नवीन लेखन...

पुनर्जन्म

संघर्षाची बिजें जळतील,  जाणतां तत्व पुनर्जन्माचे  । आपसांमधील हेवे-दावे,  मिटून जातील कायमचे  ।। फिरत असते चक्र भोवती,  स्वार्थीपणाचे भाव आणिते  ।। त्यांनाच मिळावे सारे काही,  जाणता स्वरक्ताचे नाते  । उगम झाला जाती धर्माचा,  स्वार्थीपणाच्या याच कल्पनी  ।। वाटीत सुटतो प्रेम तयांना,  केवळ सारे आपले समजूनी  । कन्या जेव्हां सासरीं जाते,  नाती-गोती नवीन बनती  ।। वाटत होते […]

स्मरण असू दे

हे जगदंबे !  सदैव होते नाम मुखी गे लोप पावले आज कसे ते तू मज सांगे…..१ लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी….२ काही हवेसे वाटू लागले एके दिवशी विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी….३ आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती….४ तगमग करूनी तेच मिळविता आज […]

स्वप्नातली अपूरी इच्छा

दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा….१, वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे…..२, पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा….३, खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी….४, आई नको, […]

कृष्ण बाललीला

चकित झाले गोकूळवासी बघून बाललीला सांगा कोण आहे तरी कृष्ण ? विचारी यशोदेला   ।।१।। प्रासादातील मोदक खातां तोंड ते उघडले मुखामध्ये मोदक नसूनी ब्रह्मांड ते दिसले   ।।२।। उच्छाद मांडूनी कालीयाने पाणी केले दुषित मर्दन करण्यासाठीं त्याचे उडी टाकी डोहात   ।।३।। पूतना असूनी राक्षसिण स्तनांत होते विष स्तनपान करुनी त्यानें तीला केले कासाविस   ।।४।। खोड्या बघूनी यशोदेनें […]

अवमूल्यन

उत्साहाने करित होता,  सारे कांहीं इतरांसाठी क्षीण होवूनी जाता शरीर,  आधार तयाला झाली काठी…१, धनाचा तो प्रवाह वाहतां,  गंगाजळीचे पाणी पाजले दुजाकरिता त्याग करूनी,  समाधानी ते इतरा केले….२, धन संपत्तीचे झरे आटतां,  प्रेमळपणाचे शब्द राहीले कालक्रमणाच्या ओघामधल्या,  दुर्बलतेस कुणी न जाणले…३, अपेक्षा ती सदैव असते,  मिळत रहावा सहयोग अवमूल्यन ते केले जाते,  दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग…४ […]

आत्मा हाच ईश्वर

आत्म्याला ओढ असते     ईश्वराच्या मिलनाची जाण सदैव राहते     प्रभुमय स्वरुपाची   ।।१।। अंशात्मक भाग असे    आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते  आकर्षण     गुणस्वभाव तो त्याचा   ।।२।। आत्म्यास पडले असे    बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी    प्रयत्न करी मुक्तीचे   ।।३।। मुक्त होई त्या क्षणीं    अनंतात समावतो परमेश्वरि रुपांत    विलीन होऊन जातो   ।।४।। आत्मा मुक्त होत असे     देहकर्म फळावर […]

कन्येस निराश बघून

कशास घेतला जन्म मुली तूं, आमचे पोटीं समजत नाहीं काय गे लिहीले, तुझ्या ललाटीं झेप तुझी दिसून आली, जन्मापासूनी चतूरपणें तूं मान उंचावली, स्व-गुणांनी तोकडे पडतो सदैव आम्ही, देण्या तुज संधी खंत वाटते मनांस ह्याची, कधी कधी उपजत गुण हे जोपासावे, कळते सारे कांहीं झेप तुझी आणि झेप आमची,  विसंगत राही असे उमलणारे फूल उद्याचे, तूं […]

दयेची दिशा

निसर्ग नियमें दया प्रभूची,  सदैव बरसत असते  । दयेचा तो सागर असता,  कमतरता ही पडत नसते  ।। अज्ञानी ठरतो आम्हींच सारे,  झेलून घेण्या तीच दया  । लक्ष्य आमचे विचलित होते,  बघून भोवती फसवी माया  ।। उपडे धरता पात्र अंगणीं,  कसे जमवाल वर्षा जल  । प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी,   निघून जाईल वेळ  ।। भरेल भांडे काठोकाठ , […]

सार्थकी जीवन

सारे जीवन जाते, आपले अन्न शोधण्याकडे, काय उरते आमच्या हाती, विचार करा थोडे ।।१।। जीवनाची मर्यादा ठरली, आयुष्य रेखेमुळे, आज वा उद्या संपवू यात्रा, हेच आम्हांस कळे ।।२।। धडपड करी आम्ही, सारी देह सुखासाठी, विचार ही मनांत नसतो, इतरांच्या करिता ।।३।। वेळ काढावा जीवनातुनी, इतरांसाठी थोडा, सार्थकी लावा आयुष्य तुम्ही, जीवन शिकवी धडा ।।४।। डॉ. भगवान […]

शोधूं कोठें त्यास ?

शोधत होतो रुप प्रभूचे,   एक चित्त लावूनी  । अवंती भवंती नजर फिरवी,   श्वास रोखूनी  ।। शांत झाले चंचल चित्त,   शांत झाला श्वास  । ह्रदयनाडी मंद होऊनी,   चाले सावकाश  ।। पचन शक्ती  हलकी झाली,   जठराग्नीची  । शिथील झाली गात्रे सारी,   देह चैतन्याची  ।। देहक्रियांतील प्राणबिंदू ,  असे ईश्वर  । समरस होतां त्याच शक्तिशीं,   होई स्थिर  ।। शोधामध्यें […]

1 316 317 318 319 320 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..