बंधनातील चिमणी
चिव चिव करीत, एक चिमणी आली । दर्पणाच्या चौकटीवरती, येवून ती बसली ।। बघूनी दूजी चिमणी दर्पणी, चकीत झाली होती । वाटूं लागले या चिमणीला, आंत अडकली ती ।। उत्सुकता नि तगमग दिसे, चेहऱ्यावरी । चारी दिशेने बघत होती, आंतल्या चिमणी परी ।। औत्सुक्याचे भाव सारे दिसती, आतील चिमणीतही । कशी करूं तिची बंधन मुक्ती, काळजी […]