भावना उद्वेग
आकाशाला शब्द भिडले, हृदयामधले । भाव मनीचे चेतविता, स्फोटक बनले ।।१।। देह जपतो हृदयाला, सदा सर्व काळी । धडकन त्या हृदयाची, असे आगळी ।।२।। जमे भावना हलके तेथे, एकवटूनी । सुरंग लागता तीच येई, उफाळूनी ।।३।। कंठ दाटता जीव गुदमरे आत । रंग बदलती चेहऱ्यावरले, काही क्षणात ।।४।। उद्वेग बघूनी शरीर, कंपीत होते । हृदयातील भाव […]
