नवीन लेखन...

सार्थकी जीवन

सारे जीवन जाते, आपले अन्न शोधण्याकडे, काय उरते आमच्या हाती, विचार करा थोडे ।।१।। जीवनाची मर्यादा ठरली, आयुष्य रेखेमुळे, आज वा उद्या संपवू यात्रा, हेच आम्हांस कळे ।।२।। धडपड करी आम्ही, सारी देह सुखासाठी, विचार ही मनांत नसतो, इतरांच्या करिता ।।३।। वेळ काढावा जीवनातुनी, इतरांसाठी थोडा, सार्थकी लावा आयुष्य तुम्ही, जीवन शिकवी धडा ।।४।। डॉ. भगवान […]

शोधूं कोठें त्यास ?

शोधत होतो रुप प्रभूचे,   एक चित्त लावूनी  । अवंती भवंती नजर फिरवी,   श्वास रोखूनी  ।। शांत झाले चंचल चित्त,   शांत झाला श्वास  । ह्रदयनाडी मंद होऊनी,   चाले सावकाश  ।। पचन शक्ती  हलकी झाली,   जठराग्नीची  । शिथील झाली गात्रे सारी,   देह चैतन्याची  ।। देहक्रियांतील प्राणबिंदू ,  असे ईश्वर  । समरस होतां त्याच शक्तिशीं,   होई स्थिर  ।। शोधामध्यें […]

पावन हो तू आई

पावन हो तू आई तव चरण शरण येई   ।।धृ।। संसाराचा खेळ मांडला खेळविसी तूं मजला थकूनी मी जाई   ।।१।। पावन हो तू आई तव चरण शरण येई रात्रंदिनीं ध्यास लागला जीव माझा तगमगला झोप तर येतच नाही   ।।२।। पावन हो तू आई तव चरण शरण येई आळवितो मी तुजला विसरुनी देहभानाला नयनी तव रुप पाही   ।।३।। […]

काळाची चाहूल

जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी….१, भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल…२, चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत झडप घाली अचानक तो,  जो जो येई त्याच्या टापूत…३, जरी दिसे मारक कुणीतरी,  करवूनी घेतो काळच सारे विश्वाचा  […]

दुःख विसर बुद्धी

कसे मानू उपकार, देवा तुझे देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे खेळ आहे जेथें, हार जीत आहे घर बांधणीते, पड झड पाहे असे जन्ममरण, ह्याच देहीं हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही एक दुःख येतां, मन होई निराश काळ पुढे जाता, विसरे ते सावकाश एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां जमता दुःखे अनेक, नष्ट करील जीवनां […]

संस्कारा प्रमाणे

समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई सबळ दुर्बल याचा संघर्ष,  टळत नेहमी जाई….१, मर्दूमकीचा विचार ठेवूनी,  मैदानी उतरी त्याच स्थरावर सारे घडते,  मुरले जे शरिरी….२, ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी हात घाईची सिमा परि,  तो टाळी विचारांनी…..३, मस्तावले शरिर असतां,  धक्का-बुक्की होते देहामधली जमली शक्ती,  बाह्य मार्ग शोधते….४, दिसून येतो ऊर्जा वापर,  देह […]

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला…३ झाकण उघडा,  दुःख दिसे आंत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

उभारी

कोपऱ्यांत तो पडला होता,  शरिर जर्जर होऊन जरी झाला हतबल देह,  सदैव उत्साही त्याचे मन…१, झगडा देवूनी आयुष्याशीं,  जीवनाचे घरकूल बांधले सुख दु:खाच्या विटा चढवूनी,  त्याग श्रमाचे लिंपन केले…२, कर्तृत्वाचे शब्द उमटती,  घरकूलाच्या भिंती मधूनी जगण्यासाठी उभारी देती,  इच्छा शक्तीस जागवूनी…३, गतकाळाच्या आठवणी त्या,  जगण्याचा तो ठेवा बनला सार्थकतेच्या जाणीवेनें,  अंत दशेतील क्लेश विसरला…४ डॉ. भगवान […]

ऋतूचे चक्र आणि मन

कडाक्याची थंडी, दात कुडकडुती, हात-पाय गार, काटे अंगी येती नकोसा वाटतो,  मजला हिवाळा, वाट मी बघतो,  येण्या तो उन्हाळा सुकूनची जाते,  हिरवे  रान शरिर राहते,  घाम निथळून लाही लाही होता,  त्रस्त होई जीव, शोधण्या  ढग,  मन घेई धाव थांबवितो कामे,  वादळी वारा, पर्जन्याचा मारा,  पडताती गारा पाणी चहूकडे,  वाटते सुकावे, वर्षा  जावूनी,  सुक्यात खेळावे आपल्या जे […]

वासनेतील तफावत

विपरित वागूनी मन,  नाश करीते शरीराचा  । वासनेतील तफावत,  काळ बनतो इंद्रियाचा…१, उदर भरले असताना,  अन्नाला विरोधते पोट  । परि अतृप्तता जिभेची,  घालते आग्रहाचा घाट….२, मद्य सेवन करीता,  झिंग ती येवून जाते  । मेंदूतील चेतनेसाठीं,  यकृत बिघडूनी जाते…३, नाच गाणे देत असते,  सूख नयनां – कर्णाला  । शरीर वंचित होते,  मिळणाऱ्या त्या विश्रांतीला….४ एक इंद्रियाची वासना, […]

1 317 318 319 320 321 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..