नवीन लेखन...

श्रीहनुमंतापाशी मागणे 

मारुतिराया या देहातच दर्शन देई रे
श्वासोच्छ्वासी सहवासाचा अनुभव देई रे ।। ध्रु ।।

प्रभातकाली रामनाम तू उच्चारून घेई
पवनासंगे मनास अमुच्या जोडुन तू देई
नीलगगनि तो राम सावळा दाखव दाखव रे ।।१।।

उद्योगी उत्साह तूच रे प्रयत्नात शक्ती
रघुनाथाची भक्ति तूच रे योजनेत युक्ती
नित्याची ती कर्मे घडता रामा भेटव रे ।।२।।

धरतीवरती पदे पडावी चलता ठेक्यात
श्रीरामाचा जप चालू दे तेंव्हा हृदयात
तेज रवीचे झळको वदनी अंजनिकुमारा रे ।।३।।

रुंद रुंदशी छाती द्यावी प्रहार झेलाया
स्वकर्मकुसुमे गुंफू माळा तुजला पूजाया
आत्मबुद्धिचा वज्रासम तू निश्चय देई रे ।।४।।

द्रोणागिरि पेलला करावर सांभाळुन आणला
लंकेला जाळले, रावणा विक्रम दाखविला
सीतेला शोधले प्रयत्ने विमल बुद्धी दे रे ।।५।।

‘जय बजरंगा जय हनुमंता’ जयजयकार करू
तुझिया आशीर्वादे आम्ही अजिंक्य वीर ठरू
बालक रामा दास्यभक्ति तू आपण शिकवी रे ।।६।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..