नवीन लेखन...

श्री कृष्ण जन्मी सेवेसाठी स्पर्धा

चालली स्पर्धा साऱ्यांची,  प्रभूची सेवा करण्याची….।।धृ।। निशाराणी संचारी निद्रीत जाई पहारेकरी खट्याळ वारे धावूनी दारे दिली उघडूनी विज चमकूनी आकाशी   मदत होई वसुदेवाची….१ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   पावसाच्या पडती सरी पक्षी नाचती तालावरी कोकीळेचे सुरेल गान आनंदाने वातावरण नागराजा फना काढूनी   काळजी घेई नव बाळाची….२ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   स्पर्श […]

दृष्टी बदल

नवा चित्रपट बघण्या गेलो,   कुटुंबासह चित्र मंदिरी चित्रगृह ते भरले असतां,   प्रवेश मिळाला कसातरी….१, चित्रपट तो बघत असतां,  आश्चर्य वाटले जल्लोशाचे टाळ्या, शिट्या देवून प्रेक्षक,  कौतूक करी नटनट्यांचे….२ वास्तवतेला सोडूनी,   रटाळपणे वाहत होते, वैताग येवूनी त्या चित्राचा,   सोडून आलो मधेच मी ते….३, घरी येवूनी शांत जाहलो,  आठवू लागलो बालपण अशीच होती छायाचित्रे,  ज्यांत आमचे रमले मन….४ […]

जीवन मृत्यू खेळ

सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी….१, भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा, काळाची ती भूक असूनी,  माहीत असते सर्वांना….२, अविरत चालू लपंडाव ,  जगण्या मरण्याचा शेवट हा जरी निश्चीत असला,  हक्क तुम्हां खेळण्याचा….३, खेळती काही तन्मयतेने,  रिझविती इतरजणां, खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां….४   — डॉ. […]

सोड मागणी

मागत होता प्रभूला    हात जोडूनी कांही भक्तिभाव बघूनी त्याचे     मिळत ते जाई एका मागून एक मिळे    मागणी होता त्याची निराश करणे न लगे     इच्छा होता भक्ताची जे जे बघे भोवती       घेतले होते मागुनी कशांत दडले सुख     उमज येईना मनीं देरे बुद्धि देवा मजला    योग्य मागण्यासाठी समाधानी मी होईन      तुझ्या कृपे पोटी ज्ञान झाले गंमतीचे    सांगे सोड […]

स्फूर्ती दाता

तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य, समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य ।।१।।   तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती, प्रफुल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती ।।२।।   कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी, मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी ।।३।।   हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी, दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ।।४।। […]

मार्ग मुक्तिचा

तहानलेली नदी पाण्याच्या शोधात भटकत होती भयाण वाळवंटात.उडणार्या गिधाडास विचारले तिने भाऊ मिळेल का कुठे जीवनदायी पाणी. पाण्याचे विचारू नको सापडेल तुला पुढे ताई मार्ग मुक्तिचा. एका वळणावर नदीने पहिले शुष्क वडाच्या फांदीवर लटकलेले होते एक प्रेत. झाडाखाली साचलेला होता एक ढीग मोठा कवट्यांचा खेळत होती त्यांच्या सवे गिधाडांची गोंडस पोरे फुटबॉल फुटबॉल. टीप: कवितेचा अर्थ […]

बहिणीची हाक

राखण करीतो पाठीराखा,  भाऊ माझा प्रेमळ सखा, विश्वासाचे असते नाते,  एकाच रक्तामधून येते ।।१।।   आईबाबांचे मिळूनी गुण,  तुला मला हे आले विभागून, हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या ।।२।।   प्रकाश झाला परंपरेनें,  त्याला माहित पुढेच जाणे, मार्ग जरी भिन्न चालले,  मूळ तयाचे खालीं रूजले ।।३।।   अघात पडतां तव वर्मी,  दु:खी होऊन जाते […]

दु:खी अनुभवी

दु:ख जाणण्या दु:खी व्हावे, या परि अनुभव दुजा कोणता  । सत्य समजण्या कामी न येई, तेथ कुणाची कल्पकता  ।।१।।   धगधगणारे अंगारे हे, जाळती काळीज  । शब्दांचे फुंकार घालूनी, येईल कधी का समज  ।।२।।   मर्मा वरती घाव बसता, सत्य येते उफाळूनी  । चेहऱ्यावरले रंग निराळे, हलके हलके जाती मिटूनी  ।।३।।   त्या दुःखीताला जाणीव असते, […]

वेडी

रस्त्यावर उभी राहूनी, हातवारे ती करीत होती, मध्येच हसते केंव्हां रडते, चकरा मारीत बसे खालती ।।१।।   गर्दी जमली खूप बघ्यांची, कुत्सीतपणे न्याहळू लागली, ‘शिपाई आणा जावूनी कुणी’, ठाण्यात नेण्यास सांगू लागली ।।२।।   जीवनातील दु:खी चटका, सहनशक्तीचा अंत पाहतो, मनावरील ताबा सुटूनी, वेडेपणा हा दिसून येतो ।।३।।   इतकी गर्दी जमून कुणीही, तिच्या मनीचा ठाव […]

प्रतिक्रिया

क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी  । तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी  ।।१।।   फेकतां जोराने, आदळे भिंतीवरी  । प्रवास परतीचा, होई तुमचे उरीं  ।।२।।   शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी  । येऊनी धडकतील, तुमचेच पाठीं  ।।३।।   प्रेमाने बोलणे, सुंगध आणिते  । आनंदी लहरी, मनां सुखावते  ।।४।।   — डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com […]

1 369 370 371 372 373 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..