नवीन लेखन...

आत्म्याचे मिलन

आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।। देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।। कार्य आत्म्याचे अपूरे होता, पुनरपी पडते बंधन, चक्र आत्म्याचे चालत राही, मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

शुद्धतेत वसे ईश्वर

खिन्न मनानें बसला होता,  उन्हांत एका खडकावरी  । डबके घाण पाण्याचे,  वातावरण दुषित करी  ।। किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें,  आणिक पडला काडी कचरा  । नजिक येईना वाटसरूं कुणी,  बघूनी सारा गालिच्छ पसारा  ।। सोडून देऊनी निवारा ,  नदीकांठच्या शिखरीं गेला  । निर्मळ करूनी जागा,  आश्रम त्याने एक बांधला  ।। बाग फुलवूनी सुंदर तेथें  फळा फुलांना येई बहर  […]

पूजा भाव

पूजा पाठ करीत असतां    पूजा गेलो विसरुनी प्रभुचरणी ध्यान लागतां   भान गेले हरपूनी पूजेमधल्या विधीमध्यें   बहूत तास घालविले मनी घेऊनी आनंदे   पूजा कर्म केले पूजेमधली सर्व कृतिं   कटाक्षाने पाळली नेटकेपणासाठी   योग्य साधने जमविली वर्षामागून वर्षे गेली   पूजाअर्चा करुनी खंत मनी राहून गेली   झालो नसे समाधानी मूर्ती समोर बसूनी    एक चित्त झालो ध्यान अचानक लागूनी    स्वतःसी विसरलो […]

खेळण्या नसे पर्याय

दु:खाचे तूं देवूनी चटके,   सत्वपरिक्षा ही बघतोस प्रतिकूल ती स्थिती करूनी,  झगडत आम्हां ठेवतोस खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा खेळातूनि अंग काढतां,  जगण्याच्या मिटतील खुणा…२, खेळगडी तो असूनी तुम्हीं,  मैदानासम विश्व भासते तन्मयतेनें खेळत असतां,  खचितच यश तुम्हा येते…३, विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा बसू नका हतबल होवूनी,  गमवाल त्या […]

मुके भाव

आज लोपले शब्द ओठचे,  भावनाच्या आकाशीं प्रखर बनतां त्याच भावना,  विचार जाती तळाशीं….१, भावनेला व्यक्त करण्या,  सांगड लागे शब्दांची थोटके पडती शब्द सूर ते,  गर्दी होता विचारांची…२, भावनांचे झरे फुटूनी,  विचार जलाशय झाले विचारांचे बनूनी धबधबे,  वाहू मग लागले…..३, आकार देती शब्द भाषा,  बांध घालूनी विचाराला निश्चीत होतो वेग नी मार्ग,  आकार देता भावनेला….४, भाषेमधली शक्ती […]

सुखाची मोहमाया

तप्त लोखंडात,  लपली ती आग दिसे लाल लाल,  जाळी सर्व भाग…१, सुंदर फूलात,  सुंगध तो छान अवती भवती काटे,  ते कठीण…२, विजेची ती तार,  प्रकाशी दिव्याला, झटका तो देई,  स्पर्श होता तिला..३, सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया न दिसे ती आम्हा,  असे मोह माया…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला…३ झाकण उघडा,  दुःख दिसे आंत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

इंद्रियें सेवकासम

खिडकीमधूनी टिपत होतो बाह्य जगाचे द्दष्य आगळे लोभसवाणें चित्र बघण्या आतूर होऊन गेले डोळे नयन नव्हते बघत ते बघत होतो मीच खरा खिडकीसम नयनातूनी द्दष्य उमटते आंत जरा संगीताचे सूर निनादूनी लहरी त्यांच्या उठताती कर्णा मधल्या पडद्यायोगे आनंद मजला देवून जाती मालक असूनी मी देहाचा इंद्रिये सारी असती सेवक ती केवळ साधने असूनी आंतील ‘मीच’ असे […]

अंतर्मनातील आवाज

ध्यान लागतां डुबूनी जाई अंतर्यामीं बाह्य जगाला त्याच क्षणीं विसरतो मी ।।१।। चित्त सारे केंद्रित होई आत्म्याकडे दुर्लक्ष्य होऊनी देहाचा विसर पडे ।।२।। संवाद होता आत्म्याशी विचारा सारे आतून कांहीं ।।३।। आंतल्या आवाजांत  सत्याचा भाव भविष्यातील घटणाचा त्यासी ठाव ।।४।। नियमीत ध्यान साधना करती इतर जीवांचे प्रश्न समजती ।।५।। ऋषीमुनींना ध्यान शक्ती अवगत राजाश्रय मिळूनी राज […]

चुकीचे तर्क

मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता…..१, तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करीत होते…२, वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला…३, बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले…४ […]

1 320 321 322 323 324 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..