नवीन लेखन...

असुरक्षीत जीवन

आज कुणाच काय भरवसा रडते जीवन ढसाढसा    // धृ // प्रेम दिसेना जगांत कोठे ह्रदया मधले सरले साठे ओढ कुणाची कुणा न वाटे ओरड करुनी कंठ न दाटे सुकुनी गेला घसा रडते जीवन ढसाढसा  – – – १ बाप ना भाऊ इथे कुणाचा लोप पावला कढ रक्ताचा मायमाउली सहज विसरते काळ तिचा तो नऊ मासाचा फुटला नात्याचा आरसा रडते जीवन ढसाढसा – – – 2 सुरक्षतेचे कवच दिसेना शब्दावरी विश्वास बसेना दुर्मिळ झाली त्याग भावना कदर कुणाची कुणी करेना इथे लागतो केवळ पैसा रडते जीवन ढसाढसा – – – ३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

त्यांचे नाते

कोण लागतात माझे, नाते ते ठाऊक नाहीं, देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं ।।१।। विठ्ठल- रामाचा नाद, गुंजन करितो येथें, पवित्र वातावरण, येण्यानी होवून जाते ।।२।। देवाण घेवाण आत्म्याची, आपसामध्यें चालती, शब्द फुलांची गुंफण, त्वरीत होऊन जाती ।।३।। फुले देऊनी मजला, हार गुफूंन घेतात, दोघे मिळूनी तो हार, प्रभूस अर्पूं सांगतात ।।४।। अदृश्य असले नाते, असावे […]

ऐ, भिमा..!!

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर…यांचं नाव घेऊन राजकारण करून सामान्य माणसाला स्वातंत्र्यानंतर पासून दूर ठेवलेल्या अनु याची खदखद व्यक्त करणारी मुक्त छंद कविता […]

मीरेची तल्लीनता

नाच नाचती तालावरती मीरेची पाऊले चित्त ते हरीमय जाहले. – – – धृ लागला प्रभुचा ध्यास हरि दिसे नयनास चलबिचल नजर होऊन अंग सारे मोहरले   – – -१ चित्त ते हरीमय जाहाले न राही आपले भान झाली भजनी तल्लीन तनमन प्रभुचे ठायी जाता संसार ते विसरले.  –  –  – २ चित्त ते हरीमय जाहाले विषाचा घेता […]

देहाला कां शिणवितां ?

शरीरातील अवयव सारे, यंत्रवत् असती  । आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती  ।। यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी  । अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी  ।। शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती  । त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम  होती  ।। खाणें शुद्ध पिणे शुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते  । संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते  ।। उपास […]

दुःख कसे विसरलो

काय केले दुःख विसरण्याला युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   ।।धृ।। निराशेच्या काळांत दुःख होते मनांत हार झाली जीवनांत शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला   ।।१।। युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला चूक राई एवढे दुःखाचा पर्वत पडे मनीं पश्चाताप घडे भोग भोगण्या, झालो तयार   ।।२।। युक्ति जमली नामीं आनंद आणण्याला एकाग्र चित्तांत जातां ध्यानांत डूबता आनंदात विसरुन गेलो […]

बदलते भाव

कसा वागतो दोन प्रकारे,  दिसून सर्वा येते राग दाखवी क्षणात,  आणि प्रेमळ ही वाटते….१ देहस्तरावरले प्रश्न सारे,  सुख-दु:खानी भरले अंतर्मनातील भाव परि,  आनंदीच वाटले….२ देहाशी त्या येवून संबंध,  राग लोभ दाखवी केवळ त्यातील आनंद शोषण्या,  अंतरात्मा शिकवी…३ जड होता पारडे एकाचे,  भाव येई दिसून भावांचे  रंग बदलती,  अंतर बाह्यावरून…४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

जीवन म्हणती याला

त्याची ऐकूनी करूण कहाणी,  डोळे भरून आले पाणी हृदय येता उंचबळूनी,  निराश झाले मन  ।।१।। आघात होता त्याच्या जीवनी,  तो तर नव्हता माझा कुणी तरी का आले प्रेम दाटूनी,  उमजेना काही ।।२।। दु:ख दुजाचे समोर आले,  मनास ज्याने कंपीत केले दोन जीवांच्या हृदयामधले,  अदृष्य हे धागे ।।३।। मानव धर्म एक बिजाचा,  वाढत गेला गुंता त्याचा ओढत […]

समत्व बुद्धी

एका टोंकावरती जातां,  शांत न राही झोका तेथें, विलंब न करता क्षणाचा,  जाई दुजा टोका वरती ।।१।। जीवनांतील झोके देखील,  असेच सदैव फिरताती, बऱ्या वाईटातील अंतर,  नेहमी चालत असती ।।२।। समाधान ते मिळत नसे,  जेव्हां बघता तुम्हीं भोग, त्यांत देखील निराशा येते,  मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।। जवळपणाच्या नात्यामध्यें   दुरत्वाचे अंकूर फूटते, दूर असता कुणी तरी, […]

ज्ञान साठा

जमीन खोदतां पाणी लागते, हीच किमया निसर्गाची, कमी अधिक त्या खोलवरती, साठवण असे जलाशयाची ।।१।। प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी, समानता तो दाखवितो, अज्ञानाचा थर सांचवूनी, आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।। एक किरण तो पूरे जाहला, अंधकार तो नष्ट करण्या, ज्ञान किरण तो चमकूनी जातां, फुलून येते ज्ञान वाहण्या…..||३|| डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 319 320 321 322 323 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..