी ।।४।। डॉ. […]

माझा जन्म

माझाच जन्म व्हावा म्ह्णून माझ्या आई-बापाचं मिलन झालेलं नव्हतं… माझ्या जन्माचं कोडं त्यांना आणि मलाही कधी उलगडलं नव्हतं… माझा जन्म आता मला, माझ्या आई-बाबाला आणि जगालाही ओझं ठरलं होतं… मला शक्य असतं तर या जगात जन्माला येणंच मी स्वतःहून नाकारलं असतं… किती बरं झालं असतं या जगात जन्माला येणं न येणं हे आपल्या हातात असतं… © […]

पुण्ण्याचा साठा

खिशांत माझ्या पडली होती, सुटी नाणी काही, वस्तूंची ती खरेदी करण्या, सर्व बाजार पाही ।।१।। सराफ्याच्या दुकानी दिसला, एक हिऱ्याचा हार, डोळे माझे चमकूनी गेले, फिरती गरगर ।।२।। दाम विक्रीचे जाणूनी घेता, हताश मी झालो, हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो ।।३।। दोन वेळची पूजा करूनी, जप माळ जपती, खूप साचले पुण्य आपले, हे कांहीं […]

1 371 372 373 374 375 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..