नवीन लेखन...

मैनेचे मातृहृदय

आम्रवनांतील शोभा बघत, भटकत होतो नदी किनारी, मैनेची ती ओरड ऐकूनी, नजर लागली फांदीवरती ।।१।। एक धामण हलके हलके , घरट्याच्या त्या नजीक गेली, पिल्लावरती नजर तिची, जीभल्या चाटीत सरसावली ।।२।। मैनेच्या त्या मातृहृदयाला, पर्वा नव्हती स्वदेहाची, जगावयाचे जर पिल्लासाठी, भीती न उरी ती मृत्यूची ।।३।। युक्त्या आणि चपळाईने, तुटून पडली त्या मृत्यूवरी, रक्त बंबाळ केले […]

बाळाची निद्रा

चिंव चिंव करुं नकोस चिमणे, बाळ माझे झोपले काय हवे तुज सांग मला ग, देईन मी सगळे कपाट सारे उघडून ठेवले, समोर ओट्यावरी मेवा समजून लुटून न्यावे, डाळ दाणे पोटभरी घरटी बांध तूं माळ्यावरती, काडी गवत आणूनी कचरा म्हणूनी काढणार नाही, ही घे माझी वाणी नाचून बागडून खेळ येथे, निर्भय आनंदानें परि शांत न बसलीस तूं […]

मराठी माय माझी…

मराठी राजभाषा दिनाच्या सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा! मराठी माय माझी… मराठी माय माझी… ममतेचा करते वर्षाव मजवरी… मराठी माय माझी… ममतेने करते संस्कार मजवरी… मराठी माय माझी… ममतेने मला शिकवण देणारी… मराठी माय माझी… ममतेने मला वळण लावणारी… मराठी माय माझी… ममतेने माझ्या आवडी जपणारी… मराठी माय माझी… ममतेने माझ्या कला जोपासणारी… मराठी माय माझी… […]

कविची श्रीमंती

खंत वाटली मनास कळला नसे व्यवहार । शिकला सवरला नाही जाणला संसार ।।१।। पुढेच गेले सगे सोयरे आणिक सारी मित्रमंडळी । घरे बांघूनी धन कमविले श्रीमंत झाली सगळी ।।२।। वेड्यापरी बसून कोपरी रचित होता कविता । कुटुंबीय म्हणती त्याला कां फुका हा वेळ दवडीता ।।३।। सग्यांच्या उंच महाली बैठक जमली सर्व जणांची । श्रेष्ठ पदीचा मान […]

संकटातील चिमणी

शांत होती रात्र सारी, आणि निद्रे मध्ये सारे, खिडकी मधूनी वाहे, मंद मंद वारे ।।१।। तोच अचानक तेथे, चिमणी एक आली, मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली ।।२।। जाग येता निद्रेतूनी, बत्ती दिवा पेटविला, काय घडले भोवती, कानोसा तो घेतला ।।३।। माळावरती बसूनी, चिव् चिव् चालू होती, बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती ।।४।। मध्येच उडूनी जाई, […]

दृष्टांताची किमया

दृष्टांताची किमया निराकार तो असूनी व्यापतो, सर्व विश्व मंडळ, सूक्ष्मपणातही दिसून येतो, करी जगाचा प्रतिपाळ ।।१।। दर्शन देण्यास भक्त जणांना, धारण करितो रूप, तसाच दिसे नयनी तुमच्या, ध्यास लागता खूप ।।२।। दृष्टांत होणे सत्य घटना ती, जीवनी तुमच्या घडे, वेड लागता प्रभू चरणाचे, सदैव स्वप्न पडे ।।३।। कुणामध्येही अस्तित्व दाखवी, हीच त्याची किमया, परि टिपून घेई […]

पुंडलिकाचे दैवत

आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला, उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।। आईबाप हे दैवत ज्याचे, रुप पाही त्यांच्यात प्रभूचे । सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।१।। निद्रेमध्यें असतां दोघे, मांडी देऊनी आपण जागे । कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला, उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला […]

सतत बरसणारी दया

प्रभू दयेची बरसात, चालू असते सतत, ज्ञानाची गंगोत्री वाहते, पिणाऱ्यालाच मिळते ।।१।। प्रत्येक क्षण दयेचा, टिपणारा ठरे नशीबाचा, जलात राहूनी कोरडे, म्हणावे त्यास काय वेडे ।।२।। फळे पडतां रोज पाही, त्याची कुणा उमज न येई, परि न्यूटन एक निघाला, बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला ।।३।। चहा किटलीचे झाकण हाले, स्टिफनसनने इंजीन शोधले, जीवनातील साधे प्रसंग, शास्त्रज्ञांची बनले अंग […]

समाधानी अश्रू

बांधले होते सुंदर घरटे, कौशल्य सारे एकवटूनी, वृक्षाच्या उंच फांदिवरी, लोंबत होते झोके घेऊनी ।।१।। दूर जाऊनी चारा आणिते, पक्षीण आपल्या पिल्याकरीता, जग सारे घरटे असूनी, स्वप्न तिचे त्यांत राहता ।।२।। वादळ सुटले एके दिनी, उन्मळून पडला वृक्ष, पिल्लासाठी गेली होती, शोधण्यासाठी आपले भक्ष्य ।।३।। शाबूत घरटे फांदी वरते, वृक्ष जरी पडला होता, पिल्लामधली कुजबुज, असह्य […]

1 368 369 370 371 372 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..